कृष्ण म्हणे मातेला
आम्ही जातो वनात मथुरेला,
दे काही खायाला
लाडू अथवा हातात कानवला !! ( मोरोपंत )
घराघरातले कृष्ण आपापल्या मातेला लाडू मागतात. लाडू मागण्याचे काम एक मिनिटाचे पण ते पुर्ण करायला एवढे तरी सोपस्कार लागतात. रवा नारळ लाडू व रवा बेसन लाडू हे दोन्ही प्रकारचे लाडू करताना पाक आवश्यक आहे. हे पाकाचे गणित जमलं तर लाडू सुरेखच होतो. एकतारी पाक, दोनतारी पाक, गोळीबंद पाक अशी पाकांची नावं ऐकली कि पाकी सैन्याचा हल्ला झाल्यासारखे होते. मी ही याला अपवाद नाही. पहिले काही दिवस लाडू टणक तरी होत असत, नाहीतर वाटी चमच्याने घेऊन खाण्यासारखे तरी होत ! याचा सुवर्णमध्य गाठायला काही काळ घालवावा लागला. माझ्या मुलाला रवा खवा नारळ हेच लाडू फक्त आवडतात. त्यामुळे ते वारंवार करून माझी पाकाची भीती गेली. आणि डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर सरांच्या भाषेत सांगायचे तर “शुभांगी च्या लाडूची कुठेही शाखा नाही” इथपर्यंत प्रगती झाली.
माझ्या वाचण्यात “ब्राह्मणी स्वयंपाक” या नावाचे वसुधाताई गवांदे यांनी लिहिलेले एक पुस्तक आले. या पुस्तकात रवा नारळ खवा याचा लाडू बिन पाकाचा कसा करायचा याची कृती मी वाचली. या कृतीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यात तुपावर रवा भाजायला लागत नाही आणि नारळ सुद्धा भाजावा लागत नाही. जरा आश्चर्य वाटले आणि कुतूहलापोटी लाडू करून पाहिला आणि तो अप्रतिम झाला. ज्यांना कोणाला पाक करायची भीती वाटते त्यांच्यासाठी हे एक वरदानच आहे. चला तर मग आपण याची कृती बघूया.
साहित्य
- एक वाटी बारीक रवा
- एक वाटी खवा (५० ग्रँम )
- एक वाटी खोवलेला नारळ
- एक वाटी पिठी साखर
- दोन टीस्पून वेलचीपूड
- तीन ते चार केशराच्या काड्या( ऐच्छिक)
कृती
- रवा, खवा आणि ओला नारळ वेगवेगळ्या भांड्यात ठेवून त्याच्यावर झाकणी ठेवून प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढाव्या. अर्थात कुकरच्या तळात नेहमीप्रमाणे पाणी घालायला विसरू नका . भांड्यात मात्र अजिबात पाणी घालायचे नाही .
- कुकरचे प्रेशर गेल्यावर रवा व खोबरे गार करत ठेवा. खवा मात्र पँन मध्ये घेऊन गॅसवर मंदाग्नी भाजा.खव्याचा रंग गुलबट होईपर्यंत व खमंग वास येईपर्यंत भाजणे.
- आता गार झालेले खोबरे व रवा भाजलेल्या खव्यात मिक्स करायचे. मिक्स करताना वेलची पूड घालायची. हे सर्व मिश्रण हाताने चांगले मळून घ्यायचे. जेणेकरून लाडू हा सहज वळता आला पाहिजे. हे मिश्रण आता गार करत ठेवा.
- मिश्रण गार झाल्यावर आता त्यात पिठीसाखर घालून मिश्रण परत एकदा मळून घ्या आणि लगेच लाडू वळायला घ्या. सुंदर लाडू होतात. या लाडवाला ना तुपाची गरज , ना पाकाची गरज, ना भाजायची गरज.
- वरील प्रमाणात एकूण तेरा लाडू होतात, पेढ्या पेक्षा मोठा आणि नेहमीच्या आकारापेक्षा छोटा. हे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे आपण हल्ली Diet Conscious झालो आहोत. म्हणून एक लाडू पटकन तोंडात टाकायला आणि भूक भागवायला हा आकार अगदी योग्य आहे.
खूप सोपी पाककृती आहे,
करून बघायला हरकत नाही
LikeLike
खूप छान कल्पना आहे, एकदम छान, innovative ladoo..
सोपेहीं आहेत करायला.
LikeLike
ekdam sopi kruti ahe ….karun baghen….
LikeLike
Khup sopi kruti ahe
LikeLike
छान.
नारळाची वाटी का वाटीभर खोबरे?
LikeLike
वाटी भरून खोबरे
आणि खवा गुलबट भाजला की लगेच त्यात नारळ व रवा घालून मळून घ्या .
हे मिश्रण गार झाल्यावर पिठीसाखर व वेलची घालून परत मळून घ्या आणी लाडू वळा 👍👍
LikeLike
Khupch chan ahe ladoo recipe. Next time karnar …tumchya saglyach recipes khup chan & easy astat..mi try karat aste. Gulamba pan kela mast zala….thank you..🙏🙏😊
LikeLiked by 1 person