पिठलं तोंड मिटलं

Burmese kaukswe ही खरी म्यानमार ची डीश आहे. पण यांतील जीन्नस बरेचसे आपल्या पिठल्यात लागणारे आहेत. Original डीश मधे करीत बऱ्याच भाज्या घातलेल्या आहेत. हे सर्व मला माझ्या मुलाने सांगितले. एकंदरीत सर्व कृती पहाताना मनांत विचार घोळू लागले. आपल्या पिठल्यात जर नारळाचे दूध वापरले तर अजुनच खमंग चव येईल. राहिला भाग राईस न्युडल्स चा. तो तर चुटकी सरशी सोडवला. आजोळ कोकणातील त्यामुळे तांदुळाच्या शेवया माहितच होत्या.
आता कामालाच लागले आणि पहिला प्रयोग करून पाहिला. उत्तम जमला 👍👍👍
मग मंडळी ही नाविन्य पूर्ण डीश आपल्यापुढे मांडत आहे. आपण या डीश चे दोन भागात विभाजन करूयात.

पिठल्याचे साहित्य ( चार माणसांचे साहित्य )

 • १ वाटी हरभराडाळीचे पीठ
 • पाच ते सहा मिरच्या ( पिठल तिखट हवे असल्यास मिरच्या वाढवा )
 • आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या
 • एक पेर ( एक तुकडा ) आल्याचा
 • एका नारळाचे दूध ( टेट्रापॅक मधील नारळ दूध वापरले तरी चालेल .ते एक पाकीट पूर्ण पाहिजे )
 • एक मोठा कांदा बारीक चिरलेला
 • चार चमचे ( टेबल स्पून ) तेल
 • फोडणी साठी हिंग, मोहरी , जिरे , हळद ,
 • मीठ , लिंबू
 • १/२ चमचा धनेपूड , १/२ चमचा जिरे पूड
 • गार्निशींग साठी
 • १/२ वाटी तळलेले दाणे, १/४ वाटी बारीक तुकडे केलेला लसूण तोही तळून ठेवायचा, १/२ वाटी ऊभा पातळ चिरलेला कांदा हा पण खरपूस तळायचा, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, चार लिंबाच्या फोडी.

तांदूळाच्या शेवई चे साहित्य

 • एक वाटी भरून तांदूळाची पिठी
 • एक ते दीड वाटी पाणी, किंचीत मीठ, पाव चमचा तेल

पिठल्याची कृती

 1. लोखंडी कढई घरात असेल तर जरूर वापरा. कारण यांतील केलेलं पिठले फारच खमंग लागते. प्रथम कढईत तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर क्रमाने दाणे, लसूण, कांदा चांगले खरपूस तळून घ्या.
 2. आले, मिरची, लसूण यांचा मसाला मिक्सर मधून बारीक करून घ्या.
 3. कढईत तेल तापल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यावर त्यात आपण वाटलेला मसाला घालायचा व तो परतून घ्यायचा. त्या नंतर यात बारीक चिरलेला कांदा थोडे मिठ घालून तांबूस रंग होईपर्यंत परतायचा.
 4. कांदा चांगला शिजला कि नारळाचे दूध त्यात मिसळायचे. महत्वाचे म्हणजे हे दूध घातल्यावर मिश्रण सतत हलवत रहायचे म्हणजे नारळाचे दूध फुटणार नाही.
 5. आता मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात डाळीचे पीठ घालायचे ( डाळीच्या पीठात पाणी घालून एकजीव करून ठेवायचे. गुठळी होवू द्यायची नाही ). मिश्रणात चविनुसार मीठ घालायचे. आता पिठले चांगले शीजू द्यायचे. कढईवर झाकण ठेवा व दणकून वाफ आणा. पिठले चांगले तुकतुकीत दिसायला पाहिजे .पिठले पळीवाढी करायचे ( घट्ट गोळा नको )

तांदूळाची शेवई करायची कृती

 1. पॅन मधे एक ते दीड वाटी पाणी घालून पाण्याला उकळी आणायची.
 2. आता एक वाटी तांदूळाची पिठी त्या पाण्यात भूरभूरायची व किंचीत मीठ घालायचे. एक सारखी पिठी ढवळून घ्यायची व मस्त दणकून वाफ आणायची.
 3. ही तयार उकड ताटात घेवून चांगली मळायची. (हाताला चटके बसतात मळताना ,म्हणून हाताला पाणी व तेल लावा ) तुम्ही उकड फूडप्रोसेसर मधून सुध्दा काढू शकता.
 4. मळलेली उकड शेवईच्या सोर्यात घालून शेवया करून घ्यायच्या . (सोर्याला आतून तेल लावायचे )
 5. तयार शेवई छान वाफवून घ्यायची .
 6. सोर्या नसेल तर गाजराच्या किसणीला तेल लावून त्यावर तांदूळाचा उंडा किसून देखिल शेवई करता येईल.

आता तयार झालेले पिठले व शेवई पानात शेजारीशेजारी वाढायची, त्यावर कांदापात, कोथिंबीर, तळलेला कांदा, लसूण, शेंगदाणे वरून घालायचे. शेवई वर तूप ही वाढायचे. कडेला लिंबाची फोड पाहिजे. आता खमंग पिठले व राईस न्युडलचा आस्वाद घ्या.
तुम्हाला मुळ बर्मीज पदार्थ पहायचा असेल तर तो इंटरनेट वर उपलब्ध आहे.
तात्पर्य “पिठलेआणि तोंड मिटले “ही म्हण जागतिक पातळीवर ही खरी आहे नाही का ? 😀😀😋

या पाककृतीच्या केंद्रस्थानी ‘पिठले’ आहे. हे पिठले कोणत्या कोंदणात बसवायचे याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे . राईस न्यूडल्स, भात, पोळी किंवा भाकरी असे अनेक पर्याय त्याकरिता आहेत. हे पिठले थोडेसे पातळ केल्यास ‘सूप’ म्हणूनही ते चालेल. एकंदरीत मोठा कॅनव्हास उपलब्ध आहे. त्यावर कोणत्या रंगांची उधळण करायची ? निवड तुमची आहे !! 🙂👍

4 Comments Add yours

 1. डाॅ. अरूण हरके म्हणतो आहे:

  खुप सुरेख डीश शुभांगी. पिठलं प्रत्येक घरात होतं. झटपट तयार होणारी डिश म्हणजे आपलं नेहमीच्ं पिठलं. आणि ते सर्वानाच आवडतं देखील. पण तु त्यात केलेले modifications मस्त. केळीच्या पानावर पिठलं आणि शेजारी तांदळा च्या शेवया! क्या बात है!! आवडलं.!!

  Liked by 1 person

 2. Janhavi Namjoshi म्हणतो आहे:

  अतिशय सुंदर आकर्षक अशी रंग्संगती आणि नवनवीन पाककृती, तुझ्यातील आदर्श गृहिणीला वारंवार वंदन ताई.

  असाही पदार्थ भारतीय vesrion🎏मध्ये होऊ शकतो हीच किमया आहे तुझी.

  Liked by 1 person

 3. Shruts S म्हणतो आहे:

  Tumhi khup innovative aahat 👍

  >

  Liked by 1 person

 4. Prajaktakhadilkar म्हणतो आहे:

  tuzya pakkaletil nanavidh kalpana pratyakshat uttam ritya sakarun ek navin chavishta aakarshak receipe kartes kharach khup chan👌pithal asahi khamangch pratyekala avadanare pan tyat tu dilela twist great

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.