मँगो जाम

 एक जामची बाटली घरात असली की पोळी, ब्रेड ,पराठा, धिरडं या सर्वांच्या बरोबर लावून एक वेळची  न्याहरी  होते. तसेच गडबडीच्या वेळात जाम आपल्याला खूप मदत करतो.  लहान मुले, वयस्कर माणसे  यांच्यासाठी हा एक पर्वणीच आहे.  जून महिन्यात जशी आपण लोणची घालतो तसेच जाम देखील करायला हरकत नाही.  या दिवसात बाजारात तोतापुरी आंबा खूप येतो.  त्याच्याबरोबर…

टोमॅटोचे  लोणचे

सध्या कैरीचा हंगाम चालू आहे हे मान्य आहे पण तरीही बाजारात टोमॅटोही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.  शिवाय हा पदार्थ टिकतो ही भरपूर.  साहित्य :  १ एक  किलो लाल टोमॅटो  २ ५० ग्राम मीठ ३ ५० ग्राम बडीशेप ४ ५० ग्राम जीरे ५ १00-ग्राम  चिंच  ६ एक चमचा मेथी ७ एक मोठा चमचा लाल तिखट  ८…

पडवळाच्या बियांचे   डोसे

फोंडा गोवा येथील लेखिका व माजी मुख्याध्यापिका शैलाताई राव यांनी ही एक आगळीवेगळी पाककृती नुकतीच गप्पांच्या ओघात सांगितली. साहित्य: १ एक भांडे उकडा तांदूळ २ अर्धे भांडे खोवलेला ओला नारळ ३ अर्धे भांडे पडवळच्या आतील बिया ४ चवीनुसार चिंच ,गूळ, मीठ. चिंच साधारणपणे लहान लिंबाएवढी लागते. ५ मीठ, हिंग, चार ते पाच सुक्या मिरच्या कृती:…

कलिंगडाच्या पांढऱ्या भागापासून बनवलेले  दोसे 

शैलाताईंनी मागच्या आठवड्यात पडवळच्या बियांचे  दोसे  कसे करायचे हे जसे दाखवले त्याच पद्धतीने आज आपण कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचे  दोसे  करणार आहोत.कलिंगडाचा लाल चुटुक  भाग खाऊन झाला की आपण साल टाकून देतो.  ती साल न टाकता पाठचा हिरवा भाग तसाच ठेवून मधला पांढरा स्वच्छ भाग आपण किसून घेणार आहोत. साहित्य पाहूया.  साहित्य :  १  दोन भांडी…

चैत्रांगण : लोकसंस्कृतीचा अनोखा उत्सव

मंडळी नमस्कार,   चैत्र महिना सुरू झाला आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जाणारा  हा महिना सुरू झाला की ‘ चैत्रांगण “ अपरिहार्यपणे आठवते.   चैत्रांगणाचा उगम  हा लोकसंस्कृतीत  आहे.  विविध शुभचिन्हांनी नटलेली एक रांगोळी  चैत्र महिन्यात काढली जाते.आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ही रांगोळी असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. ही माझी अत्यंत आवडती रांगोळी. या…

लावणी नव्हे  भुलावणी ५

    फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते रंगपंचमी या कालावधीत पंढरपुरात साजऱ्या होणाऱ्या उत्पात  समाजाच्या लावणी महोत्सवाचा आढावा आपण घेत आहोत. कोणे एके काळी हा लावणी महोत्सव वसंत पंचमी ते रंगपंचमी असा चालायचा.  कालौघात तो आता फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते रंगपंचमी असा होतो.या महोत्सवाचे स्थलांतर आता उत्पात  वाड्यात  म्हणजेच  एकनाथ भवन येथे  झाले आहे.  आजही तितक्यात उत्साहाने एखादा…

लावणी नव्हे  भुलावणी ४

 फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते रंगपंचमी या कालावधीत पंढरपुरात साजऱ्या होणाऱ्या उत्पात  समाजाच्या लावणी महोत्सवाचा आढावा आपण घेत आहोत. आज आपण परिचय करून  घेणार आहोत या परंपरेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून तिला एका नव्या उंचीवर नेणाऱ्या एका कलंदर व्यक्तिमत्त्वाचा,  अर्थातच ज्ञानोबा उत्पात यांचा. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आल आणि अदाकारी यांचा एक आगळावेगळा संगम होता. त्यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर…

लावणी नव्हे  भुलावणी ३

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते रंगपंचमी या कालावधीत पंढरपुरात साजऱ्या होणाऱ्या उत्पात  समाजाच्या लावणी महोत्सवाचा आढावा आपण घेत आहोत. आज आपण माहिती घेणार आहोत या परंपरेचा वसा संभाळून ,वाढवून पुढच्या पिढीकडे सोपवणाऱ्या एका कलंदर व्यक्तिमत्त्वाचा. हे व्यक्तिमत्त्व आहे मृदंगाचार्य शंकर आप्पा मंगळवेढेकर यांचे.          उत्पातांची लावणी कै. ज्ञानोबाच्या पिढीला मिळाली  ती शंकर अप्पांमुळे . शंकररावांचे घराणे हे…

लावणी नव्हे  भुलावणी २ 

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते रंगपंचमी या कालावधीत पंढरपुरात साजऱ्या होणाऱ्या उत्पात  समाजाच्या लावणी महोत्सवाचा आढावा आपण घेत आहोत. फाल्गुन  कृष्ण प्रतिपदेला  वसंत ऋतूचा आरंभ होतो असे समजले जाते. काल आपण या लावणीपरंपरेचे आद्य गायक समजले जाणारे बाळकोबा उत्पात यांची माहिती घेतली. आज या परंपरेला वृद्धिंगत करणारे अजून एक दिग्गज कैलासवासी दादबा उत्पात  यांच्या कामगिरीची माहिती…

लावणी नव्हे  भुलावणी १

फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला येणारी होळी हा भारतातला एक पारंपारिक सण आहे.  सामाजिक सौहार्द्र  जपणारा हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक.  होळी म्हणजे रंगाची  उधळण,  वसंताचे स्वागत करणारा निसर्ग ! देशभरात हा सण वेगवेगळ्या परंपरांनी साजरा केला जातो.  आमच्या पंढरपुरात हा सण एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा होतो. श्रुती व रसना या दोन्हींना पूरक अशी…