उडदाचे लाडू – विठू माऊलीचा धुंधुरमासातला खास आहार

धुंधुरमासाला धनुर्मास असे देखील ओळखले जाते. सूर्य ज्या वेळेला धनु राशीत असतो, त्या महिन्याला ‘धुंधुरमास’ म्हणून ओळखले जाते. या महिन्यात भल्या पहाटे उठून देवाला नैवेद्य दाखवायची फार प्राचीन परंपरा पंढरपुरात आहे. यंदा 16  डिसेंबर पासून धुंधुरमासाला प्रारंभ झाला.  मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीपर्यंत धुंधुरमास असतो.   उत्तम खाणे आणि शरीर बळकटीचा काळ या कालावधीत हेमंत…

वैभवशाली नवरात्र: अश्विन पौर्णिमा

 मंडळी नमस्कार,   आज या आपल्या मालिकेची सांगता करीत असताना मी खूप समाधानी आहे.  दहा दिवस कसे गेले ते समजलेच नाही. श्री रुक्मिणी पांडुरंगाचे अनुपम सौंदर्य व वैभव शब्दबद्ध करणे सोपे नव्हते. रुक्मिणी मातेनेच ते माझ्याकडून करून घेतले अशी माझी श्रद्धा आहे.  या निमित्ताने पंढरपुरातल्या एका वेगळ्या व समृद्ध परंपरेचा परिचय आपणा सर्वांना करून देता आला. …

वैभवशाली नवरात्र : कोजागिरी पौर्णिमा

मंडळी नमस्कार,   श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या पंधरा दिवसांच्या नवरात्रातील आजचा एक वैशिष्ट्यपूर्ण दिवस.  श्री रुक्मिणी मातेला एकदा श्रीकृष्णाचे बालरूप बघायची इच्छा निर्माण झाली.  हे बालरूप म्हणजे गोकुळात बासरी वाजवणारे मनोहर रूप.  श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेचा हा हट्ट पुरवून तिला ज्या रूपात दर्शन दिले त्याच रूपात म्हणजे देहुडाचरणी मुद्रेत श्री रुक्मिणी मातेचा साज केला जातो.  एका परीने आज…

वैभवशाली नवरात्र : एकादशी

मंडळी नमस्कार,  आज अश्विन शुद्ध एकादशी.  आज विठ्ठलाला आणि रुक्मिणीला दोघांनाही नेहमीचाच वेश परिधान केला गेला आहे.  त्यामुळे त्याचे फारसे विवेचन आज करत नाही.  आज परिवार देवतांपैकी अजून एक महत्त्वाची देवता म्हणजे शहराच्या उत्तर भागात असलेली लखुबाई. इथे मंदिर नदीकाठी आहे.  मंदिरासमोर उभे राहिले की चंद्रभागेचे विहंगम दृश्य दिसते.  पैलतीरी असलेला इस्कॉनचा  घाट देखील दिसतो…

वैभवशाली नवरात्र : दशमी

मंडळी नमस्कार,  आज अश्विनी शुद्ध दशमी. आज पारंपरिक नवरात्र संपला असलं तरी श्री रुक्मिणी पांडुरंगाचे नवरात्र हे पौर्णिमेपर्यंत चालणार आहे.  आज  श्री रुक्मिणी देवीला प्रतिपदेचाच सर्व साज घातला आहे . त्यामुळे त्याचे सविस्तर वर्णन न करता त्याऐवजी पंढरपूर परिसरातील महत्त्वाची परिवार देवता पद्मावती याविषयी अधिक माहिती पाहूया.आजपासून पांडुरंगाला नेहमीचाच वेष असणार. रुख्मिणी मात्र दागदागिन्यांनी नटलेली…

वैभवशाली नवरात्र : विजयादशमी

मंडळी नमस्कार,  आज दसरा. आज रुक्मिणी मातेस विजयालक्ष्मी पोशाख व साज  आहे. पारंपरिक नवरात्राची सांगता जरी आज होत असली तरी या लेखमालेच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणीचे नवरात्र पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. दसऱ्याचा आजचा सणअसत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.आजचा रुक्मिणी मातेचा पोशाख कसा आहे ते पाहूया. जडावाच्या मुकुटावर खड्यांची वेणी आहे.  वेणीला माणकाचे सुंदर फुल…

वैभवशाली नवरात्र : माळ नववी

मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥ ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥ मंडळी नमस्कार,  आज मातेने दुर्गा मातेचे रूप धारण केले आहे. आज तिथीने सकाळचा थोडा वेळ अष्टमी व दुपारनंतर नवमी आहे.  आज तिला लाल काठ असलेली पांढरी स्वच्छ पैठणी नेसवण्यात आली आहे.  आजच्या मुकुटाचे  वैशिष्ट्य म्हणजे…

वैभवशाली नवरात्र : माळ आठवी

मंडळी नमस्कार, अशीच आंबे हास माझ्या दारी हास ग..  जन्मोजन्मी दास व्हावे हीच माझी आस ग ! आज अष्टमी. आजचा पोशाख कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आहे. आज रुक्मिणीच्या अंगावर एकंदरीत २७ दागिने आहेत. आजचा तिचा पोशाख ‘खडा पोशाख‘ प्रकारचा आहे. आज तिला गुलाबी रंगाची पैठणी नेसवली आहे. सर्वात प्रथम मुगुट आहे, खड्याची वेणी आहे, पारंपारिक बाजूबंद मुकुटात…

वैभवशाली नवरात्र : माळ सातवी

मंडळी नमस्कार,   आजची सातवी माळ. नवरात्राचे नऊही दिवस श्री रुक्मिणी पांडुरंगाला  पंचपक्वानांचाच नैवेद्य असतो. फक्त एकादशी दिवशी उपवासाचा नैवेद्य दाखवला जातो.  श्री पांडुरंगाच्या नैवेद्यात कायम बटाट्याची भाजीच असते मात्र रुक्मिणीच्या ताटात त्याचबरोबर वांगी, भेंडी ,गवा,र घेवडा , कोबी इत्यादी  इतर भाज्यांचाही समावेश असतो.  दिवाळीपर्यंत पंचपक्वानात श्रीखंडाचा समावेश असतो.  दिवाळीनंतर बासुंदी असते आणि अक्षय तृतीयेपासून  आमरस…

वैभवशाली नवरात्र : माळ सहावी

मंडळी नमस्कार, आज रुक्मिणीमातेने तुळजाभवानीचे रूप धारण केले आहे.  तुळजाभवानी म्हटले की आपल्याला  महिषासुरमर्दिनी आठवते.अर्थातच दैत्य संहार करत असल्याने हे रूप रौद्र असते.  तुळजापूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक. या शक्तीपीठात वास करत असलेल्याया वीर तत्वाचा सन्मान करण्यासाठी रुक्मिणी माता आज हे रूप धारण करते.  बाहेरून हे रूप  तुळजामातेचे असले तरी अंतरंगी माता ही नेहमीप्रमाणे  समाधानी…