एक अनुभव असाही

मंडळी नमस्कार आज खूप दिवसांनी आपली भेट होत आहे. नवरात्र, दिवाळी, कार्तिक वारी, सर्वगोष्टीत दंग होते. मधेच आम्ही इटलीची सैर करून आलो. आल्हाददायक हवा, प्रसन्न चित्तवृत्तीचेनागरिक , देखणी व तंदुरूस्त ( फीट ) माणसे, पीझा, पास्ता व वाईन यांचा मनोसोक्त आस्वाद घेणारा हा देश. In Italy , they add work & life on to food…

खमंग एक वर्षाचा होताना ……..

तुमचा आमचा खमंग संवाद सुरू होवून बघतां बघतां एक वर्ष झाले. या वर्षात आपण सव्वीस वेळा भेटलो. कै दुर्गा बाई भागवत यांनी स्वयंपाक घर व संस्कृती यांतील भावबंध अनेकवेळा त्यांच्या खास शैलीने उलगडून दाखवले आहेत. आपल्या कडे स्वयंपाक हे नुसते काम नसून तो एक सर्व ज्ञानेद्रींयांचा आनंद सोहळा असतो. या वर्षभरात १५९७३ रसिक खव्वयांनी २७४५०…

हुजुर के लिये खजूर !

१८५२ घोंगडे गल्ली, हा पत्ता गेले २५ वर्ष सतत लिहीत, सांगत व रहात आले. या गल्लीतील आमचा तीन मजली वाडा. घराची ओळख म्हणजे कै. बाबुराव जोशी यांचे घर. गणेश वामन जोशी ( बाबा ) हे केवढे महान व्यक्तिमत्व होते हे लग्न होऊन आल्यावर कळले. आजमितीला घराला १०० ते १२५ वर्ष पूर्ण झाली. या वास्तूने ५६…

पंचमी सामाजिक सौहार्द्राची !

फांद्यांवरी बांधिले ग मुलींनी हिंदोले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले जळ भरे पानोपानी संतोषली वनराणी खळाखळा वाहतात, धुंद नदीनाले पागोळ्या गळतात बुडबुडे पळतात भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले गीतकार ग दि माडगुळकर, संगीत व स्वर गजानन वाटवे यांचा. पुर्वी नागपंचमीच्या सुमारास हे गाणे आकाशवाणीवर हमखास लागायचे. वाटव्यांचा सुरेल व भावोत्कट स्वर श्रावणातल्या नागपंचमीचे चित्र…

भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद ॥

सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर ह्रदयी माझे ॥ अशी आस धरून हजारो भाविक प्रतिवर्षी पंढरपूर ला येतात. आषाढी कार्तिकीत ही भाविकांची संख्या काही लाखांपर्यंत जाऊन पोहचते. लाखो भावीक व दर्शनाचे तास मात्र दिवसात चोवीसच. मग देव ही जास्तीत जास्त भक्तांना दर्शन व्हावे म्हण कंबर कसतो. एकादशीच्या मुख्य दिवसाच्या आधी देवाचे नवरात्र बसते म्हणजे देव…

आम्रयात्रा २

आंब्याचे सांदण जसे फणसाचे सांदण करतात त्याच प्रकारे आंब्याचे सांदण करता येते. फणसाचे सांदण करायचे म्हणजे खूप सारी पूर्व तयारी लागते. दोन दिवस आधी तांदूळाची कणी किंवा तांदूळ धुवून पसरवून ठेवायचे. हडकले की त्याचा रवा काढून ठेवायचा. मग चांगला बरका फणस तो सुध्दा भरपूर गर असलेला बघून ठेवायचा. मोदक पात्र काढून ठेवणे, त्यावर लागणारे ताटली…

आम्रोत्सव

स्मोकी आंबा पन्हे विचीत्र वाटतय ना एेकायला ,पण चव मात्र अफलातून लागते. हा सर्व प्रयोग मी स्वतः केला आहे. सहज विचार आला कैरीचे पन्हे आपण भाजून करतो मग पिकलेल्या आंब्याचे करून बघायला काय हरकत ? लगेच कामाला लागले. पूर्ण सुरकुतलेला पिकलेला आंबा न घेतां आढीतला कमी पिकलेला आंबा घेतला. चला साहित्य व कृती बघूयात. साहित्य…

कोयाडं

नावावरून कोईचा काहीतरी विचीत्र प्रकार असणार अशी माझी पूर्ण खात्री होती. पूर्ण मे महिना कोकणात आजीकडे लहानपणी सुट्टीत जायचो. भरपूर आंब्याची, फणसाची, नारळ , कोकम, यांची झाडे अवतीभोवती होती. परत लागात मामाने ८०० कलमं हापूस आंब्याची लावलेली, त्याच्या सोबत काजूची पण झाडे. केळी तर परसदारी होत्याच. विहिरीजवळ चमेलीचा मांडव, कडेला अबोली, गावठीगुलाबाची झुडूपे, कातरलेली जास्वंद,…

खापरपोळी

काही कारणाने आई माझ्या कडे आली होती. ८ मार्च च्या दिवशी आम्ही गप्पा मारत बसलो होतो. ” काही पदार्थ काळा आड गेलेले ……तुला तुझ्या आई ने खायला दिलेले पण तो पदार्थ तु कधीच केला नाहीस आणी तो आपल्याला करता आला नाही याची रूखरूख वाटते असा कोणता विशेष पदार्थ तु मला सांगशील. ” क्षणाचाही विलंब न…

कोशिंबीर

सध्या देशांत निवडणूकीचा हंगाम सुरू झाला आहे. शेकडो पक्ष, त्यांचे हजारो पुढारी व त्यांना निवडणारे आपण कोट्यावधी. या सर्वांच्या सरमिसळीने होणारी निवडणूक प्रक्रिया पाहिली की आठवण होते ती कोशिंबीरीची. ही कोशिंबीर आधंळी न होता ती डोळस पणे करणे हे आपले घटनात्मक आद्य कर्तव्य. या माहोलात मला कोशिंबीरीचे विविध प्रकार सुचले त्यात नवल ते काय ?…