खरबुजामध्ये पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज खाल्याने शरीराचे तापमान सर्वसाधारण राखण्यास मदत होते. खरबूज पचायला हलके असल्याने खरबूज खाल्याने अपचन होत नाही. साखर मात्र 5% इतकी असते. खरबुजामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते.
साहित्य व कृती पाहूयात.
साहित्य
- एक मध्यम आकाराचे खरबूज ( त्याचे साल काढून तुम्ही चौकोनी किंवा उभ्या फोडी करून घ्या )
- सात ते आठ कोवळी पालकाची पाने. बारीक चिरायची.
- पाच ते सहा पुदीन्याची पाने ( बारीक कापून )
- तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे ( चिलीफ्लेक्स ही चालेल )
- १/२ (अर्धे लींबु )
- पाच ते सहा काळीमिरी ( कुटून घ्या )
- काळे मीठ (सैंधव मीठ) चवीनुसार
- भाजलेले सालासहीत दाणे पाव वाटी
- चीज पाव वाटी किंवा पनीर किसून पाव वाटी
कृती
बाऊल मधे खरबूजाचे तुकडे घ्या त्यात पालक व पुदीन्याची पाने बारीक करून घाला. काळीमीरी ची पूड, मीठ चवीनुसार, मिरच्यांचे तुकडे, दाणे, लिंबाचा रस व चीज हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्या.
पालक म्हणजे लोह, पुदीना ॲन्टीबॅक्टेरियल, लिंबू क जिवनसत्व, मीरी ॲन्टीइनफ्लेमेटरी, शेंगदाणे ( जिवनसत्व ). पाहिलत किती पौष्टीक कोशिंबीर आहे ही 👍.
माझी मैत्रीण रूक्मिणी हीने तीच्या मळ्यातील खरबूजे पाठवली आणि चॅलेंज दिल की काहीतरी वेगळी डीश कर . 😄👍
तीच्या मुळे आपल्याला ही डीश खायला मिळणार आहे 👍💖
Musk melon salad
It’s summer time ! we shall make musk melon salad to counter the heat. Melons have a significant amount of water content and hence help us regulate the body temperature. The sugar content is about 5%. They are also rich in Vit C and Vit A.
Ingredients
- one medium sized musk melon cut into vertical pieces
- Seven to eight fresh spinach leaves
- Five to six mint leaves, finely chopped
- Green Chili 3 , cut into small pieces( chili flakes can be used instead)
- ½ Lemon
- 5-6 seeds of black pepper coarsely pounded
- Black salt( Saindhav salt ) to taste
- Roasted ground nut ¼ bowl
- ¼ bowl Cheese or grated paneer
Method of preparation
Mix all the above mentioned ingredients in a container. Add the juice of half melon to it.
Mix well and serve a delicious and very nutritious serving !
Tantalizingly delicious!! 😊😊
LikeLike
खूप छान. एकदम सोपी रेसिपी
LikeLike