आवळ्याचा सोहळा

॥ आवळी आवळी सदा सावळी
राधाकृष्ण तुझ्या जवळी
नाव घेतां आवळींचे
पाप जाईल जन्माचे ॥

या पारंपारिक गोष्टींचे स्वत:चे असे महत्व आहे. त्या आपले सांस्कृतिक विश्व समृध्द करीत राहतीलच, पण त्याच बरोबर “शरीरमाध्यम खलू धर्मसाधनम्”. हे पण आपण लक्षात ठेवले पाहिजे.
आवळा हा क जीवनसत्वाने परिपूर्ण आहे. आवळ्याचे सेवन केल्याने कफ, पित्त, वात, हे त्रिदोष जातात अशी आयुर्वेदाची धारणा आहे. केस व त्वचा कांतीमान ठेवण्या साठी आवळा जरूर वापरावा. आवळ्यात कर्करोग प्रतिबंधक शक्ती असल्याचे मानले जाते.
अमृत फळ आवळ्याच्या काही कृती आता सांगते आहे. तुमचा हा हिवाळा आरोग्यदायी जावो ही शुभकामना.

या लींक वर मी आवळ्याचे चार प्रकार दाखवले आहेत.

  1. मोहरी फेसून आवळ्याचे लोणचे
  2. आवळा ज्यूस किंवा आवळा starter
  3. आवळा सुपारी
  4. आवळ्याचे मेथांबा प्रमाणे लोणचे

आता आपण आवळ्याच्या तीन पाककृती पाहूयात
पहिला पदार्थ

आवळ्याचा छूंदा

साहित्य

  • चार मोठे आवळे ( याचा किस करून घेणे ) बरोबर एक वाटी होतो. जर आवळे आकाराने लहान असतील तर तुम्ही वाटीभर किस करण्यासाठी जास्त आवळे घ्या.
  • दीड वाटी बारीक केलेला गूळ
  • तीन लवंगा व एक काडी दालचिनी ( चाडसह पूड )
  • चवीनुसार काळे मीठ
  • एक चमचा जीरे भाजून पूड करणे
  • १/२ चमचा बडीशेप भाजून पूड करणे
  • एक चमचा लालतिखट
  • १/२ लिंबू

कृती

  1. आवळ्याचा किस करून घ्यायचा, त्यात दीड वाटी गूळ व मीठ घालून पातेल्यात किस एकत्र करून एक तास ठेवून द्यायचे. तासा नंतर मिश्रणाला पाणी सूटले असेल.
  2. मिश्रणाला पाणी सुटले असणार, ते आटवून त्याचा पाक तयार होईपर्यंत मिश्रण गॅस वर ठेवायचे. एकतारी पाक बास. पाक फार पुढे जावू द्यायचा नाही. कारण छूंदा खडखडीत होईल.
  3. आता पातेलं खाली उतरवून त्यात लवंग, दालचिनी, जिरेपूड, बडिशेप पूड, तिखट व लिंबूरस घाला व एकसारखे हलवून घ्यायचे. छूंदा गार झाल्यावर बरणीत भरून ठेवा. बाहेर चांगला टिकतो.

छूंदा तुम्ही उन्हात पण करू शकता.
गूळा ऐवजी साखर हवी असल्यास तेवढेच प्रमाण घेवून करा. मस्त लागतो छूंदा व आरोग्यास चांगले.
माझी मैत्रीण मिनल सरदेशपांडे हिने मला ही मूळ कृती सांगितली.
मी त्यात अजून दोन जिन्नसांची भर घातली ( लिंबूरस व बडीशेप )

आवळ्यांची आमटी

साहित्य

  • तीन आवळे बीया काढून फोडीकरून घ्यायच्या.
  • पाव वाटी तुरीची डाळ शिजवून ( शिजवताना त्यात हिंग, तूप, हळद घालायची )
  • सहा दाणे मेथीचे
  • कढीपत्ता( आठ ते दहा पाने )
  • िखट हिरवी मिरची ( काळपट सालीची ) तीन
  • कोथिंबीर चिरून पाव वाटी
  • चविनूसार मीठ
  • दोन चमचे तूप ( फोडणी साठी )

कृती

  1. आवळ्याचे तुकडे पातेलीत घ्या त्यात फोडी बुडतील एवढे पाणी घालायचे. त्यात मीठ व मिरची सुध्दा घालायची व मिश्रण झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे उकळत गॅस वर ठेवायचे. फोडी खूप शिजवायच्या नाहीत ( फोडी विरघळता कामा नयेत).
  2. कुकरमधे डाळ शिजवून घ्यायची ( हिंग, तूप, हळद ) शिजल्यावर थोडी घाोटून घ्यायचे वरण.
  3. फोडी जरा मऊ झाल्यावर त्याच पातेलीत वरण घालून आमटी गॅसवर उकळत ठेवायची. वरणाची चव पाहून मीठ घालायचे. आपण आवळा शिजवताना थोडे मीठ घातलेले आहेच.
  4. कढईत साजूक तूप घाला. ते तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, एक लाल मिरची, हिंग व कढीपत्ता घालून खमंग फोडणी करायची.
  5. आता वरणाच्या पातेलीत वरील फोडणी घालून आमटीला एक उकळी आणायची. वरून भरपूर कोथिंबीर घालायची व गरमगरम आमटी भाताबरोबर खायला घ्यायची

ही आमटी गूळ न घालताच चांगली लागते.
पण तुम्हाला गुळ हवा असेल तर एखाद खडा घालू शकता.
तर आमटी जरूर करा अफलातून चव लागते. 👍

आवळ्याचे सार

साहित्य

  • तीन आवळ्याच्या फोडी बीया काढून
  • एक वाटी भरून नारळाचा चव ( १/२ वाटी नारळाचा किस )
  • एक चमचा जिरे
  • चार ते पाच दाणे काळेमिरीचे
  • कढीपत्ता व कोंथिंबीर
  • साखर चमचा भर
  • दोन हिरव्या मिरचीचे तुकडे व एक सुखी लाल मिरची
  • मिठ चवीनुसार
  • दोन चमचे साजूक तूप किंवा खोबरेल तेल
  • फोडणीसाठी जिरे, हिंग, हळद

कृती

  1. नारळाचा किस ( चव ) काळी मिरी, आवळ्याच्या फोडी, मीठ, मिरची हे सर्व जिन्नस थोडे पाणी घालून गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचे.
  2. पातेलीत तूप गरम करून त्यात जिरे, हिंग,कढीपत्ता, किंचीत हळद, लालमिरची घालून चुरचुरीत फोडणी करायची. मिक्सर मधून वाटलेले मिश्रण त्या फोडणीत घालायचे. मिश्रणात पाणी घालायचे. साराला जेवढी घनता लागते तेवढे पाणी घालायचे. आता या सारात चवीनुसार मीठ व साखर घालायची. सार फार उकळवायचे नाही. गॅसवर सार असेल तेव्हा पळीने सार सारखे हलवत रहा.
  3. पातेलं गॅसवरून खाली घेतल्यावर सारात कोथिंबीर भरपूर घाला.

मस्त लागते चवीला जरूर करून बघा.
तीन्ही पदार्थ आवडतात का पहा. जरूर करून बघा. आवडल्यास अभिप्राय कळवा व माझा khamang by Shubhangi हे YouTube channel subscribe करा . 🙏🙏🙏

2 Comments Add yours

  1. Sharmila म्हणतो आहे:

    Very nice

    Like

  2. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

    👌Awala sohalyatil sarv jinnas uttam kele ahet,mi sar karun baghen🙏

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.