बाजार आमटी

करोनाच्या सावटाखाली आलेली अजून एक आषाढी संपली. आषाढी म्हणजे विविध ठिकाणाहून येणाऱ्या पालख्या. नाशिक, नगर बाजूकडून येणाऱ्या पालख्या पंढरपुरात येताना करकंब नावाचे एक गाव लागते. द्राक्ष शेतीसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या गावाची अजून एक खासियत आहे ती म्हणजे “बाजार आमटी”. पहिल्यांदा ऐकताना हे आमटीचे नाव काहीसे वेगळे वाटते. पाककृती साठी लागणारे पदार्थ सांगितल्यानंतर या नावाच्या व्युत्पत्ती विषयीशी मला माहित असलेला थोडाफार खुलासा करीन. आमच्या भागात अत्यंत आवडीने केला व खाल्ला जाणारा हा एक झणझणीत पदार्थ आहे.

साहित्य

  • मटकी डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ, मुग डाळ प्रत्येकी दोन मोठे चमचे(टेबलस्पून )
  • काळे तिखट दोन टेबलस्पून
  • गरम मसाला दोन टेबलस्पून
  • धने जिरे पावडर प्रत्येकी दोन टेबल स्पून
  • ब्याडगी मिरचीचे लाल तिखट दोन टेबलस्पून( या तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा)
  • सुके खोबरे दोन टेबल स्पून
  • कढीपत्ता सात ते आठ पाने,कोथिंबीर अर्धी वाटी.
  • दोन कांदे दोन टोमॅटो
  • लसूण पाकळ्या १४ ते १५
  • आल्याचा कीस एक टेबलस्पून
  • गोडेतेल एक मोठी वाटी

वरील सर्व प्रमाण दहा ते बारा लोकांना पुरेल एवढी आमटी करण्यासाठी आहे.

कृती

  1. प्रथम सर्व डाळी स्वच्छ धुऊन एकत्र करा. त्यात हिंग अर्धा टी स्पून, हळद अर्धा टी स्पून व डाळी पुरते पाणी घाला व कूकरमध्ये मऊ शिजवून घ्या.
  2. मिक्सरमध्ये कांदे टोमॅटो व कोथिंबिरीच्या ५-६ काड्या घालून त्याची पेस्ट करून घ्या
  3. आले लसूण व सुके खोबरे बारीक वाटून घ्या. घरी दगडी खलबत्ता उपलब्ध असल्यास त्याचा वापर केल्यास आमटीला एक वेगळीच चव येते. खलबत्ता नसल्यास मिक्सर वापरा.
  4. पातेल्यात वाटीभर तेल घालून ते तापले की मोहरी, हिंग, किंचीत हळद,जिरे घालून फोडणी करा. आता आले व लसूण यांची पेस्ट घाला. पेस्ट गुलबट होईपर्यंत परता. नंतर यामध्ये कढीपत्ता व कांदा टोमॅटोची पेस्ट घाला. घातलेल्या कांद्याला तेल सुटेपर्यंत हे मिश्रण परतायचे आहे.
  5. आता काळा मसाला, लाल तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला क्रमशः घाला. घातलेल्या सर्व मसाल्यांचा लालसर रंग येईपर्यंत हे मिश्रण खमंग परता.
  6. दीड लिटर पाणी घेऊन ते उकळा. हे उकळलेले पाणी पातेल्यातील मिश्रणात घालायचे आहे. आधणाचे पाणी घातल्याने सर्व मसाल्यांची चव पटकन एकत्र येते. आता चवीनुसार त्यात मीठ घाला.
  7. हे आमटीचे पाणी उकळल्यावर त्यात मिश्र डाळींचे वरण घोटून घाला. आता निवांतपणे आमटी चांगली खदखद उकळू द्या.

ही आमटी थोडीशी पातळच करायची असते. पाण्याचे प्रमाण थोडेसे अधिक राखले तरी चालते. आमटी भाकरी किंवा भात कशाबरोबरही खाऊ शकता. ही आमटी थोडीशी तिखटच व्हायला हवी. खाताना नाक कान लालसर होऊन डोळ्यातून थोडेसे पाणी आले कि आमटी जमली समजा. मगाशी नावा बद्दल सांगायचे कबूल केले होते. खेड्यापाड्यातून एखाद्या विशिष्ट दिवशी आठवडी बाजार भरतो. या आमटीला लागणाऱ्या सर्व डाळी अशा साप्ताहिक बाजारातच मिळतात. त्यामुळे साप्ताहिक बाजार च्या दिवशी केलेल्या खरेदीतून झालेली आमटी ती बाजार आमटी अशी एक व्युत्पत्ती सांगितली जाते.


पटकन पाहुणेमंडळी आल्यास, घरात भाजी उपलब्ध नसल्यास किंवा असलेली भाजी निवडायचा कंटाळा आलेला असल्यास सर्व डाळींची बाजार आमटी भाव खाऊन जाते. चविष्ट व पौष्टिक, घरातल्या उपलब्ध साधनात सहजपणाने होणारी आणि फारसा वेळ न खाणारी ही आमटी जरूर करा.

‘Baazar aamti’
One more ekadashi has gone by in this pandemic. Aashadhi Ekadashi signifies the arrival of palanquins in Pandharpur. These palanquins carry the images and footwear (paaduka) of saints who laid down the principles of Bhakti in Maharashtra since the 12th century. They arrive from various places of worship, where devotees have constructed shrines in their memory.
The ones arriving via Nashik and Ahmednagar pass through Karkamb village. This village is known for the cultivation of grapes. Another specialty of this village is ‘Baazar Aamti’.
When I heard the name of this dal preparation, it sounded weird to me. But the meaning became quite clear, once I saw the ingredients that go into it.
I’ll definitely explain you the probable meaning of the name and its appropriateness later.
Let’s see what all ingredients are required to make this unique and spicy preparation of mixed pulses, which is an all time favorite, and is savored with much delight in our region.
Ingredients:
1) 2 tbsp each of matki dal (split moth bean), toor dal (split pigeon pea), masur dal (red lentils), chana dal (split Bengal gram), moong dal (spilt green lentils without the husk)
2) 2 tbsp Kaala masala (a special type of spice mix used on the Deccan plateau)
3) 2 tbsp Garam masala
4) 2 tbsp each coriander and cumin powder
5) 2 tbsp byadgi chilly powder (A kind of chilly grown in Karnataka, which is less spicy, but imparts color to any preparation.) The quantity may be adjusted as per one’s taste.
6) Dry coconut (not Dessicated)
7) tomatoes and onions 2 each
8) 7 – 8 Curry leaves, half bowl (small) fresh coriander leaves
9) 14 – 15 garlic cloves
10) 1 tbsp grated ginger
11) 1 big bowl groundnut oil

Method:
1) Wash all the pulses and mix them. Add half tsp each asafoetida and turmeric powder, and water (just enough to soak them) to pressure cook the dals till soft.
2) Blend onion, tomato, curry leaves and coriander together in a mixie.
3) Grind ginger, garlic and dry coconut together (Preferably in a stone mortar and pestle. It enhances the taste).
4) Heat oil in a large pan, let the mustard seeds splutter. Add asafoetida, little bit of turmeric powder (since we’ve already added some to the dals while cooking them), cumin. Add the ginger-garlic-coconut paste. Sauté till it changes color. Add the onion n tomato paste. Sauté till the mixture leaves oil.
5) Now add kaala masala, red chilly powder, coriander and cumin powders (in the order mentioned). Sauté till the mixture turns red and smells piquant.
6) Take one and a half lts water in a vessel and bring it to boil. Add this hot water to the masala mix in the pan. Adding hot water binds the spice well. Now add salt to taste.
7) Bring this spice mixed water to boil. Mash the cooked dal and add it slowly to the boiling mix. Let the ‘Aamti’, thus prepared, boil on a low flame for a while.
This aamti is of thin consistency. So, you may increase the quantity of water a little more.
This aamti may be served with bhaakri or rice.
It has to be more spicy than usual. The best indication of the aamti having the right taste is, when your nose and ears turn red and eyes become watery!
As I had promised you in the beginning, let’s come to the meaning part of the dish.
Weekly markets are held in small towns. Otherwise, you cannot buy vegetables or other things in any day you wish. The ingredients required for this dish can be bought only at such weekly markets, called ‘baazar’ in local terms. So, the dal preparation made using these ingredients is called ‘baazar aamti’.
This dish can be made in contingencies like sudden arrivals of guests, non availability of vegetables, or sheer laziness. Tasty and high on nutrition, this dal/aamti can be made with ingredients easily available in the kitchen.

English Translation: Mrs Sharvari Khatavkar.

6 Comments Add yours

  1. डाॅ. अ भा हरके म्हणतो आहे:

    काळे तिखट दोन टेबलस्पून, गरम मसाला दोन टेबलस्पून, धने जिरे पावडर प्रत्येकी दोन टेबल स्पून, ब्याडगी मिरचीचे लाल तिखट दोन टेबलस्पून…….अरे बापरे !काय चाललंय हे? हे तर पंढरपुरी झणझणीत मिश्रण !! छान असणारच ! पण हे वाचूनच आमचा जठराग्णी आगीच्या लोळात रूपांतरीत झाला. यासाठी “तेथे पाहिजे जातीचे !” !! आमच्यासारख्या मरतुकड्यांसाठी हे नव्हे!
    पण व्हिडिओ पाहिल्यानंतर तोंडास पाणी न सुटले तरच नवल! आधी दोन – चार रॅनटॅक ( Rantac) घेऊन आडवा हात मारावयास हरकत नाही!😊😊
    ( Quality of VDO… very good!)

    Liked by 1 person

  2. रमेश घळसासी पत्रकार नगर पंढरपूर म्हणतो आहे:

    पंढरपूरात ठराविक ठिकाणी मिळणारी करकंबच्या प्रसिद्ध बाजार आमटीच्या मूळ रेसिपी नुसार आमटी करणं म्हणजे महाजिकीरीचे काम ! कितीही मोठ्या खानसाम्याने ही बाजार आमटी केली तरी काही तरी कमतरता उरतेच !! पण सौ. शुभांगी वहिनींनी अशी कोणतीही कमतरता यात ठेवली नाही. सुदैवाने याचा गरम-गरम आस्वाद घेण्याचे भाग्य मिळाले !!
    “परफेक्ट” शिवाय दुसरा कोणताही शब्द सुचत नाही. 👍👍

    Liked by 2 people

  3. सविता धारुरकर म्हणतो आहे:

    झणझणीत ,रसरशीत,तर्रेबाज …..आहाहा… आणखी शब्दच सुचत नाहीत.

    Liked by 1 person

  4. Dr Shantanu Abhyankar म्हणतो आहे:

    भारीच की. अक्षरशः तोंडाला पाणी सुटले.

    Liked by 1 person

  5. विनायक तेलंग म्हणतो आहे:

    वा तोंडाला पाणी सुटले. खूप दिवसापासून खायची आहे.

    Liked by 1 person

  6. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

    khup mast ya amatila bajar amati ka mhanatat ha prashna padayacha aaj uttar milale

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.