मठ्ठा म्हटले की दह्याचे ताक डोळ्यांसमोर येते. उन्हाच्या झळा तीव्र होवू लागल्या आहेत. त्यामुळे गार मठ्ठा आपली तृष्णा शमवतो.
आपण आज मठ्ठा ताकाचा नव्हे तर कैरीचा करणार आहोत. चला तर साहित्य व कृती पाहूया.
साहित्य

- कैरीचा कीस मोठा एक चमचा ( कैरी जर चांगलीच आंबट असेल तर एक चमचा कीस पुरेल ) नाहीतर दोन चमचे कीस लागेल
- १/२ नारळाचा चव ( खोबरे )दोन तास गरम पाण्यात भिजत ठेवा, मग त्याचे दूध काढायचे. एक वाटी घट्ट दूध मिळेल.
- पाच ते सहा पाने पुदीन्याची
- एक चमचा भरून कोथिंबीर चिरलेली
- अर्ध्या मिरचीचे तुकडे
- सैंधव मीठ एक टीस्पून ( चवीनुसार ठरवा )
- एक चमचा खडी साखर
- एक टीस्पून जीरेपूड
- अर्धा टीस्पून आले (कीसून)
- एक ग्लास पाणी ( गार पाणी घ्या )
( या साहित्यात दोन मोठे ग्लास मठ्ठा होईल )
कृती
- कैरीचे साल काढून कैरीचा कीस करून ठेवायचा, नारळाचे दूध मिक्सर मधून काढून गाळून घ्यायचे, मिरची, आल, कोथिंबीर, मिरची, पुदिना यांची पेस्ट करायची. जीरे पूड करून ठेवायची.
- आता मिक्सरच्या भांड्यात नारळाचे दूध, कैरीचा कीस, पाणी, ( आले, मिरची, पुदिना, कोथिंबीर वाटेलेले ) जीरे पूड, खडीसाखर, सैंधव मीठ हे सर्व घालून चांगले फिरवायचे.
- मिश्रण गाळून घ्यायचे. आता चव पाहून कमीजास्त जीन्नस मठ्ठ्या मधे घालून प्यायला घ्यायचे.
या मठ्ठ्यास आपण व्हीगन मठ्ठा म्हणूयात.
नविन व चविष्ट मठ्ठा तुम्ही जरूर करून पहा.
आवडल्यास प्रतिक्रिया कळवा 🙏👍
एक स्वादिष्ट टीप: चव वाढवायची असल्यास थोडी हिंग पूड किंवा चाट मसाला भुरभुरा .
फारच सुंदर विणा
उन्हाळा सुरु झाला आहे व कैरीच्या ताकाने तू थंडावा आणला आहेस .
Looks tempting 👌😋
करुन बघतो 😊
LikeLiked by 1 person
नवीन प्रकार, नक्कीच करून बघायला आवडेल
LikeLike
मस्त आयडिया😊
LikeLiked by 1 person
ekdam mast👌
LikeLike