नमस्कार !
आपला सर्वांचा प्रतीसाद उत्साहवर्धक आहे, पण त्यामुळे जबाबदारीही वाढते आहे व त्याची मला विनम्र जाणीव आहे. आपल्या संवादाचे तीन अंक गोडाचे झाले म्हणून आता थोडा रूचीपालट करूयात.
कोकण म्हटले की केळीची झाडे, माड, सुपारी, तांदूळ, फणस , आंबा व अश्या अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येतात. माझे आजोळ जालगाव, दापोली. त्यामुळे दर मे महिना आजीकडे. मग सांदण, घावन, भाजणीचे वडे, दडपे पोहे, मऊभात हे सकाळच्या न्याहारीचे पदार्थ. पण यातला खास पदार्थ पानगी. आम्हा नातवंडाना गरम पानगी, लोणी व सोबत खाराची मिरची हा बेत आजी व आई करून घालत.
आता थोडे पानगी विषयी
साहित्य
- तांदूळाची पीठी १ वाटी
- ताक २ वाटी
- २ मिरच्या
- जिर १/२ चमचा
- कोथिंबीर
- आल्याचा तुकडा
- चवीनुसार मीठ
- १/२ चमचा तेल
- केळीच्या पानांचे फाळके (आयताकृती पानाचे तुकडे)
कृती
- प्रथम एका कुंड्यात १ वाटी तांदूळाची पीठी घ्यायची, त्यात २ वाट्या ताक घालायचे. मिरची, जिरे, कोथिंबीर, एकत्र वाटून घ्यायची हे मिश्रण त्यात घाला. चवीनुसार मीठ व १/२ चमचा तेल घालून मिश्रण एकसारखे ढवळा. गुठळी होता कामा नये. जरा पीठ सरबरीतच करा. नुसत्या ताकात पीठ घट्ट होतं म्हणून अंदाज घेत पाणी घालायचे. उत्तपा चे पीठ कसे असते तसच ह्या पीठाचे मिश्रण करायचे.
- आता एका केळीच्या पानावर हे पीठ हातानेच गोल पसरवा, मग हे पान तव्यावर ठेवा, वरून अजून एक पान पालथ ठेवायचे, मंद आचेवर शिजू द्यायचे.
- केळीच्या पानाचा तडतड आवाज येतो व पान पण तांबूस होते. २ ते ३ मिनींटानी वरचे पान काढून बघा पानगी शिजलेली कळते व वाफ पण आलेली समजते. आता पानाची वरची बाजू उलटून ठेवा, उलटल्यावर वरचे पान करपलेल दिसेल. असू देत ते तसच. परत २ ते ३ मिनीट पानगी शिजू द्यावी.
- दोन्ही बाजूने भाजलेल्या पानगीचा खमंग वास येतो. दोन्ही पाने काढून टाका.
- आता मस्त गरम पानगी, खाराची मिरची व लोणी याचा समाचार घ्यायचा.
ही झाली तीखट आंबट अशी पानगी.
यांत गोडाची पानगी पण करतात.
दुधात साखर घालून पीठ भिजवायचे व किंचीत मीठ घालायचे . बाकी कृती वरील पानगी प्रमाणेच करायची. ती पण छान लागते.
वर्षांसाठी भरतेवेळी
कडुनिबांच्या वाळलेल्या पानांशी
गप्पा करत
केळीच्या झाडाला शेवटचा हात करत
मोठ्या थोरल्या डब्यात.मग सासरी गेल्या सारखं इतकी कामात दंग ,
की विविध प्रकारे शुचिर्भूत होऊन,
कोरडं होऊन, उन्हं खात बसून,
दळून तिची पिठी झाली , आणि
देशावर दुसर्या डब्यात बसली
तरी तांदुळाला समजलंच नाही .एक सुंदर स्वच्छ शुद्ध पंढरपुरी सकाळ,
आणि तिला तवा दिसला
आणि चपापली .
डोळ्यासमोर डाव, चटके, तव्यावर फिरणे,
काळपट सोनेरी कडा
आणि उलथन्याने “चल नीघ! ” म्हणत
तिला जाळी जाळी दाखवत तेथून उचलून
ताटलीत टाकणे.पण आज तिचे ग्रह चांगले होते .
थोडेसे मीठ, बारीक चिरलेली मिरची
आणि पाणी किंवा ताक असावं;
हे सर्व मंडळी कौतुकाने तिला भेटायला ;
सर्वांनी अगदी घट्ट एकरूप होणं,
आणि तिला केळीच पान दिसताच
खूप सुखावली .मग काय !
केळीच्या पन्नाला थोडेसे ओले केले ,
आणि तिला छानपैकी पसरून थापले;
लाटण्याशी झटापट नाही,
आणि अंगावर काही शिंपडणे नाही ;
फक्त ती आणि केळीच पान .एकीकडे तवा गरम होत असता ,
केळीच्या पानाने अगदी जातीने तिला जवळ घेऊन ,
सर्व बाजूनी तिला झाकून ,
दिलेला मानसिक आधार;
दोघांनी केलेला तव्यापर्यंत प्रवास,
आणि अतिशय सुंदर प्रकारे त्या पानात
तिची शिजलेली पानगी .मग रोजच्या जगात पदार्पण ,
दुसऱ्या एका केळीच्या पानाने केलेले
लोणी चटणीसह उत्कृष्ट स्वागत ,
आणि आजूबाजूच्या लोकांच्या चेहर्यावरचे
समाधानाचे भाव .तांदुळा समजली . केळीचं पानही समजलं .
जगात सगळ्यांनाच हे अस
पुन्हा भेटायचं आणि मिळून कोणाला तरी
आनंद द्यायचं
आणि स्वतः एकत्र आयुष्य घालवायचं भाग्य नसतं … सुरंगा दाते
पानगी लहानपणी खाल्लेली आहे पण त्याची चव आता विसरायला झाली आहे. आठवण जागृत केल्याबद्दल धन्यवाद. आता तूच कधीतरी करून खायला घाल.
😃😊
LikeLiked by 1 person
पानगी लहानपणी खाल्लेली आहे पण त्याची चव आता विसरायला झाली आहे. आठवण जागृत केल्याबद्दल धन्यवाद. आता तूच कधीतरी करून खायला घाल.
😃😊
LikeLike
शुभांगी
मनःपूर्वक अभिनंदन….
विस्मरणात जाणारे पदार्थ ( विशेषतः कोकणातील शाकाहारी पदार्थ ) तू पुन्हा एकदा रसिक खवय्यांसमोर आणते आहेस. हल्ली कोकण म्हणजे सिंधुदुर्ग, मालवणी खाजे आणि मालवणी भाषा अशी काहीशी समजूत झाली आहे. रत्नागिरी जिल्हा भाषेने आणि पदार्धाने किती समृद्ध आहे हे कोकणाबाहेर रहाणारा कोकणीही विसरत चालला आहे. खर तर सकाळच्या न्याहारीला कोकणातील घरात केला जाणारा खुटखुटा भात व खाराची मिरची कोणत्याही ब्रेकफाष्टच्या तोंडात मारेल. तुझ्या ब्लाॅग मधे पदार्थ करतानाची कृतीही दृश्य स्वरुपात दिसते हे विशेष. येत्या काळातील ” आधुनिक कमलाबाई ओगले ” म्हणजेच जोशांची रूचिरा असा नावलौकिक तू मिळवशील यात शंकाच नाही. वारकरी पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनाला जातात , माझ्यासारखा ह्रदयात सदैव कोकण जपणारा मुंबईकर मात्र खाद्यवारीसाठी पंढरीला जात राहिल हे नक्की.
शुभेच्छा , लिहित रहा….
श्रीराम शरद दांडेकर
LikeLiked by 1 person
कोकणातल्या पदार्थांचं आकर्षणआहेच कारण आम्ही देशस्थ !!
पानगी कधीच खाल्ली किंवा केली नाही…
आता नक्की करेन
मस्तं लिहीलंयस नेहमीप्रमाणे 👍
LikeLiked by 1 person
Khup Chan .Paramparik Padarthanchya kruti jatan karnyacha tuzha he Utkrushtha Yogdaan. Panagi sundar ..
LikeLike
Mast aahe nkki karen
LikeLike
Paanagee chi krutee dilyabaddal dhanyawad ! Karun baghen nakkeech. Kelichee pane matra anavee lagateel amha shaharee lokanna. Video ani kavita 👌👌
LikeLike
uttam prakar….tu khup chan kela ahes…nehamipramane👌
LikeLike