स्टीकी मॅगो राईस हा साऊथ ईस्ट अशिया मधील डेझर्ट प्रकार आहे. उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याच्या सीझन मधे खास हा पदार्थ केला जातो. Glutionus rice याला लागतो. थायलंड मधील खूपच प्रसिध्द डीश आहे. ही डीश त्यांची पांरपारीक आहे.
या सीझन मधे उकाडा भरपूर असतो. आंब्याचा गोड स्वाद, नारळाच्या दुधातील स्नीग्धता, यामुळे उन्हाळयात ताजेतवाने करायला ही डीश खूपच उपयुक्त ठरते.
आपल्या भारतात पण तांदूळ, नारळ, आंबे मुबलक प्रमाणात मिळतात. आपणही नानाविध प्रकार आंब्याचे करत असतो. मी ही डीश जेव्हा टेस्ट केली तेव्हांच ठरवले, आपण ही या उन्हाळयात ही नाविन्यपूर्ण डीश करायची व तुम्हालाही माहिती द्यायची.
राहिला प्रश्न glutinous rice मिळण्याचा ? पण तो मिळत नाही म्हणून काही अडत नाही. आपण इंद्रायणी तांदूळ वापरू शकतो कारण त्याचा भात जरा चिकटच होतो.
मग चला करून पाहूयात.
साहित्य

- १ वाटी तांदूळ भरून ( इंद्रायणी, बासमती यांतील कोणताही )
- दोन हापूस आंबे
- दोन नारळ खोवून त्याचे घट्ट दूध
- साखर अर्धा ते पाऊण वाटी
- सैंधव मीठ
- कॉर्न फ्लॉवर किंवा कॉर्न स्टार्च एक चमचा
- फोडणी साठी एक चमचा तूप
- एक चमचा तीळ, दोन लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता ची चार ते पाच पाने
कृती
- पहिल्यांदा एक वाटी तांदूळ तीन ते चार वेळा हाताने चोळून धुवून पाण्यात एक ते दोन तास भिजत घालायचे.
- नारळ खोवून तो गरम पाण्यात भिजत घाला तासभर. म्हणजे दूध चांगले निघेल. मिक्सर मधे नारळाचा चव चांगला वाटून घ्या. वाटून झाल्यावर गाळण्यावर घालून त्याचा रस काढा. गाळण्यावर उरलेला नारळ मिक्सर मधून फिरवून घ्या. असे तीन वेळा करा मग चोथा स्वच्छ फडक्यावर टाकून घट्ट पिळून घ्या. अश्याप्रकारे नारळाचे दूध घट्ट छान निघते . साधारण दीड कप भरून दूध निघेल. आजकाल बाजारात डाबरचे तयार coconut milk मिळते. ते मिळाले तर हा उपदव्याप करावा लागणार नाही.
- आपण भिजत घातलेले तांदूळ चाळणीवर ओतून चांगले निथळत ठेवा. एक वाटी तांदूळास दोन वाट्या पाणी घेवून गॅस वर पातेल्यात पाणी तापत ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात तांदूळ घालून वरती झाकण ठेवून भात शिजत ठेवायचा. गॅस मोठा नाही ठेवायचा. साधारण वीस मिनीट लागतो भात शिजायला. जरा भातामधील पाणी आटत आले की एक चिमूट सैंधव मीठ घालायचे व भात हलवून परत झाकण ठेवायचे.
- दुसऱ्या गॅसवर पॅन मधे नारळाचे दूध गरम करत ठेवायचे. आधीच दोन चमचे दूध एका वाटीत बाजूला काढून ठेवा. नारळाच्या दूधात साखर व किंचीत मीठ घालायचे. साखर विरघळे पर्यंत दूध ढवळत रहायचे. आता वाटीत काढलेल्या दूधात एक चमचा काॅर्नस्टार्च घालून ते एकजीव करून घ्या व उकळत असलेल्या दूधात मिक्स करा. आता हे मिश्रण थोडे उकळल्यावर घट्ट होते. लगेच गॅस बंद करायचा.
- भात शिजला कि त्यात घट्ट नारळाचे दूध घालायचे. थोडे तीन चमचे दूध बाजूला काढून ठेवायचे. साधारण पंधरा ते वीस मिनिटे भात नारळाच्या दूधात मुरू द्यायचा. पंधरा मिनीटाने भाताने सर्व नारळाचे दूध शोषून घेतलेल असेल व तो भात फुगलाही असेल. आंब्याचे साल काढून टाका ,त्याच्या उभ्या फोडी करून ठेवा.
- एका कढईत तूप तापत ठेवा, तूप तापल्यावर त्यात प्रथम तीळ घाला ते तडतडायला लागले कि लाल मिरची व कढीपत्ता घाला. खमंग फोडणी करायची आहे.मूळ थाई स्टीकी राईस मधे फोडणी नाही घालत. अश्या प्रकारे या भाताला फोडणीचा तडका द्यायचा ही माझी कल्पना आहे. मूळ थाई पध्दती नुसार नुसते तीळ भाजून भातावर भूरभूरतात. पण मला तडका आवडतो म्हणून मी हा twist दिला.
- आता एका डीश मधे भात काढा. त्यावर हा तडका एक चमचा घाला. कडेला आंब्याच्या फोडी मांडा. भातावर आपण काढून ठेवलेला साॅस ( नारळाचे घट्ट दूध) एक चमचा घालायचे आणि आम्र ओदन याचा मनोसोक्त आनंद घ्यायचा.
मग करून पहाणार ना ?
कारण आंबे संपत आले आहेत आणि आता नाही केलीत ही डीश तर पुढच्या वर्षी पर्यंत वाट पहावी लागेल 😀😢
चला तर करून पहा
माझे khamang YouTube channel subscribe करा. लाईक करा .
हे म्हणजे वर्षानुवर्षे मुम्बैच्या लोकल मध्ये प्रवास करणार्या एखाद्या युवतीने अचानक एखाद्या दिवशी स्वतः खूप नटून थटून ,त्याबरोबर डब्यातल्या दहीभातालाही कौतुके नारळ दुधाच्या अभिषेकात ,सोन्याच्या दगिन्यांनी मढ्वुन बरोबर नेल्यासारखे आहे….
LikeLiked by 1 person
शुभान्गी खुपच हट के डिश आहे,फोडणीचा twist पण मस्त
नारळीभाताचा भाऊ म्हणू शकतो ह्याला.
अशाच रेसिपी देत रहा सिजन प्रमाणे🤗
LikeLiked by 1 person
Khupach chan dish ..navinyapurna👌
LikeLike