थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी, लसणीची चटणी, लोणी हा आपला सर्वांचा आवडता मेनु. बाजरी हे अत्यंत आरोग्य दायी असे धान्य आहे. बाजरीत कॅल्शियम, लोह, प्रथिने व तंतुमय भाग भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्याचे नियमित सेवन गुणकारी असते.आज आपण भाकरी वगळता बाजरीचे इतर काही प्रचलित व अप्रचलित पदार्थ पाहूयात .मी खरं तर बाजरीची उसळ ही कधी ऐकली…
लेखक: Shubhangi Joshi
आवळी सावळी
कार्तिक शुध्द चतुर्दशीला “वैकुंठ चतुर्दशी” म्हणून ओळखले जाते. अश्विनी पौर्णीमे पासून वैकुंठ चतुर्दशी पर्यंत आमच्याकडे आवळी पूजन करतात. रृतूमाना प्रमाणे आपण आपल्या आहारात योग्य बदल करावेत यासाठी आपल्याकडे अनेक धार्मिक परंपरा आवर्जून पाळल्या जातात. हेमंत रृतू मधे आवळ्याचे सेवन करणे आरोग्यवर्धक असल्याने या आवळी भोजनाला एक वेगळे महत्व आहे. ॥आवळी आवळी सदा सावळीराधाकृष्ण तुझ्या जवळीनाव…
ताकातील उकड ( तांदूळाच्या पिठाची )
आईबाबा कोकणातले त्यामुळे न्याहरी ला कोकणी पदार्थ हमखास बनवले जातात. तांदूळ हा मुख्य अन्न घटक त्यामुळे त्याच्या अवतीभोवतीचे सर्व पदार्थ केले जातात. पानगी, पातोळे, धीरडे, आंबोळी, सांदण, ई. आता थंडीची चाहूल लागली आहे म्हणून पटकन व कमी वेळात, थोड्याश्या साहित्यातला पदार्थ करूयात. साहित्य ४ वाटी जरा आंबटसर ताक १ वाटी तांदूळाची पिठी ३ हिरव्या मिरच्या…
राजस किवी
जागतिकीकरण हा आपल्या सर्वांच्या खिशाला भिडणारा विषय. हल्ली तो आपल्या पोटालाही भिडू लागला आहे. पूर्वी खेड्यापाड्यातून फारशी फळफळावळ उपलब्ध नसायची. संत्र, मोसंबे, चिक्कू व गेला बाजार सफरचंद. आता मात्र या फळांसोबत किवी, पीच, आलूबुखार, नाशपाती, आदि विदेशी फळेही सरसकट दिसू लागली आहेत. बाकी फळांचे पदार्थ आपण करू शकतो पण किवी चे काय करायचे हा प्रश्न…
खीरपूरी नाही नाही पूरी खीर, अप्पे पायस
दिवाळी फराळाचे प्रकार करून दमलात ? मग झटपट हे पक्वान्न करून बघा 👍 जरा वेगळ्या प्रकारची खीर करून बघूयात. हि खीर मी पहिल्यांदा माझ्या मैत्रीणकडे खाल्ली. स्वाती कडे वरदलक्ष्मी च्या हळदीकुंकूवाला तिने आम्हाला प्रसाद म्हणून गार, खमंग, चविष्ट अशी खीर दिली. तेव्हांपासून ती आमच्या घरातील पक्वान्नांचा एक महत्वाचा घटक बनली. साहित्य १/२ वाटी बारीक रवा…
Dill rice ( शेपू भात )
शेपू ला English मधे Dill म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव Anethum graveolens आहे. याला बळंतसोप ही म्हणतात. शेपू च्या उग्र वासामुळे तिचे चाहते कमीच आहेत. त्यामुळे या भाजीला आपण वाळीत टाकल्यासारखेच आहे. या भाजीत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्नचा भरपूर साठा आहे. परदेशात शेपू चे सलाड व सूप करतात, आपल्याकडे आपण भाजी, पूरी, पराठे करतो. या भाजीत कॅलरिज…
खजूराचे सार
जय भगवति देवि नमो वरदे जय पापविनाशिनि बहुफलदे। जय शुम्भनिशुम्भकपालधरे प्रणमामि तु देवि नरार्तिहरे॥1॥ नवरात्री चा उत्सव म्हणजे उत्साहाला उधाण. घराघराप्रमाणे नवरात्रीच्या चालीरीती बदलतात. परंतु उपवास हा या सर्वांच्या केंद्र स्थानी असतोच. काहीजण उठता बसतां करतात, काहीजण एकादशी सारखा नऊ दिवस करतात, काहीजण भाजका फराळ करतात. उपवासाचे पदार्थ हा भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक अत्यंत महत्वाचा व…
पानगी
नमस्कार ! आपला सर्वांचा प्रतीसाद उत्साहवर्धक आहे, पण त्यामुळे जबाबदारीही वाढते आहे व त्याची मला विनम्र जाणीव आहे. आपल्या संवादाचे तीन अंक गोडाचे झाले म्हणून आता थोडा रूचीपालट करूयात. कोकण म्हटले की केळीची झाडे, माड, सुपारी, तांदूळ, फणस , आंबा व अश्या अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येतात. माझे आजोळ जालगाव, दापोली. त्यामुळे दर मे महिना आजीकडे….
डाळिंब वडी
मागच्या डाळिंब पुराणात आम्ही तुम्हाला एक छायाचित्र देऊन ते काय असावे अस विचारल होतं. माझी वहिनी सौ संपदा पटवर्धन, पुणे यांनी त्याचा अचूक वेध घेतला आहे…. “डाळिंब वडी” दचकू नका ! ……….खरच सुरेख लागते. साहित्य २ वाट्या डाळिंबांचा रस पेढे ( गणपतीच्या प्रसादाचे उरले होते,) १५० ग्रॅम( खवा १०० ग्रॅम घेवू शकता) २ चमचे साय…
अनारकढी…एक नविन प्रयोग
खेडेगावात राहण्याचे काही फायदे असतात,दूधदूभतं, फळफळावळ, पालेभाज्या यांची रेलचेल असते व बय्राच वेळा त्यांचे भावही रास्त असतात. त्यातच अनिल ( आमचे हे ) डाॅक्टर आहेत, खेड्यापाड्यातील रूग्ण अजूनही डाॅक्टर बद्दल मनांत श्रध्दा बाळगून आहेत त्यामुळे आपल्या शेतातील पालेभाज्या, फळे, डाॅक्टर कडे येताना आवर्जून आणली व दिली जातात. अशीच परवा एका पेशंटने बरीच डाळिंबे आणुन दिली….