खजूराचे सार

on

जय भगवति देवि नमो वरदे जय पापविनाशिनि बहुफलदे।
जय शुम्भनिशुम्भकपालधरे प्रणमामि तु देवि नरार्तिहरे॥1॥

IMG_3109

नवरात्री चा उत्सव म्हणजे उत्साहाला उधाण. घराघराप्रमाणे नवरात्रीच्या चालीरीती बदलतात. परंतु उपवास हा या सर्वांच्या केंद्र स्थानी असतोच. काहीजण उठता बसतां करतात, काहीजण एकादशी सारखा नऊ दिवस करतात, काहीजण भाजका फराळ करतात.
उपवासाचे पदार्थ हा भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक अत्यंत महत्वाचा व मनोरंजक विषय आहे. उपवासाला अमुक एक पदार्थ चालतो व अमुक एक चालत नाही हा निर्णय कसा होतो हा एक कुतुहलाचा विषय आहे. तूर्तास हा निर्णय या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींकडे सोपवून आपल्या आजच्या पदार्था कडे वळूयांत.

साहित्य

IMG_3219

  • १ वाटी खजूर
  • पाव वाटी चिंच
  • २ चमचे गूळ
  • १ मोठी वाटी भरून नारळाचा चव
  • २ छोट्या हिरव्या मिरच्या ( तिखट कितपत आहेत हे बघून ठरवा )
  • २ लाल मिरच्या
  • १/ २ वाटी चिरलेली कोथिंबीर
  • १/२ इंच आले
  • १ चमचा जिरे
  • चविनुसार मीठ
  • १ चमचा तूप

कृती

  1. खजूर व चिंच गरम पाण्यात भिजत घाला. १/२ तास पुरेसे होते भिजण्यास. खजूर मिक्सर मधून फिरवून गाळून घ्या ( खजूराच्या बिया काढून घ्या आधीच ) चिंच कोळून घ्या. आता खजूराचे पाणी व चिंचेचा कोळ एकत्र करा.
  2. नारळाचा चव पण कोमट पाण्यात भिजत घाला व थोड्यावेळाने मिक्सर मधे फिरवून त्याचे दूध काढून घ्या. हल्ली नारळाचे दूध सूध्दा tetra pack मधे मिळते तेही तुम्ही वापरू शकता.
  3. हिरवी मिरची,आले व कोथिंबीर वाटून घ्या.
  4. खजूर, चिंच यांचे पाणी व नारळाचे दूध, मिरची, आले, कोथिंबीर यांचे वाटण, चवीनुसार मिठ व गूळ हे सर्व एकत्र करून ठेवा.
  5. आता तूप गरम करून त्यात जिरे व लाल मिरचीचे तुकडे घालून खमंग फोडणी करा.
  6. फोडणी गरम असतानाच सारावर घाला.सार पातळ अगर दाट हवे असेल तसे पाणी घाला व साराला उकळी आणायची.

मस्त साराचा आस्वाद घ्या 👍

टीप

जर उपवासाचे सार नको असेल तर हिंग व धने वापरून फोडणी करा .
जर चिंच वापरायची नसेल तर आंबट ताक वापरू शकता पण ते उकळवता येणार नाही नुसतेच प्या. हे पण चविला उत्तमच लागते.
हे अत्यंत आरोग्यदायी आहे.तसेच रक्तवर्धकही आहे.
तुम्ही welcome drink म्हणून आधीच बनवून ठेवू शकता !

13 Comments Add yours

  1. सौ. संध्या वेंगुर्लेकर's avatar सौ. संध्या वेंगुर्लेकर म्हणतो आहे:

    तुझ्या कल्पना शक्तीला मानाचा मुजरा.
    केवळ अप्रतिम

    Liked by 1 person

  2. भारती's avatar भारती म्हणतो आहे:

    आमसुलाचं आगळ वापरू शकतो का चिंच अथवा ताकाऐवजी???

    Like

    1. Shubhangi Joshi's avatar Shubhangi Joshi म्हणतो आहे:

      हो करू शकता 👍

      Like

  3. भक्ती नातू's avatar भक्ती नातू म्हणतो आहे:

    छान आहे ग करून बघते आता

    Like

  4. राजश्री देशपांडे's avatar राजश्री देशपांडे म्हणतो आहे:

    हे सार आमटी, कढी किंवा सोलकढी अशा पदार्थांना substitute म्हणून वापरता येईल का? म्हणजे जेवणात ओला पदार्थ म्हणून चालू शकेल का?

    Like

    1. Shubhangi Joshi's avatar Shubhangi Joshi म्हणतो आहे:

      नक्की चालेल

      Like

  5. Prajakta khadilkar's avatar Prajakta khadilkar म्हणतो आहे:

    Khupach chan navi receipe

    Like

  6. Sanjivani's avatar Sanjivani म्हणतो आहे:

    This is very innovative ! 👍 Avadel karayala.

    Like

  7. प्राजक्ता's avatar प्राजक्ता म्हणतो आहे:

    झकास रेसिपी ,आणि कडेची सजावट हि तितकीच सुंदर

    Like

  8. गौरव's avatar गौरव म्हणतो आहे:

    कमाल कल्पनाशक्ती.
    आई कोकमाच सार करते.
    आता भेळेच्या पाण्यासारखी खजूर चिंचेची चव आणता येईल साराला.

    Like

  9. चवीने चवीने आवडीने खावी अनारकढी,त्याचबरोबनी खावी मऊमऊ लुसलुशीत पानगी, आता करावी खजुराच्यासाराची तयारी जोश्यांच्या शुभांगीच्या ह्या चवदार कलाकृती.

    Like

  10. Meera/Hemant KulkarNi's avatar Meera/Hemant KulkarNi म्हणतो आहे:

    नवीन पदार्थाची निर्मिती आणि त्याचा आगळेपणा इतक्या आकर्षक पद्धतीने वाचकांच्या पानात वाढल्यानंतर तो अधिक रुचकर लागणार -याबद्दल लेखिकेने खात्री बाळगावी. आमच्या घरात उपास-तपास दुय्यम असल्यामुळे खजुराचे हिंग-धने वाटून-घाटून केलेले सार वारंवार रतीब लावेल याची खात्री बाळगावी. फुलांची रांगोळी आणि साहित्याचे रंगीत भांड्यातील विभाजन लेखिकेच्या कला कुसरीचे प्रतीक होय. अमेरिकेतून धन्यवाद!

    मीरा आणि हेमंत कुलकर्णी, मिल्वॉकी

    Like

  11. Amruta Modak's avatar Amruta Modak म्हणतो आहे:

    मस्त पौष्टिक रेसिपी, करायला वेळ कमी आणि सोपी इतर रेसिपीज सुद्धा छान आहेत नक्कीच try करीन, ,,,,,,,,,स्मिता केळकर ( अमृता मोडक)

    Like

यावर आपले मत नोंदवा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.