वैभवशाली नवरात्र : माळ पाचवी

मंडळी नमस्कार,  पाचव्या माळेकरता आपले सर्वांचे स्वागत आहे.  आज आहे ललिता पंचमी. रुक्मिणी रुसून येऊन दिंडीरवनात थांबली होती. कोणी एकेकाळी दिंडीरवनात खूप गर्द झाडी होती.हा संकेत मनामध्ये धरून तिला आजच्या दिवशी पुन्हा एकदा पानात बसवली जाते. पानाफुलात रममाण  झालेले तिचे  हे रूप मी तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे.  या पोशाखाला ‘वनलक्ष्मी ‘पोशाख असे ओळखले जाते…

वैभवशाली नवरात्र : माळ चौथी

मंडळी नमस्कार,   रुक्मिणी मातेचे नवरात्र पंधरा दिवसांचे असते हे पहिल्या लेखात तुम्हाला सांगितले आहेच. त्यामुळे मातेची विविध रूपे सादर करण्याचे काही स्थानिक संकेत आहेत.  त्याची पहिल्यांदा तुम्हाला थोडीशी माहिती देते. चौथ्या माळेला बुधवार किंवा मंगळवार आल्यास रुक्मिणी माता कोल्हापूरच्या  अंबाबाईचे रूप घेते नाहीतर तुळजाभवानीचे.  पण या तिथीला रविवार आले असतील सरस्वतीचे रूप धारण करते.  यावर्षी…

वैभवशाली नवरात्र :  माळ तिसरी

मंडळी,   आजच्या या भागात आपण  रुक्मिणी  मातेचे तिसरे रूप पाहणार आहोत.  हे रूप आहे कमलादेवीचे किंवा कमलजेचे.  पोशाखाचे नाव कमलजा म्हणजे कमळपुष्पात विराजमान झालेली देवी.  या कमलासनात ती मांडी घालून बसली आहे.  थोडक्यात या अवताराला गायत्री अवतार असेही म्हणता येईल. प्रत्यक्षात रुक्मिणी मातेची मूर्ती ही उभी आहे.  ही मूर्ती बसली असल्यासारखी दाखवणे आणि वस्त्रांचा वापर…

नवरात्र भाग २

मंडळी नमस्कार,  नवरात्रोत्सवातील श्री रुक्मिणी मातेची विविध रूपे व त्या अनुषंगाने एखादी पाककृती आपण पाहत आहोत आजची ही दुसरी कडी.  आज रुक्मिणी मातेने लमाणी , मारवाडी किंवा बंजारा पद्धतीचा पोशाख केलेला आहे.  व त्या पोशाखाला साजेसे दागिने तिने परिधान केलेले आहेत.सुखळी माता असा गुजराती पद्धतीचा वेश का धारण करते त्याबद्दल परंपरेत काही अधिकृत उल्लेख किंवा…

वैभव संपन्न नवरात्र : १

लक्ष्मीर्दिव्यैर्गजेन्द्रैर्मणिगणखचितैः स्नापिता हेमकुम्भैः ।नित्यं सा पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमाङ्गल्ययुक्ता॥२६॥विविध रत्नांनी मढविलेल्या स्वर्गीय श्रेष्ठ हत्तींनी सुवर्णाच्या कुंभांमधून जिला स्नान घातले आहे, अशी ती हातात कमळ घेतलेली, सर्व शुभ उपाधींनी युक्त लक्ष्मी नेहेमी माझ्या सदनात राहो.: श्री सूक्त पंढरपूर तीर्थक्षेत्राची शेकडो वर्षांची परंपरा आहे. पंढरपूर क्षेत्राची अधिष्ठात्री देवता श्री विठ्ठल असे जरी समजले जात असले तरी…

बागाईतकर घराणे, मिसळीचे !

मिसळ म्हटले की कोणतीतरी उसळ ,त्यात घरातला उरलेला चिवडा,शेव, फरसाण, बटाट्याची भाजी, शिजवलेले पोहे असे झणझणीत चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ना ? मिसळी बरोबर वरून भुरभुरलेली कोथिंबीर, कांदा, काकडीचे काप टोमॅटो इत्यादी सजावट आलीच. मठ्ठा ,पाव हेही साथीदार अनिवार्य..साऱ्या महाराष्ट्रात चालणारा मेनू म्हणजे मिसळ. प्रत्येक भागाची चव वेगवेगळी. पुणेरी ,कोल्हापुरी ,नासिक, नगर, सोलापूर या…

खाद्य संस्कृतीतील निसर्गसुक्त, गरगट्टा

भवताली चाललेल्या पंचमहाभूताच्या खेळाने आदिमानव चकीत व्हायचा. त्यामुळे स्वाभावीकपणे या निसर्गतत्वांना देवत्व बहाल केले गेले. मग या देवांची पूजाअर्चा आणि नैवेद्य आला. निसर्गतत्वाकडून जे जे मिळते त्याचाच नैवेद्य निसर्ग देवाला दाखवायचा अशी एक समृध्द परंपरा निर्माण झाली. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगी केल्या जाणाऱ्या मिश्र भाज्या हे याचेच प्रतिक आहे.गरगटा हा शब्द लग्न होवून पंढरपूरात…

जवसाची चटणी

जवस व जवसाची चटणी खाण्याचे फायदे – जवस हे एक वनस्पती-आधारित प्रकार आहे जे आरोग्यासाठी चांगली चरबी, अँटीऑक्सिडेंट्स आणि फायबर पुरवते. हे पीक प्राचीन इजिप्त आणि चीन मधून आलेले आहे. आशियात खंडा मध्ये हजारो वर्षांपासून आयुर्वेदिक औषधात याचा वापर केला जातो.आजच्या काळात जवसाचे बी हे बियाणे, तेल, पावडर, गोळ्या, आणि पीठाच्या स्वरूपात मिळते. बद्धकोष्ठता, मधुमेह,…

बिमलाचे गोमंतकीय लोणचे 

नुकतेच आम्ही गोव्यात गेलो होतो . तिथे आमचा मुक्काम सौ सुशांता व दत्ता नाईक यांच्या “ सांतेर  “ या फार्म हाऊस वर होता . सांतेर म्हणजे वारूळ . वारूळ हे सृजनाचे सांस्कृतिक प्रतीक  आहे . त्यांचे हे फार्म हाऊस अत्यंत निसर्गरम्य आहे . माड , पपनस , चाफा , फणस , रातआंबे , आंबा ,…

काळा मसाला

आज बर्‍याच दिवसांनी एक वेगळा विषय मांडते आहे. आज आपण आपल्या अनेक पाककृतींचा आत्मा असणारे “काळे तिखट” बनविणार आहोत सुरुवातीला यासंदर्भातल्या काही संकल्पना स्पष्ट करते.पदार्थांची चव, रुची किंवा स्वाद वाढविण्यासाठी आपण ज्या वनस्पती किंवा वनस्पतीजन्य पदार्थ घालतो ते म्हणजे “मसाले”. या मसाल्यात आपण मिरची घातली की ते होते “तिखट”. आणि मसाला कमी किंवा जास्त भाजला…