मोदकाची आमटी

या इटालियन अनुभवाचा विचार करीत असताना मला आपला एक खास भारतीय प्रकार आठवला .. तो असा …

मोदकाची आमटी :
ही आमटी माझी नणंद अरुणा उत्तम बनवते . तिच्याकडून शिकलेले हे प्रमाण आज देत आहे.

सारणाचे साहित्य

  • १ मोठा चमचा तीळ (भाजलेले)
  • १ मोठा चमचा खसखस (भाजलेली)
  • १ मोठा चमचा शेंगदाणा कूट
  • १ चमचा धना जिरा पावडर
  • १ छोटी वाटी सुकं खोबरं (खिसून भाजलेले)
  • १ चमचा काळा मसाला
  • ५-६ लसूण पाकळ्या
  • कोथिंबीर एक वाटी

हे सगळे पदार्थ मिक्सर मधून बारीक करा. त्यात कोथिंबीर मिसळावी. वाटताना कोथिंबीर वाटू नका तीवेगळीच चिरून मिक्स करायची. मीठ चविनुसार घाला.

मोदक करण्यासाठी साहित्य

  • १ वाटी डाळीचे पीठ चवीनुसार हळद, तिखट, मीठ, तेल घट्ट मळून घ्यावे.

मोदकाची कृती

डाळीच्या पिठाची हातावर छोटी पारी (म्हणजे छोटी पुरी ) करा. त्यात वरील सारण अर्धा चमचा घालूनमोदक वळा. असे सगळे मोदक ताटलीत तयार ठेवा.

कृती

  1. पातेल्यात दोन चमचे तेल घेऊन गरम करावे. खमंग चरचरीत फोडणी करा.
  2. आता त्यात कढीपत्ता, काळा मसाला, थोडे लाल तिखट घालावे.
  3. थोडेसे सारण (मोदकासाठी तयार केलेले सारण दोन चमचे काढून ठेवा) त्यात पाणी घालूनपातेल्यात उकळी आणण्यास घालावे. चवीनुसार मीठ घाला. तीन वाट्या पाणी त्यात घाला. आता पाण्याला उकळी आल्यावर त्यात केलेले मोदक सोडा. पाण्याबरोबर मोदक उकळू लागतील. पाच मिनिटातच मोदक वर येतील. हाताने परी शिजल्याचीखात्री करा. खमंग वास घरभर दरवळतो.
  4. जेवायला बसताना मोदक आमटीत चुरायचा, गरम पोळी किंवा भाकरीबरोबर ताव मारायचा.

एक मोदकाची फक्कड आमटी असली की इतर भाजी, कोशिंबीर, चटणी यांना टाटा करता येतो.
मग आपली भारतीय ravioli करून पहा पण त्या बरोबर कधीतरी Italian ravioli सुध्दा करायलाहरकत नाही .👍

8 Comments Add yours

  1. डाॅ. अरूण हरके म्हणतो आहे:

    अप्रतिम, शुभांगी ! मुखरस वर्धित जाहला!!
    मी अनिलचा एक म्हातारा दोस्त. आपणा उभयतांन्वर अक्षता टाकल्या आहेत मी !!

    अनिल आम्हाला साहित्यरसात चिंब भिजवतो आणि आपण पंचामृत serve करता ! द्रुष्ट लागण्यासारखी जोडी आहे आपली ! परमेश्वर आपणा उभयतांस उदंड आयुष्य देवो !

    Liked by 1 person

  2. संजीवनी आफळे म्हणतो आहे:

    इटालीयन राव्हिओलीपेक्षा नक्कीच खंमग असणार ही मोदक आमटी ! 👌

    Liked by 1 person

  3. Sushama म्हणतो आहे:

    Recipe has been described so well that even I may be able to follow it. One question, we fo not fry or stir fry the modaks, do we? 2. The ” pari” should be kept thin or must be slightly thick so it does not burst in the liquid?
    We do not have to add any ” chinch- gooL” ?
    Very tempting, Shubhang. Bless you.

    Like

    1. Shubhangi Joshi म्हणतो आहे:

      1 No need to fry or stir fry the Modak.2 The Pari should be thin 3 No chinch-good. Thanks.

      Like

  4. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

    Italian & Indian ravioli great mastach modak amati karun pahin.👌

    Like

  5. Sumedha Barve म्हणतो आहे:

    Wow one more tempting recipe,
    will surely try it 😋😋👌👌

    Like

  6. Jayashri jagtap म्हणतो आहे:

    मस्त

    Like

  7. himali म्हणतो आहे:

    we call this dish ‘pithache wange’, literally means ‘ brinjals made of flour’, because we are not supposed to eat brinjal.
    we steam the ‘modaks’ seperately , give a crosscut at the top and then add them to boiling tempered water/curry., not to mention very few modaks reach the curry as steamed modaks taste too good and vanish just like that!

    Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.