गरे घ्या गरे पोटाला बरे !!
हे मंगळागौरीचे गाणे तुम्हाला माहितच आहे. या गऱ्या च्या कृती विविध पाककृती तुम्ही ऐकून असाल. सांदण, फणस बिस्कीट, साठं, तळलेले गरे, घारगे, ही त्याची काही उदाहरणे. कच्या फणसाची भाजी आपण करतोच पण पीकलेल्या गऱ्याची भाजी कधी खाल्ली आहेत का ?
काल माझ्या मावशीने व रागीणी वहिनीने याची रेसिपी सांगितली. करायला सोपी व थोडक्या जिन्नसात होते ही भाजी. महत्वाचे म्हणजे भाजी रूचकर लागते.
साहित्य
- कापा फणसाचे गरे (आठळ्या काढून, गरे चार भागात उभे कापायचे) आठ ते दहा गरे
- एक वाटी भरून ओल्या नारळाचा चव
- चार लाल मिरच्या किंवा एक लहान चमचा तिखट
- एक चमचा तेल
- एक चमचा तीळ
- बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, गूळ

कृती
- कापलेले गरे बाऊल मधे घ्या त्यात लाल तीखट, गूळ , मीठ घालून अलगद एकत्र करा. गूळाचे प्रमाण कापा फणसाच्या गोडीवर ठेवा. फणस मीट्ट गोड असेल तर गूळ कमी घाला.
- कढईत फोडणी आधीच करून ठेवा. फोडणीत तेल तापल्यावर मोहरी, जीरे, हिंग व तीळ घालून चुरचुरीत फोडणी करा. ही फोडणी गार झाली की गऱ्यावर घालून ठेवा.
- पॅन मधे हे गरे घालून आपल्याला या भाजीस एक वाफ आणायची आहे. वाफ आल्यावर ही भाजी चमचा किंवा उलथण्याने हलवायची नाही. झाकण पॅनवर तसेच ठेवून वरखाली भाजी अलगद हलवायची म्हणजेच अवसडायची आहे. कारण गरा तुटतां कामा नये.
- भाजी खूप शिजवायची नाही. भाजी तयार झाली की डीश मधे घेवून त्यावर भरपूर नारळाचा चव घालायचा व कोथिंबीर पण.
कापा फणसाचे गरे करकरीत असतात त्यामुळे याची भाजी छान होते. करून पहा 👍👍
Very interesting 🙂
LikeLike
” Looks ” tasty till I taste it !😊
LikeLike