जरा नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची चटणी आहे ही. चवीला फारच मस्त लागते. भाजणीच्या वड्या बरोबर, मिश्रडाळीचे वडे, धिरडी या सोबत ही पातळ ओव्याची चटणी एकदम सही 😋👏👍
साहित्य व कृती पाहूयात.
साहित्य

- ओव्याची दहा ते बारा पाने स्वच्छ धुवून घ्यायची
- ओला नारळ खोवलेला १/२ वाटी
- तीन हिरव्या मिरच्या ( तुम्हाला चटणी जास्त तिखट हवी असल्यास मिरचीचे प्रमाण वाढवा )
- तीन ते चार काळीमीरीचे दाणे ( कूटून घ्यायचे )
- दोन चमचे साजूक तूप
- मोठी वाटी भरून जरा आंबट ताक
- पाच कढीलिंबाची पाने
- दोन वाळलेल्या लाल मिरच्या
- जिरे
कृती
- ओव्याची पाने हातानेच मोडून घ्यायची. पॅन मधे एक चमचा तूप गरम करा. त्यात जीरे, काळीमिरी, मिरच्यांचे तुकडे परतून घ्यायचे. आता ओव्याची पाने त्यात घालून परत दोन मिनींटे परतून घ्या.
- मिक्सर मधे ओला नारळ, वरील परतलेले मिश्रण, चवीनुसार मीठ, आंबट ताक घालून चटणी बारीक वाटून घ्यायची.
- चटणी पातळ पाहिजे. म्हणून उरलेले ताक घालून चटणी सरसरीत करायची.
- चटणीला तूपाची जीरे, लालमिरची, कढिलींबाची पाने घालून खमंग फोडणी वरून द्यायची.
मस्त चटणी तयार. पाहतायना करून 👍
जर ओव्याची पाने फारच कोवळी असतील तर चटणी करताना पानांची संख्या वाढवा.
khup chavishta mast hot asanar chatani nakki karun baghen khup chan prakar👌
LikeLike