मागच्यावेळी आपण मी इटलीत घेतलेल्या एका खाद्य अनुभवाचे समग्र वर्णन वाचले .या खाद्य अनुभवाचे एक वैशिष्ट्य य म्हणजे आम्ही केलेल्या पदार्थांनीच आमची क्षुधाशांती होणार होती .पाश्चात्यपध्दती नुसार जेवणाची सांगता गोडाने ( Dessert) होते. लुका व लोरेंझो या जोडगोळीने dessert म्हणून Panna Cotta ची निवड केली होती. हा एक खास इटालीयन गोड पदार्थ आहे त्याची कृती खालील प्रमाणे. हा पदार्थ आम्ही चार वेगवेगळ्या स्वादात केला.
Panna Cotta करत असताना माझा मनांत आपला एक खास भारतीय पदार्थ डोकावत होता. तो पदार्थ म्हणजे खरवस. पांरपारीक खरवस करण्याच्या पध्दती नुसार आपण त्यात स्वादासाठी फक्त वेलचीपूड वापरतो. या स्वादात विविधता आणण्यासाठी माझे विचारचक्र सुरू झाले.
शीत कपाटातील आंब्याच्या फोडी व आमरस, बागेतील गुलकंदाचा गुलाब व रसरशीत अननस खुणावू लागले. या सर्वांचे खरवसात स्वागत केले व तीन वेगवेगळ्या रूपात खरवस साकार झाला.
आंब्याचा खरवस
साहित्य
- मोठी वाटी चीक (गाय, म्हैस या व्यायल्या वर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसाचे कच्चे दूध)
- जेवढा चीक असेल तेवढेच दूध घ्यायचे. मोठी वाटी भरून दूध.
- ३/४ वाटी, पाऊण वाटी गुळ. साखर पण वापरू शकता. पण गुळाचा खरवस जास्त चांगला लागतो आणी वडी पण मऊ होते.
- पाच ते सहा काड्या केशराच्या. एक चमचा वेलची पूड.
कृती
- प्रथम गुळ बारीक चीरून घ्या. आता पातेलीत चीक, दूध, गुळ एकत्र करून घ्या. गुळ सगळा विरघळला पाहिजे.
- मिश्रण पसरट भांड्यात घ्या, कुकरचे वरण, भात, लावायचे डबा असतो तसाच.
- वरून वेलची पूड भूरभूरायची. केशर काड्या थोड्या पळीत गरम करून मग दूधात चुरडून घ्या म्हणजे रंग सुरेख येतो.
- कुकर मधे तळात पाणी घालून त्यावर स्टॅन्ड ठेवा आणी खरवसाचे भांडे त्यावर ठेवा. कुकरची शीट्टी काढून ठेवा.
- गॅस चालू करा.१० ते १२ मिनीटांत खरवस छान शिजून तयार होतो.
- सुरी खरवसात घालून बघा. खरवस शिजला असेल तर सुरीला चीक लागणार नाही. गॅस बंद करा व वड्या कापून घ्या.
आंबा खरवस करताना १ वाटी आंब्याच्या फोडी व १/ २ वाटी आंब्याचा रस चीकात मिसळून खरवस करायचा.
अश्या पध्दतीनेच गुलकंद व अननसाचा खरवस करायचा .
गुलकंद खरवस
१ वाटी चीक, १ वाटी दूध, १/२ वाटी बारीक केलेला गुळ, दोन चमचे ( छोटे) गुलकंद,
सर्व साहित्य एकत्र करून खरवस करा.
खरवस तयार झाल्यावर वरून गुलाब पाकळी ठेवा 👍🌹🌹🌹🌹🌹
फारच सुंदर गुलकंदाचा स्वाद येतो.
अननस खरवस
सगळे साहित्य नेहमी प्रमाणे 👆
फक्त अननस फोडी १/४ वाटीच घ्या
१/४ वाटी अननस मिक्सर मधून ज्यूस काढून चीकात मिसळा.
करून पहा 👍
आणि हो …. या इटलीतील वर्गानंतर मला एक संग्राह्य प्रशस्तीपत्र देखील मिळाले बर का …

आंबा खरवस एकदम भारी!!
LikeLike
कीती छान ग .पाहताच खावासा वाटला.खूप छान तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
LikeLiked by 1 person
प्रिय शुभांगी,
‘तेल, तिखट, वरण’ आणि मोदकाची आमटी डोक्यात होतीच. त्या पार्श्वभूमीवर इटालियन पानाकोट्टा हि काय भानगड आहे या उत्सुकतेने ही तुझी नवीन रेसिपी देखिल वाचून काढली.
आपल्याकडील खरवसारखी ती जर असेल, तर तीचा स्वाद घेण्यासाठी तुझ्याकडे पंढरपूरला यायलाच हवे.
परदेशी जावून तेथील Lavender Panna cotta, Ravioli, Tagliattelle आणि काही अन्य इटालियन पदार्थांच्या, मिहीरसह आपण सर्वजण वाटेला गेलात ते वाचून मजा वाटली. पिसा येथे इटालियन पास्त्याचा स्वाद घेण्याचा मीही प्रयत्न केला होता (पण तो निष्फळ ठरला हे वेगळे). लुका आणि लोरेंझो तिथे भेटले असते तर कदाचित शक्य होते. असो.
वेळ होता म्हणून तुझ्या इतर रेसिपी देखिल चाळल्या.
त्यापैकी मला खरी उत्सुकता आहे ती ‘पेंडपाल्या’च्या आमटीची. तथापि तीस आमटी न म्हणता ‘पेंडपाला’च म्हणावे लागते ..इति..तू शुभांगी! अन्यथा….. पंडाकाकांचा भरदार मिशा असलेला करारी चेहरा समोर येतो.
आपण उभयता अशा व्यक्ती आणि वल्लीं ना प्रकाशात आणता हे पुण्यकर्म! अनिलने प्रकाशात आणलेले नाट्यरसिक ठेकेदार सोनबा व तुकाराम सासवडे बंधू मला येथे आठवतात.
असो.
एकुणात, आपण जे लिहिता ते उत्तमच आहे !
लिखते रहो!!
🙏
LikeLike
व्वा छानच ताई….
अन् प्रमाणपत्राबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
LikeLiked by 1 person
Khupach chan 👌aamba ananas kharawas swadishtach asanar great
LikeLiked by 1 person
अप्रतिम combo
LikeLike
Super sweet recipies!💐
एक शंका फक्त
अननस आणि दूध एकत्र शिजवले अननस खरवसात तर फाटत नाही का दूध?
LikeLike