बिमलाचे गोमंतकीय लोणचे 

नुकतेच आम्ही गोव्यात गेलो होतो . तिथे आमचा मुक्काम सौ सुशांता व दत्ता नाईक यांच्या “ सांतेर  “ या फार्म हाऊस वर होता . सांतेर म्हणजे वारूळ . वारूळ हे सृजनाचे सांस्कृतिक प्रतीक  आहे . त्यांचे हे फार्म हाऊस अत्यंत निसर्गरम्य आहे . माड , पपनस , चाफा , फणस , रातआंबे , आंबा , चिकू , आणि असंख्य झाडे व पक्षी यांच्या दाटीत हे सांतेर आहे . सकाळी मी व सुशांता बागेत फिरत होतो .अचानक सुशांता ने बिमलीचे झाड दाखवले आणि पटकन म्हणाली याचे लोणचे मस्त लागते . फिरून आल्यावर नाश्तात हे लोणचे वाढले ,अतिशय चविष्ठ लोणचे लागले . मग माझ्यातील खवय्या जागृत झाला आणि त्यातून मिळालेली विशेष कृती . सौ सुशांता आणि दत्ताजी या दांपत्याने आमचे आदरातिथ्य खास गोवन पध्दतीने केले . गप्पात कोकणी मराठी भाषा व त्यांचा अंत:संबंध या विषयी जोरदार चर्चा रंगली . 

कोकणी भाषेचा लहेजा मला फार आवडला त्यामुळे मी आग्रहाने सुशांताला उत्तम मराठी येत असताना सुध्दा या लोणच्याची कृती कोकणी भाषेत सांगायचा आग्रहच धरला . सोबत दत्ताजींनाही पुस्ती जोडायला लावली . या दांपत्याने फारच गोड कोकणी भाषेत ही कृती सांगितली .

साहित्य 

१= १/२ वाटी फोडी बिमलाच्या 

२=३/४ वाटी गुळ 

३= १ चमचा तिखट

४= दीड चमचा लोणच्याचा मसाला 

५=थोडी मोहरी व हळद 

६= पाणी 

७=१/४ चमचा तेल 

८= एक मिरची 

कृती

१= प्रथम बिमलाचे फळ धुवून स्वच्छ करा , कोरडे करा, मग याच्या चकत्या ( पातळ नकोत ) करायच्या . पातेल्यात पाव चमचा तेल गरम करा . त्यात मोहरी व मिरची फोडणीस घालायची ,नंतर बिमलाच्या  फोडी पण फोडणीत घालायच्या . 

आता या मिश्रणात गुळ व एक चमचा पाणी घाला . या मिश्रणाला पाणी सुटते कारण हे फळ पाणसर व चविला आंबट असते . पाच मिनीटं हे मिश्रण उकळू द्यायचे . पाच मिनीटाने बिमला पण मऊ होते मग यांत हळद , तिखट , लोणच्याचा मसाला , मीठ घालून बारीक गॅस वर हे मिश्रण दहा मिनीटे रटरट उकळू त्याने .

२= मिश्रण घट्ट होवू लागल्यावर गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवा. 

मस्त बिमलाचे लोणचे तयार 👍👍👍

नविन आहेना ? हा लोणच्याचा प्रकार करून पहा . 

वरील कृती प्रत्यक्ष पाहण्यासाठी माझ्या YouTube channel ला भेट द्या 👍

https://youtu.be/Y4pvVv5NeMc

https://youtu.be/Y4pvVv5NeMc

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.