जोशी कुरडई

on

काय दचकलात ना नाव ऐकून ? आता हे काय नविन ? तर त्याचे असे आहे कि परवा आमच्या जोशी कुटुंबीयांच्या समुहात पाककृती स्पर्धा जाहिर झाली. थोडक्या वेळात, आबाल वृध्दांना आवडणारी व पौष्टीक पाककृती करायची होती. सहज गच्चीत गेले होते. समोरच्या बंगल्यात कुरडईचे वाळवण दिसले. आणि विचारचक्र सुरू झाले.
आमच्या जोश्यांच्या चारपिढ्या वकिलांच्या. वकिली म्हणजे एक व्यवसाय तर वकिली शब्दाला सोलापूर भागात हरभरा पिठाची शेवेची भाजी असाही एक स्वादिष्ट व पौष्टीक अर्थ आहे. वकिलीची भाजी आंब्याच्या मोसमात केली जाते कारण आमरसाबरोबर जरा चमचमीत खावेसे वाटते, आणि या दिवसात ताज्या भाज्या मिळण्याचे प्रमाणही थोडेसे कमी होते.
वकिलीचे दोन्ही अर्थ मनांत गिरक्या घेवू लागले आणि जन्माला आली ती जोशी कुरडई 😀😀.
चला पाहूया कशी करायची ती.
आपण कुरडई करणार आहोत ती गव्हाची ,तांदुळाची किंवा साबुदाण्याची नसून ती आहे नाचणीची.
दुसरा महत्वाचा फरक असा आहे कि ती तळायची नसून फक्त वाफवायची आहे. त्यामुळे एक डोळा वजन काट्याकडे लावून बसण्याची मुळीच गरज नाही.
ही कृती म्हणजे एक वेळेचा नाश्ता किंवा एका वेळाचे हलके जेवण होवू शकते.

साहित्य

हे प्रमाण दोन माणसांच्या न्याहारीचे आहे

  • एक वाटी नाचणी पीठ
  • एक कांदा, एक टाॅमेटो, एक काकडी
  • चारपाकळ्या लसूण, दोन हिरव्या मिरचीचे तुकडे
  • कोथिंबीर, कढीपत्ता
  • मीठ, साखर
  • एक चमचा तूप
  • तीळ चमचा भरून
  • एक वाटी घट्ट दही
  • पाव चमचा तेल
  • सोऱ्या किंवा गाजर वगैरे किसायची जाड किसणी
  • कुकर

कृती

  1. पहिल्यांदा एका पातेल्यात किंवा कढईत दीड वाटी पाणी घालून उकळत ठेवा. पाण्याला उकळी आली कि वाटीभर नाचणीचे पीठ पाण्यात घालायचे. चांगले पीठ ढवळून घ्या व गॅस बंद करा. आता त्याला दणकून वाफ येवू द्या, साधारण ५ ते ७ मिनिटे पुरतात.
  2. आता उकड काढून ताटात पसरवा आणि चांगली मळून घ्या. तेलाचा हात लावून मळा म्हणजे उकड हाताला चिकटणार नाही.
  3. तुम्ही आधीच कांदा, टोमॅटो, काकडी, कोथींबीर बारीक चिरून ठेवा. मिरची चे तुकडे करून ठेवा, लसूण ठेचून ठेवा. दही जरा मीठ व साखर घालून फेटून घ्या. साखर ऐच्छीक आहे.
  4. सोऱ्याला आतून तेल लावून घ्या, आता उकडीचा उंडा त्यात भरून तेल लावलेल्या ताटलीवर कुरडई पाडून घ्या. आता ही कुरडई कुकर मधे वाफवून घ्यायची .कुकरची शीट्टी तेवढी काढून ठेवायची, पण कुकरमधे तळाला पाणी घालायचे विसरू नका. तुम्ही कुकर मधे इडली स्टॅन्ड वर सुध्दा कुरडई घालू शकता. पण त्यालाही तेल लावून मगच कुरडई घालायची. पाच ते सात मिनिटेच वाफवायची.
  5. कुकरची वाफ गेली की कुरडई बाहेर डीश मधे काढून घ्यायची.
  6. आता कढईत तूप घालून चरचरीत फोडणी करून घ्या. तूपात तीळ, जिरे, मोहरी, हिंग, किंचीत हळद, कढीपत्ता, लसूण व मिरची घालायची.
  7. डीश मधील कुरडईवर पहिल्यांदा दही घाला, मग कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर भूरभूरा. शेवटी खमंग फोडणी ची पखरण करा.

आहे ना हेल्दी डीश. भरपूर कॅल्शियम युक्त.
नविन पिढीला कुरडई हा शब्द पसंत नाही पडायचा पण काही बिघडत नाही तुम्ही त्याला Noodles म्हणा, 😀👍
करून पहा. हाच पदार्थ तुम्ही ज्वारी, तांदूळ यांची उकड काढून करू शकता.
एकप्रकारे जोश्यांची “वकिली” मीही पुढे चालवतेय नाही का !!
आणि हो स्पर्धा कोणी जिंकली असेल ?
No prizes for guessing.

12 Comments Add yours

  1. Anup Bagaitkar's avatar Anup Bagaitkar म्हणतो आहे:

    दह्याऐवजी व्हाईट सॉस घातला यावर तर “Ragi Spaghetti” म्हणून serve करता येईल.

    Like

  2. डाॅ. अरूण हरके's avatar डाॅ. अरूण हरके म्हणतो आहे:

    झकास डिश शुभांगी!

    महाराष्ट्रात जोश्यांची कमतरता मुळीच नाही. त्यामुळे कुणाही कुडमुड्या जोशी वा जोशीनबाईंनी या डिशवर वारसाहक्क सांगीतल्यास आश्चर्य नको. तेव्हा मी या डिशला एक वेगळे नाव सुचवतो…………..” साज नुडल्स ” ( SAJ NOODLES) हे ते नाव. आता हा ” SAJ” शब्द कसा आला, त्याची व्युत्पत्ती काय ? SHUBHANGI ANIL JOSHI या तीनही शब्दांतील अद्याक्षर घेतल्यास SAJ हा शब्द तयार होतो. आहे कि नाही छानसे नाव ? आणि या विशिष्ठ नावामुळे डिशचे पेटंटही तुझ्याकडेच रहाते. ☺😁

    Liked by 1 person

  3. Atul jadhav's avatar Atul jadhav म्हणतो आहे:

    वा खुप छान आहे रेसिपी..
    आगदी सोपी आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम.
    आपली रेसिपी मी नेहमी माझ्या आई कडुन बनवून घेतली आहे..साक्षात आपण आन्न्पुर्णा आहात..
    आपल्या प्रत्येक रेसिपी अप्रतिम असतात..
    धन्यवाद मैडम..🙏🙏
    आपला दिवस शुभ जावो..🙏🙏🙏

    Like

  4. neelimavaidya's avatar neelimavaidya म्हणतो आहे:

    Very nice 👌👌 and innovative

    Liked by 1 person

  5. Prajakta khadilkar's avatar Prajakta khadilkar म्हणतो आहे:

    Joshi kurdaila pratham man nakkich tuzyamule milala …khupach uttam receipe…..tuzyatalya navinyapurna pak kalela namaskar….🙏

    Liked by 1 person

  6. manasee's avatar manasee1 म्हणतो आहे:

    Tasty and healthy option!

    Liked by 1 person

  7. स्नेहा's avatar स्नेहा म्हणतो आहे:

    शुभान्गी खूपच नविन कल्पना आहे,पौष्टिक आणी रुचकर सुद्धा….नूडल्स म्हटले तर मुले मजेनी खातील.

    Like

  8. स्नेहा's avatar स्नेहा म्हणतो आहे:

    शुभान्गी खूपच नविन कल्पना आहे,पौष्टिक आणी रुचकर सुद्धा….नूडल्स म्हटले तर मुले मजेनी खातील.

    Liked by 1 person

  9. HEMANT Kulkarni USA's avatar HEMANT Kulkarni USA म्हणतो आहे:

    डॉ. हरके यांनी सुचवलेले नांव कल्पक आणि साजेसे आहे. तथापि प्रथम दर्शनी या नूडल्स कुळीथाचे पीठ वापरून बनवल्याप्रमाणे दिसतो व म्हणून लहान मुलांचे डोळे रुमालाने झाकल्याशिवाय ती खातील असे वाटत नाही. चविष्ट असणे, हे ‘बायको गोरी असायला हवी’ (गोरी, गोरी पान, फुलासारखी छान ……) या मुलांच्याच लकेरींप्रमाणे प्रमाणे. शुभांगी आणि अस्मादिकदेखील मूळ कोंकणातील व ते जाणतात की चण्याच्या डाळीच्या पिठल्यावर कुळीथ मात करतो. हापूस आंबा देखील कोंकणातील व त्याच्या जोडीला ह्या नूडल्स पूरक ठरतील -हे माझे भाकीत वयस्क मंडळींपुरते ठेवतो. आता तयारी करतो सामुग्रीची. एरवी सध्या घरी बसल्यामुळे स्वयंपाकघरात प्रवेश करण्यासाठी पुरुषांना भरपूर वेळ देखील आहे. ‘चला उठा सकलजन?’

    Liked by 1 person

  10. मैत्रेयी केसकर's avatar मैत्रेयी केसकर म्हणतो आहे:

    मस्त आहे रेसिपी 👍

    Liked by 1 person

  11. Shubhangi Thorat's avatar Shubhangi Thorat म्हणतो आहे:

    वा, छान आरोग्यदायी. शिवाय मला नाचणी आवडते. करुन पाहते

    Liked by 1 person

  12. Shrinivas gajanan haridas's avatar Shrinivas gajanan haridas म्हणतो आहे:

    SAJ NOODELS a great name for it
    Great vahini .

    Liked by 1 person

Leave a reply to Prajakta khadilkar उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.