मंडळी,
चुरचुरीत व चवदार डावी बाजू आपण सध्या पाहत आहोत. या मालिकेतील दुसरा पदार्थ आज सादर करते आहे.
साहित्य
- कोथिंबीर जूडी मोठी एक (साधारणतः दोन मोठ्या वाट्या भरतील एवढी कोथिंबीर)
- मिरच्या पाउण ते अर्धा वाटी
- चिंच एक मोठा चमचा भरू (चिंचोके व शिरा काढलेली)
- जिरे अर्धा चमचा
- चवीनुसार मीठ
- तेल दोन चमचे (फोडणीचे साहित्य)
कृती
- कोथिंबीर निवडून, स्वच्छ करून, धूऊन स्वच्छ फडक्यावर वाळवून मग बारीक करायची आहे. यात पाण्याचा अंश न राहण्याची खबरदारी घ्या.
- मिरच्या पूर्ण कोरड्या करून त्याचे तुकडे करून घ्या.
- आता आपण फोडणी करून घेऊयात. यासाठी दोन चमचे तेल कढईत घेऊन त्यात एक चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, एक चमचा भरून हिंग आणि किंचित हळद घालायची आहे. हि फोडणी पूर्ण गार झाल्यावर आपल्याला लागणार आहे
- मिक्सरच्या भांड्यात पहिल्यांदा थोडी कोथिंबीर नंतर मिरच्यांचे तुकडे, जिरे चिंच मीठ आणि परत वरती उरलेली कोथिंबीर घाला. मिक्सर फिरवून चटणी वाटा. हे वाटण आपल्याला थोडेसे सरबरीत ठेवायचे आहे. जिरे कोथिंबीर थोडी जीवाला लागली पाहिजेत.
- या वाटलेल्या चटणी वरती गार फोडणी घाला.
अशा पद्धतीने केलेली चटणी आठ दिवस टिकते. ही चटणी पोळी भाकरी ठेपले ब्रेड पराठे यातील कशाबरोबरही उत्तम लागते. ही कृती माझ्या आईने मला सांगितलेली आहे. ही चटणी करण्यात तिचा हातखंडा होता.
छानच
LikeLiked by 1 person