आवळी सावळी

कार्तिक शुध्द चतुर्दशीला “वैकुंठ चतुर्दशी” म्हणून ओळखले जाते. अश्विनी पौर्णीमे पासून वैकुंठ चतुर्दशी पर्यंत आमच्याकडे आवळी पूजन करतात. रृतूमाना प्रमाणे आपण आपल्या आहारात योग्य बदल करावेत यासाठी आपल्याकडे अनेक धार्मिक परंपरा आवर्जून पाळल्या जातात. हेमंत रृतू मधे आवळ्याचे सेवन करणे आरोग्यवर्धक असल्याने या आवळी भोजनाला एक वेगळे महत्व आहे.

॥आवळी आवळी सदा सावळी
राधाकृष्ण तुझ्या जवळी
नाव घेतां आवळींचे
पाप जाईल जन्माचे ॥

या पारंपारिक गोष्टींचे स्वत:चे असे महत्व आहे .त्या आपले सांस्कृतिक विश्व समृध्द करीत राहतीलच, पण त्याच बरोबर “शरीरमाध्यम खलू धर्मसाधनम्”. हे पण आपण लक्षात ठेवले पाहिजे.
आवळा हा क जीवनसत्वाने परिपूर्ण आहे. आवळ्याचे सेवन केल्याने कफ, पित्त, वात हे त्रिदोष जातात अशी आयुर्वेदाची धारणा आहे. केस व त्वचा कांतीमान ठेवण्या साठी आवळा जरूर वापरावा. आवळ्यात कर्करोग प्रतिबंधक शक्ती असल्याचे मानले जाते.
अमृत फळ आवळ्याच्या काही कृती आता सांगते आहे. तुमचा हा हिवाळा आरोग्यदायी जावो ही शुभकामना.

मोहरी फेसुन आवळा लोणचे

साहित्य

  • १५  आवळे
  • १/२ वाटी लोणच्याची लाल मोहरी
  • १/२ वाटी लाल तिखट
  • ३ चमचे मेथीची पूड
  • १ चमचा हिंग, गूळ व खमंग फोडणी

कृती

  1. आवळे थोडेसे वाफवून घेतले, गार झाल्यावरच चार फोडी करून घेतल्या.
  2. मोहरी रात्रीच भिजत घातली. सकाळी ती मिक्सरवर वाटून घेतली. मोहरी चढण्या साठी १ छोटा चमचा गूळ फेसताना घाला. मेथी खमंग तळून पूड केली .
  3. आता आवळ्यात फेसलेली मोहरी, मेथी पूड, लाल तिखट, चवीनुसार मीठ, घालुन कालावल. 
  4. १/२ वाटी तेलाची हिंग हळद घालुन फोडणी केली व लोणच्यात घातली .
  5. मी यावेळेस लिंबाचा रस पण ३ चमचे वापरला मस्तच चव आली (आंबट तुरट व गोड तिन्ही चव हवी असेल तर वरील प्रमाणा मधे १ वाटी गूळ घाला). आवळे वाफवून न घेतां किसून पण लोणचे घालता येते.

करा व आवडते का बघा 😊
जर हे लोणचे खूप दिवस टीकावयास हवे असेल तर मोहरी फेसताना लिंबु रस घालून मोहरी फेसावे.

आवळा ज्यूस , किंवा आवळा starter

साहित्य

  • ५ आवळे फोडी किंवा किसून
  • ६ पाने पुदीन्याची
  • २ काड्या कोथिंबीर
  • १ चमचा जिरे पूड (भाजून जिरे पूड)
  • २ ग्लास पाणी
  • चविनुसार मीठ  (सैंधव)

कृती

  1. प्रथम आवळा धुवून कोरडा करा मग किसून अथवा फोडी करून घ्या.
  2. मिक्सर मधे पाणी, कोथींबीर, मीठ,  साखर,  पुदीना पाने, जीरे, घालून फिरवा.
  3. एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे. आता गाळून मस्त जुय्स तयार.

आवळा सुपारी

साहित्य

  • १ किलो आवळे
  • १०० ग्रॅम आल
  • २ चमचे जिरे पूड
  • १/२ वाटी मीठ

कृती

  1. आवळे धुवून कोरडे करा मग किसून घ्या.
  2. नंतर त्यात आल किसूनघाला.
  3. आता आवळ्याचा किस, आले, मीठ, जीरे पूड, एकत्र कालवा.
  4. मोठ्या ताटात किस पसरवून खडखडीत वाळवा.

😀 हि सुपारी बरणीत अर्धेीच भरली जाते . कारण वाळे पर्यंत सुपारीचा फडशा उडतो .

मेथांबा प्रमाणे आवळ्याचे लोणचे उत्तम लागत.

थोडक्यात सांगते, आवळे उकडवून बिया काढून फोडी करायच्यात. कढईत तेल तापवून त्यात मेथी, मोहरी, जीरे, हिंग, हळद , कढीपत्ता व सुक्या लाल मिरची घालून खमंग फोडणी करायची. मग त्यात आवळ्याच्या फोडी घालायच्या, मिठ व गूळ हे आपल्या चविनुसार घाला. गुळ विरघळला की एक उकळी आणायची व गॅस बंद करायचा.


आगामी आकर्षण ……… उसळ
होय
ऊसळच पण कश्याची🤔?

9 Comments Add yours

  1. शिल्पा गोरे म्हणतो आहे:

    आवळा पाककृती.छान.आवडल्या.

    Like

  2. meghamilind म्हणतो आहे:

    सुरेखच , नक्की करून बघणार

    Like

  3. Sanjivani म्हणतो आहे:

    Avalyacha methamba ! Mast kalpana ! Itarhee krutee chhan !

    Like

  4. Sumedha Sanjay Deshpande म्हणतो आहे:

    Superb recipie dilya aahes Shubhangi
    Pics are amazing 😍

    Like

  5. Hemant Kulkarni -USA म्हणतो आहे:

    आवळ्याला इंग्रजीत ‘इंडियन गूसबेरी’ असे म्हणतात व ती इथे परदेशात ताजे फळ म्हणून विकत मिळत नाही -हे दुर्दैव येथील फोटोंवरून आणि कृतींवरून अधिक जाणवले (हे कौतुकाचे गाऱ्हाणे होय). सुपारी बरणीत फक्त अर्धी भरली जाते कारण तसे कारण्यापूवीच ‘तिचा फडशा पडतो’, -असे सांगण्याप्रमाणे. ‘पदार्थ आणि भाषा सौंदर्य’ एकजीव झाले म्हणजे ते अधिक मुरतात आणि चव जन्मभर जिभेवर राहते. ………भारतातून निर्यात केलेली विकतची आवळा सुपारी अमेरिकेत मिळते परंतु तुमची घरगुती सुपारी दुरापास्त (दूरची गोष्ट’ अश्या अर्थाने). ‘कैरीचा मेथांबा’ चवीला जवळपास असाच लागत असावा -ह्या गैरसमजात मात्र समाधानात कारण कच्या कैऱ्या इथे बाराही महिने मिळतात, दक्षिण अमेरिकेच्या कृपेने.

    हेमंत कुळकर्णी,
    अमेरिका

    Like

  6. मृण्मयी रानडे म्हणतो आहे:

    आवळ्याचा मेथांबा आवडलाय, करतेच लगेच. गोड कँडीही मस्त लागते. आणि आलं घातलेला कीसही.

    Like

  7. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

    great seasonal receipe. nakki karun baghen.

    Like

  8. Atul dattatraya jadhav म्हणतो आहे:

    Good morning madam 🙏🙂
    Aaplyala srv recipe khup chan astat.
    Aavala ha gunkari ahe. Aarogyachya drushtine khup labhdai ahe. Ani aapn banavalelya srv recipe me. Aai kadun banavato. Aani mazya friends na pan recipe pathavato. 🙏🙂
    Aapan banavalele aavalyache srv padharth khup chan ahe…thanks 🙂🙏

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.