बदामात उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक घटक असतात. यामध्ये केवळ पोषणमूल्ये आणि जीवनसत्त्वेच नसतात तर त्यामुळे पदार्थाला स्वाद येण्यासही उपयोग होतो. गोड पदार्थांमध्ये बदाम खूपच छान लागतात. बदामाला सुक्या मेव्याचा राजा म्हणूनही ओळखले जाते. कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, ‘ब’ जीवनसत्त्व, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, खनिज, प्रथिने, बदामात असतात. स्मृतिभ्रंश, विस्मरण या आजारांसाठी बदाम उपयुक्त आहे. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी व अन्न अशा दोन्ही स्वरूपात बदाम वापरले जातात. शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढण्यास बदामाची मदत होते.
आज आपण या बदामाची वडी ( चिक्की ) करणार आहोत. सध्या थंडीचे दिवस आहेत तर ही गुणकारी वडी नक्की करून पहा.
बदामा बरोबर आपण लोहयुक्त गूळाचा वापर करणार आहोत. रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी सूंठ घेणार आहेत. आम्लपीत्त, सर्दी, पोटावर उपाय करणारा ओवा ही यांत आहे. खोकल्यावर औषध म्हणून आपण मध व काळीमिरी चे चाटण घेतोच. या वडीत काळीमीरी पण आहे. चला तर आपण साहित्य आणि कृती पाहूयात.
साहित्य

- एक वाटी बारीक चिरलेला गूळ
- १/२ वाटी बदाम बी (त्याची जाडसर पूड करून घ्यायची) ती बरोबर एक वाटी होते
- एक टेबल स्पून सूंठ पावडर
- अर्धा टेबल स्पून ओवा
- अर्धा टेबल स्पून काळीमिरी पावडर
- दोन टेबल स्पून साजूक तूप
कृती
- बदामाचे जाडसर तुकडे करून घ्यायचे. एका पॅन मधे एक टेबलस्पून तूप गरम करून त्यावर हे बदामाचे तुकडे तपकिरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे.
- बदामाच्या परतेल्या मिश्रणात आता सूंठ, मीरी, ओवा घालायचा व हे सर्व मिश्रण पुन्हा किंचीत परतायचे.
- आता बारीक केलेला गूळ पॅन मधील मिश्रणात घालायचा. गूळ विरघळल्यावर गॅस बंद करायचा.
- आता एका ताटलीला किंचीत तूप लावून ठेवायचे व वरील मिश्रण त्यावर पसरून गार करायचे.
कोमट असताना वडी कापून ठेवायची.
मस्त लागतात या वड्या.
थंडीत सकाळी गरमगरम दूधाबरोबर एक वडी तोंडात टाकायची. 👍👍
ही वडी पूर्ण आरोग्यदायी आहे . थंडी अजून काही दिवस आहे मग करून बघतां ना ?😄👍
तुम्हाला जर वडी सणसणीत हवी असेल तर ओवा आणि मीरी एक, एक ,टेबलस्पून घेवू शकता . हे प्रमाण घेतलेत तर वडी झणझणीत होते 😄👍
विणा , मस्त दिसत आहेत बदामाच्या वड्या 👌👍😊
LikeLiked by 1 person
खूपच छान आहे.
शाही पदार्थ आहे.
मस्तच.
LikeLiked by 1 person
karayala sopi vatate pan karun pahilyashivay kalnar nahi paushtik badam vadi mastach👌
LikeLiked by 1 person