सध्या कैरीचा हंगाम चालू आहे हे मान्य आहे पण तरीही बाजारात टोमॅटोही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शिवाय हा पदार्थ टिकतो ही भरपूर.
साहित्य :
१ एक किलो लाल टोमॅटो
२ ५० ग्राम मीठ
३ ५० ग्राम बडीशेप
४ ५० ग्राम जीरे
५ १00-ग्राम चिंच
६ एक चमचा मेथी
७ एक मोठा चमचा लाल तिखट
८ १२० -ग्राम लसूण
९ दोन वाट्या (आमटीची वाटी) तेल
१० हिंग अर्धा चमचा
११ १०-१५ कढीपत्त्याची पाने
१२ फोडणीसाठी : जीरे ,मोहरी १-१ चमचा
१३ एक वाटी साखर
कृती
१ चिंच स्वच्छ करुन घेणे.
२ रात्री टोमॅटो स्वच्छ पुसुन पातळ ,लांबडे काप करुन घेणे.सगळ्या फोडी स्टीलच्या पातेल्यात घालणे व त्यात मीठ मिसळणे व झाकून ठेवणे.सकाळी मीठामुळे टोमॅटोला पाणी सुटलेले असेल. ते पाणी हाताने घट्ट पिळून काढणे .पिळून काढलेले टोमॅटो स्टीलच्या ताटात किंवा प्लास्टीक पेपरवर पसरुन उन्हात वाळण्यास ठेवणे. टोमॅटो पिळून निघालेल्या पाण्यात स्वच्छ केलेली चिंच भिजत घालणे आणि ते पाणीपण उन्हात ठेवणे.दुसत्या दिवशी कडकडीत वाळलेले टोमॅटो चिंचेच्या पाण्यात मिसळून त्यात लाल तिखट घालणे.
३ नंतर बडीशेप ,जीरे ,आणि मेथी मंद आचेवर थोडी भाजून घ्यावी.या तिन्ही वस्तू थंड करुन मिक्सरवर भरड दळून घेणे.
४ आता वरील टोमॅटोचे मिश्रण मिक्सरमधून बारीक दळून घेणे.ते मिश्रण एका स्टीलच्या पातेल्यात काढून घेणे.त्यात भरड केलेल्या वस्तु घालणे.त्याच बरोबर साखर पण त्यात घालणे व सर्व मिश्रण हलवून एकसारखे करणे.
५ त्यानंतर कढईत तेल घालून तापवून घेणे. त्यात जीरे ,मोहरी, हिंग आणि कुटलेला लसूण घालणे .लसूण गुलाबी झाल्यावर .फोडणी थंड करण्यासाठी ठेवणे .फोडणी थंड झाल्यावर टोमॅटोच्या मिश्रणात घालणे व एकसारखे करणे.
असे हे चटपटीत टोमॅटोचे लोणचे तयार.
(यात तिखट मीठ किंवा साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता)
हा पदार्थ अलकाताई इनामदार पुणे यांनी मला सुचवला. त्यांचे हार्दिक आभार .
सौ शुभांगी अनिल जोशी
Khamangby shubhangiyou tube channel