नर्तकस्तुवरस्तिक्तो मधुरः तर्पणो लघुः । बल्यः शीतः पित्तहरस्त्रिदोषशमनो मतः ।। रक्तदोषहरश्चैव मुनिभिः पूर्वमीरितः ।। … निघण्टु रत्नाकर नाचणी अथवा नागली चवीला मधुर व तुरट, कडवट असते. पचायला हलकी असते, तर्पण म्हणजे सर्व शरीरधातुंचे समाधान करणारी असते, ताकद वाढवते. तीन्ही दोषांचे शमन करणारी असली तरी विशेषत्वाने पित्ताचे शमन करते, रक्तातील दोष दुर करणारी असते. . नाचणीची…
कोकणी स्वयंपाकातील कल्पतरू कुळीथ
गुढघ हे गाव उंच डोंगरावर, हिरवे गार! झूळझूळ वाहणारे पाण्याचे झरे, पोफळीच्या बागा, आंबे, नारळ, जांभ, पेरू एक ना अनेक झाडे. त्यातून पायवाटेने चालत जाताना मजा यायची. मध्येच एखादे वानर टूण्णकन उडी मारून समोर येई. पाटाच्या गार पाण्यात पाय बुडवून बसायचा आनंद औरच. गावठी गुलाबांचे ताटवे च्या ताटवे ….त्यांचा सुगंध अजून मनातून जात नाही. मधेच…
खरवस लाडू…..🌹
गुलाबी थंडीत गुलाबाचे लाडू …..…🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 खरवस हे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे आगळेवेगळे वैशिष्टय. मऊ, लुसलुशीत खरवसाच्या वड्या आबाल वृध्दांना आवडतात. खरवसाचा डामडौल पण शाही. केशर, वेलची, गूळ घालून करायचा, मग डोळे मिटून हळूवारपणे एकएक वडीचा स्वाद घ्यायचा. अहाहा त्याचा मुलायमपणा जीभेवर रेंगाळत ठेवावासा वाटतो. लहानपणी मागून आरोळी यायची “तुझे डोळे मिटले असले तरी आमचे डोळे चांगले उघडले…
संत्रा बर्फी व आल्याचा हलवा
चला थंडी घालवा। थंडीचे दिवस मग काय खाण्याची चंगळ. यांत सुध्दा आपण आरोग्याला जे पुरक आहार आहेत ते करण्याचा प्रयत्न करत असतो. या हंगामात संत्री, भाज्या, दूधदूभते मुबलक प्रमाणात असत. आल्याच्या वड्या याचं दिवसात आपण करतो कारण सर्दीला, पीत्ताला, खोकल्याला त्या उपयुक्त असतात.मी आज जरा वेगळी आल्याची पाककृती देणार आहे. आल्याचा हलवा साहित्य १ वाटी…
हिवाळयात गुणकारी अशी ही बाजरी…
थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी, लसणीची चटणी, लोणी हा आपला सर्वांचा आवडता मेनु. बाजरी हे अत्यंत आरोग्य दायी असे धान्य आहे. बाजरीत कॅल्शियम, लोह, प्रथिने व तंतुमय भाग भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्याचे नियमित सेवन गुणकारी असते.आज आपण भाकरी वगळता बाजरीचे इतर काही प्रचलित व अप्रचलित पदार्थ पाहूयात .मी खरं तर बाजरीची उसळ ही कधी ऐकली…
आवळी सावळी
कार्तिक शुध्द चतुर्दशीला “वैकुंठ चतुर्दशी” म्हणून ओळखले जाते. अश्विनी पौर्णीमे पासून वैकुंठ चतुर्दशी पर्यंत आमच्याकडे आवळी पूजन करतात. रृतूमाना प्रमाणे आपण आपल्या आहारात योग्य बदल करावेत यासाठी आपल्याकडे अनेक धार्मिक परंपरा आवर्जून पाळल्या जातात. हेमंत रृतू मधे आवळ्याचे सेवन करणे आरोग्यवर्धक असल्याने या आवळी भोजनाला एक वेगळे महत्व आहे. ॥आवळी आवळी सदा सावळीराधाकृष्ण तुझ्या जवळीनाव…
ताकातील उकड ( तांदूळाच्या पिठाची )
आईबाबा कोकणातले त्यामुळे न्याहरी ला कोकणी पदार्थ हमखास बनवले जातात. तांदूळ हा मुख्य अन्न घटक त्यामुळे त्याच्या अवतीभोवतीचे सर्व पदार्थ केले जातात. पानगी, पातोळे, धीरडे, आंबोळी, सांदण, ई. आता थंडीची चाहूल लागली आहे म्हणून पटकन व कमी वेळात, थोड्याश्या साहित्यातला पदार्थ करूयात. साहित्य ४ वाटी जरा आंबटसर ताक १ वाटी तांदूळाची पिठी ३ हिरव्या मिरच्या…
राजस किवी
जागतिकीकरण हा आपल्या सर्वांच्या खिशाला भिडणारा विषय. हल्ली तो आपल्या पोटालाही भिडू लागला आहे. पूर्वी खेड्यापाड्यातून फारशी फळफळावळ उपलब्ध नसायची. संत्र, मोसंबे, चिक्कू व गेला बाजार सफरचंद. आता मात्र या फळांसोबत किवी, पीच, आलूबुखार, नाशपाती, आदि विदेशी फळेही सरसकट दिसू लागली आहेत. बाकी फळांचे पदार्थ आपण करू शकतो पण किवी चे काय करायचे हा प्रश्न…
खीरपूरी नाही नाही पूरी खीर, अप्पे पायस
दिवाळी फराळाचे प्रकार करून दमलात ? मग झटपट हे पक्वान्न करून बघा 👍 जरा वेगळ्या प्रकारची खीर करून बघूयात. हि खीर मी पहिल्यांदा माझ्या मैत्रीणकडे खाल्ली. स्वाती कडे वरदलक्ष्मी च्या हळदीकुंकूवाला तिने आम्हाला प्रसाद म्हणून गार, खमंग, चविष्ट अशी खीर दिली. तेव्हांपासून ती आमच्या घरातील पक्वान्नांचा एक महत्वाचा घटक बनली. साहित्य १/२ वाटी बारीक रवा…
Dill rice ( शेपू भात )
शेपू ला English मधे Dill म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव Anethum graveolens आहे. याला बळंतसोप ही म्हणतात. शेपू च्या उग्र वासामुळे तिचे चाहते कमीच आहेत. त्यामुळे या भाजीला आपण वाळीत टाकल्यासारखेच आहे. या भाजीत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्नचा भरपूर साठा आहे. परदेशात शेपू चे सलाड व सूप करतात, आपल्याकडे आपण भाजी, पूरी, पराठे करतो. या भाजीत कॅलरिज…