राक्षा मधुफला स्वाद्वी हारहूरा फलोत्तमा ।
मृद्वीका मधुयोनिश्च रसाला गोस्तनी गुडा ॥१॥
द्राक्ष हे फळ म्हणजे निसर्गाचा अनमोल मेवा आहे. याच्या सेवनाने शरीरामध्ये नवचैतन्य निर्माण होऊन स्फूर्ती मिळते.
महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, जळगाव या भागांत द्राक्षाची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाते. मराठीमध्ये द्राक्षे, हिंदीमध्ये अंगुर, संस्कृतमध्ये द्राक्षा तर, इंग्रजीमध्ये ग्रेप्स आणि शास्त्रीय भाषेत विटीस विनीफेरा या नावाने द्राक्षे ओळखतात.
स्त्रीयांच्या भावविश्वात ही या द्राक्षांना वेगळे स्थान आहे.स्त्रीयांच्या अनेक आभूषणात द्राक्षाचे प्रतिक आपणांस पाहायला मिळते.
द्राक्षांचे काहि पदार्थ आपण पाहूयात.
द्राक्षाचे सरबत
खालील प्रमाण दोन ग्लास सरबता साठी आहे .
साहित्य

- एक वाटी भरून द्राक्षे, जर सरबत दाट हवे असेल तर द्राक्षे थोडी जास्त घ्या
- पाव चमचा जिरे
- चवीपुरते काळे मीठ
- पाच ते सहा पुदीन्याची पाने, अर्धी हिरवी मिरची, अर्ध लिंबु
- बर्फ किंवा गारपाणी
- कोथिंबीर ऐच्छिक आहे ,कोथिंबीर घातली तर रंग हिरवा गार येतो
कृती
- पहिल्यांदा द्राक्षे , जिरे, मिरचीचा तुकडा, फ्रायपॅन मधे घ्या. गॅस मिडीयम ठेवून द्राक्ष्याला थोडे डाग पडेपर्यंत परतून घ्या. जरा गार होवू द्यायचे साहित्य.
- आता मिक्सर जार मधे वरील साहित्य घाला, त्यात मीठ, पुदीना पाने, पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करा.
- आता हा रस गाळून घ्या. नंतर त्यावर लिंबु पिळा. मस्त सरबत तयार. द्राक्षे मुळचीच गोड असतात त्यामुळे साखर घालायची गरज नसते.
- जरा वेगळा स्मोकी स्वाद येतो सरबताला.
- द्राक्षे न भाजता सरबत केले तरी चालेल ज्याची त्याची आवड.खालील व्हिडीओत मी द्राक्षे न भाजता सरबत केले आहे.
द्राक्षाचा मुरंबा
साहित्य
- एक वाटी द्राक्षे
- पाव वाटी साखर
- केशर काडी
- लिंबू रस चविनुसार
कृती
- द्राक्षे दोन भागांत कापून घ्या. जर तुम्हाला फोड मऊ हवी असेल तर द्राक्षे पाच मिनिटे वाफवून घ्या.
- पातेल्यात साखर घाला, साखर बुडेल एवढे पाणी घालायचे. पाण्यात साखर विरघळून जरा उकळी आली व पाक दाट झाला कि लगेच द्राक्षे घालायची व एक कढ आणायचा. केशर ही घालायचे.
- जरा मुरंबा कोमट झाला कि लिंबु पीळा.
- लवंग व वेलची तुम्हाला आवडत असेल तर मुरांब्यात जरूर वापरा.
हा मुरंबा १० ते १२ दिवस टिकतो. पण फ्रिज मधे ठेवा.
द्राक्षाची चटणी
साहित्य
- वाटीभर द्राक्षे
- कोथिंबीर , मीरच्या चार ते पाच, चीमुट भर जिरे, पुदीन्याची पाने पाच, लसूण ,ओले खोबरे १/२ वाटी , पंढरपूरी डाळे पाव वाटी. चविनुसार मीठ, १/२ लिंबांचा रस.
कृती
- मिक्सर जार मधे वरील सर्व साहित्य घालून चटणी बारीक वाटून घ्या, वाटून झालेल्या चटणीवर लिंबु जरूर पीळा.
- पटकन करता येते चटणी व याला फोडणीची गरज नाही. ब्रेडवर लावण्यास, धिरड्या बरोबर, पराठ्या बरोबर ही चटणी मस्त लागते.
Great idea to fry the grapes!
LikeLike
Great idea to fry the grapes!
LikeLike
va chane new sweer & healthy recip
LikeLiked by 1 person
Khupach chan …nirnirale drakshache prakar👌
LikeLiked by 1 person