हिवाळयात गुणकारी अशी ही बाजरी…

थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी, लसणीची चटणी, लोणी हा आपला सर्वांचा आवडता मेनु. बाजरी हे अत्यंत आरोग्य दायी असे धान्य आहे. बाजरीत कॅल्शियम, लोह, प्रथिने  व तंतुमय भाग भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्याचे नियमित सेवन गुणकारी असते.
आज आपण भाकरी वगळता बाजरीचे इतर काही प्रचलित व अप्रचलित पदार्थ पाहूयात .
मी खरं तर बाजरीची उसळ ही कधी ऐकली , पाहिली वा खाल्ली नव्हती. पण दुर्गा भागवत यांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख वाचला व मी या उसळीच्या मोहात पडले आणि तात्काळ त्याचा प्रयोग केला.

बाजरीची उसळ

साहित्य

  • १ वाटी भरून बाजरी
  • १/२ चमचा जीरे पावडर
  • १/२ चमचा धने पावडर
  • २ चमचा भरून गूळ
  • २ चमचा भरून ओला नारळ
  • २ चमचे भरून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चविनुसार मिठ, तेल व फोडणीचे साहित्य 

कृती

  1. प्रथम बाजरी कमीत कमी २० तास भिजत घाला. नंतर उपसून ती १२ तास स्वच्छ फडक्यात मोड आणण्यासाठी बांधून ठेवायची.
  2. मटकीच्या उसळी सारखा याला शिजायला वेळ लागत नाही  .कुकरला दोन शिट्ट्या बास.
  3. कढईत गरजेनुसार ( डाएट असेल त्या प्रमाणे) तेल घेवून नेहमी प्रमाणे चरचरीत फोडणी करायची.मोहरी, जिरे, हळद , हिंग, कढीपत्ता.
  4. उसळ फोडणीस टाकायची, मग त्यात मीठ, गूळ घाला, धनेजिरे पूड घाला चांगली मिळून आली की गॅस बंद करा.
  5. आता वरून कोथिंबीर व नारळ भूरभूरा.

दुर्गा बाई सांगतात उसळीबरोबर वाटीभर ताक वा दही घेतल्यास पूर्ण जेवणाचं समाधान मिळते.
पूर्वी भाजी मिळत नसे त्यावेळी बायका अशा कडधान्यांच्या उसळी करीत असत.

बाजरीचे वडे (ढेबरे)

साहित्य

  • १ वाटी भरून बाजरी पीठ
  • १/२ वाटी कणिक
  • २ चमचे मका पिठ किंवा हरभरा पिठ ( बेसन)
  • १ चमचा बारीक रवा
  • १ वाटी भरून दही
  • १ छोटा चमचा गुळ
  • १ चमचा भरून तीळ
  • १/२ चमचा जीरे
  • १ हिरवी मिरची व छोटा तुकडा आलं , याची पेस्ट
  • चविनुसार मीठ, हळद
  • १ वाटी बारीक चिरलेली मेथी (भाजीची पाने)
  • तळण्यासाठी तेल

कृती

  1. मेथी निवडून बारीक चिरून घ्यायची .मग धूवून निथळत ठेवायची.
  2. पराती मधे सर्व पिठ घ्या (बाजरी, कणीक, बेसन, रवा). त्यात मीठ, तिखट, गूळ, दही, तीळ, चिरलेली मेथी, जीर( पूड सुध्दा चालेल) पेस्ट ( आलं व मिरचीची).
  3. १ चमचा तेलाचे मोहन घालून हे मिश्रण चांगले मळून घ्या .पूरी च्या पीठा प्रमाणे.हे पिठ अर्धा तास झाकून ठेवा ,म्हणजे मुरेल व फुलेल.
  4. आता केळीच्या पानावर किंवा प्लास्टिक पिशवीवर छोटे पिठाचे गोळे करून भाजणीच्या वड्या प्रमाणे थापायचे. थापताना तीळ लावा वरून .
  5.  कढईत तेल चांगले कढत झाल्यावरच हे वडे तळा. वडा तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवा, तेल वड्यावर उडवत वडा चांगला फुगू देत.

ढेबरे प्रवासात पण नेतां येतात ,ते बरेच दिवस टिकतात.
जर तेलकट नको असतील तर लाटून थेपले करा . तव्यावर शॅलो फ्राय करा.

बाजरीचे आप्पे व कढी

करायला अगदी सोपे व चविष्ट

साहित्य

  • १ वाटी बाजरीचे पीठ
  • १ खडा गुळाचा
  • १ चमचा मोहन
  • १ वाटी दूध
  • १/२ चमचा जीरे पूड
  • चविनुसार मीठ, व किंचीत खायचा सोडा
  • अप्पे पात्र

कृती

  1. पहिल्यादां बाजरीच्या पीठात मीठ, गूळ बारीक चिरून, दूध, मोहन घालून पीठ भिजवा.
  2. पिठ सरसरीत भिजवा जेणेकरुन ते अप्पे पात्रात सोडतां येईल चमच्याने .
  3. ब्रशने किंवा चमच्याने आप्पे पात्राला तेल लावून घ्या .भांडे गरम झाले की पीठ घाला .गॅस मंद आचेवर ठेवून ,वर झाकण ठेवा. दोन मिनीटांनी झाकण काढून आप्पे लालसर झाले असतील तर पालटवून परत दुसरी बाजू खमंग करा.

पटकन होतात, नुसते सुध्दा खायला चांगले लागतात.
कढीची कृती मी सांगायची गरज नाही .
गरम कढीत आप्पे कुस्करून खायला अप्रतीम लागतात .वरून तुपाची धार एैच्छिक 🤭😀👍
चला तयारीला लागता ना !


7 Comments Add yours

  1. मृण्मयी रानडे म्हणतो आहे:

    भारी दिसतंय सगळंच गं.

    Like

  2. अमृता मोडक (स्मिता केळकर) म्हणतो आहे:

    वा बघूनच तोंडाला पाणी सुटलं, नक्की try करीन,छान डिटेल receipe दिली आहेस

    Like

  3. Janhavi Namjoshi म्हणतो आहे:

    Bajari kiti Chan prakare usal, Vade hyatun serve karta yeil.. Mastach recipe . Too good.

    Like

  4. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

    Bajarichi bhakri asate ti vishesh nahi avadat pan usal khupach chan diste ahe karun pahin.tartarheche prakar mastach.

    Like

  5. KURLEKAR MANASEE म्हणतो आहे:

    appe ati bhaari!!

    Like

  6. manasee1 म्हणतो आहे:

    Aappe ati bhaari!

    Like

  7. Anushree Ajit Degwekar म्हणतो आहे:

    khup chan recipe ahet!

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.