जवस व जवसाची चटणी खाण्याचे फायदे – जवस हे एक वनस्पती-आधारित प्रकार आहे जे आरोग्यासाठी चांगली चरबी, अँटीऑक्सिडेंट्स आणि फायबर पुरवते. हे पीक प्राचीन इजिप्त आणि चीन मधून आलेले आहे. आशियात खंडा मध्ये हजारो वर्षांपासून आयुर्वेदिक औषधात याचा वापर केला जातो.
आजच्या काळात जवसाचे बी हे बियाणे, तेल, पावडर, गोळ्या, आणि पीठाच्या स्वरूपात मिळते. बद्धकोष्ठता, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, कर्करोग आणि आरोग्याच्या इतर समस्या टाळण्यासाठी लोक आहारात जास्ती करून चटणीचा वापर करतात. वरील माहिती google वरून घेतली आहे.
साहित्य

- अळशी/जवस 2 वाट्या
- तीळ 1 वाटी
- शेंगदाणे 1 वाटी
- कढीलिंबाची पाने 1 वाटी
- लाल सुक्या मिरच्या 8 ते 10
- चिंच एक लिंबाएव्हढी
- मीठ चवीनुसार
- तेल 2 चमचे
- जिरे 2 चमचे
कृती
- जवस चांगले पाखडून व चाळून घ्यायचे. आता जवस, तीळ, कढीलिंब, मिरच्या दाणे हे क्रमाने वेगवेगळे खंमंग भाजून घ्यायचे.
- कढईत तेल घ्या. ते गरम झाल्यावर त्यात जीरे व हिंग तडतडून घ्यायचे. आता चिंच चांगली खरपूस परतून घ्यायची याच तेलात.
- सगळे जिन्नस कोमट झाल्यावर मिक्सर मधे वाटून घ्यायचे. प्रथम जवस, तीळ, दाणे, वाटून घ्या. मग कढीलिंब व मिरच्या वाटायच्या. शेवटी फोडणीतील जीरे व चींच वाटून सर्व जिन्नस चविनुसार मीठ घालून एकत्र कालवायचे.
- चटणी फार बारीक वाटू नका. खाताना चटणीचे कण दाताखाली चांगले लागतात.
यांत तेलाचे प्रमाण बेताने घ्या कारण यांत सर्व तेलबियांचा आपण समावेश केला आहे. 👍करून पहा.
जवस चटणी खूप सुंदर लागते ,खूप आवडते अत्यंत गुणकारी.. कशी करतात हे नक्की आता कळले तुझ्या पाक कृतीतून.. Love the Receipe and the master Chef both.
LikeLiked by 1 person
खूपच खमंग…
LikeLiked by 1 person
Khamang chatani…chinch ghalun karun baghen
LikeLike