खमंग एक वर्षाचा होताना ……..

तुमचा आमचा खमंग संवाद सुरू होवून बघतां बघतां एक वर्ष झाले. या वर्षात आपण सव्वीस वेळा भेटलो. कै दुर्गा बाई भागवत यांनी स्वयंपाक घर व संस्कृती यांतील भावबंध अनेकवेळा त्यांच्या खास शैलीने उलगडून दाखवले आहेत. आपल्या कडे स्वयंपाक हे नुसते काम नसून तो एक सर्व ज्ञानेद्रींयांचा आनंद सोहळा असतो. या वर्षभरात १५९७३ रसिक खव्वयांनी २७४५० वेळा माझ्या या लिखाणाचा आस्वाद घेतला.

“ भाग गेला शीण गेला “ , कुळीथ, कोशिंबीर, अनारकढी, खापरपोळी, बाजरी, मोदक, कोयाडं , हे पहिले सहा लोकप्रिय मथळे.
डाॅक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, हेमंत कुलकर्णी, सुरंगा दाते, मृण्मयी रानडे, आणि माझ्या असंख्य मित्रमैत्रिणींमुळे मी ही मजल गाठू शकले. आगामी काळासाठी दोन नविन संकल्प योजले आहेत. पहिले म्हणजे लिखाण मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत प्रसिध्द करायचे. दुसरे म्हणजे पदार्थ बनत असतानाचे प्रत्यक्ष चित्रण शक्य तीथे दाखवायचे. पाहूया कसे जमते ते. माझ्या लिखाणाबाबत काही सुचना असल्यास त्या जरूर कराव्यात ही विनंती. आपल्या कडे एखादा हटके पदार्थ असल्यास जरूर कळवावा.

वाढदिवस साजरा करायचा आहे मग गोड पाहिजेच. दुसरा तिखट पदार्थ म्हणजे पेंडपाला. खास पंढरपूरी मेनु . लग्नकार्यात, श्रमपरिहार, मेजवानी काहीही असू देत पेंडपाल्या शिवाय पंगत उठत नाही. नावावरून पदार्थात कसला तरी पाला असावा असे मला वाटायचे. एका लग्नसमारंभास जेवायला गेले होते. तिथे पहिल्यांदा हा मेनु ऐकला व स्वाद घेतला. जेवताना पानात गुबगुबीत पोळी व त्यावर तुपाची धार व त्याच्याबरोबर वाटीत ही आमटी (पेंडपाला). बटाट्याची भाजी, भजी, दाण्याची चटणी, गुलाबजाम, ( जामून म्हणून पुकारतात ). बर खायची पध्दतच न्यारी. ती मला ठावूक नव्हती. मी आपली पोळी आमटीत बुडूवून खात होते. तेवढ्यात एक खणखणीत आवाज कानी आदळला “अहो डाॅक्टरीण बाई ( डाॅक्टर ची बायको म्हणून डाॅक्टरीण ) कस पोळी टोकून खाताव. अव पानात पोळी कुस्कराव त्यावर पेंडपाला व्हतायचा, तूप सोडायच, आणी मस्त कुचकारून खायच. हा खणखणीत आवाज आमच्या पंडाकाका उत्पातांचा. पेंडपाला करणे व ती पोळी बरोबर कशी खायची याची ते एक कार्यशाळाच आहेत असे मला वाटले. पगंतीतील तो आग्रह, आरडाओरडा सारं काही स्मरणात राहिले.
मग हा पेंडपाला कसा करायचा हे शिकले. नंतर याच पदार्थाची मागणी होवू लागली. सरावाने जमू लागला.

गव्हले भात

करायला सोपा पण विस्मृतीच्या पडद्याआड गेलेला.

साहित्य

 • १ वाटी गव्हले
 • पाव वाटी तूप
 • पाऊण वाटी साखर
 • तीन/चार लवंगा
 • काजू , बेदाणे, पीस्ता आपल्या आवडीनुसार
 • चार काड्या केशराच्या

कृती

 1. पातेल्यात तूप घालून ते गरम झाले की त्यात लवंगा व गव्हले टाकून मंद गॅसवर थोडेसे रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे.
 2. एक वाटी गव्हले घेतले आहेत त्याच्या दुप्पट पाणी तापत ठेवायचे. पाण्यास उकळी आल्यावर ते गव्हल्यावर घालायचे व दणकून वाफ आणायची.
 3. गव्हले शिजले की त्यात केशर व साखर घालून परतायचे व परत वाफ आणायची. छान मऊसर भात झाला पाहिजे.
 4. जर तुम्हाला खोबरे घालायला आवडत असेल तर, नारळ व साखर परतून घेवून ती गव्हल्यात घालावी.

दुर्गा बाईंनी खंत व्यक्त केली होती की आजकाल गव्हलेभात लोकांना करून घालणाऱ्या दोनतीनच बायका मी पाहिल्या आहेत व त्याही माझ्याच वयाच्या आहेत.
त्यांचा आदर ठेवत मी हा प्रयत्न केला 🙏.
तुम्ही ही करून पहा 👍

पेंडपाला

साहित्य

 • १ वाटी तुरीची डाळ
 • दहा पाकळ्या लसणीच्या ( १ चमचा भर लसूण वाटून लागतो), आल्याचा किस १/२ चमचा, कोथिंबीर १/२ वाटी, सुके खोबरे किसून पाव वाटी
 • १/२ चमचा जिरेपूड, १/२ चमचा धने पूड, तिळाचे कुट एक चमचा भरून, दाण्याचे कुट २ चमचे, काळामसाला दीड चमचा, १/२ वाटी चिंचेचा कोळ, गुळ पाव वाटी, मेथी दाणे अर्धा
 • चमचा, खडा हिंग १/२ चमचा, तेल चार चमचे

कृती

 1. तुरीची डाळ मऊ शिजवून घ्या, शिजल्यावर घोटून ठेवा .
 2. कढईत सुके खोबरे, कोथिंबीर, लसूण, आले थोड्या तेलावर परतून मिक्सर मधून वाटून ठेवा.
 3. पातेलीत तेल घाला, गरम झाल्यावर त्यात मोहरी, कडीपत्ता, हिंग, हळद व आपण वाटेलेले वाटण घालून चांगले परता, आता त्यात तिळाचेकुट, दाण्याचे कुट, घने, जिरे पूड, काळे तिखट, घाला. परत एक मिनीट परता.
 4. मसाला तेल सोडायला लागेल मग त्यात चिंचेचा कोळ व गुळ घालायचे. पाण्याला उकळी आणून ठेवा ( पाच ते सहा वाट्या पाणी ). हे कढत पाणी त्यात घाला. मग मीठ चवीनुसार घाला. पाण्याला उकळी आली की घोटलेली डाळ त्यात घालायची पेंडपाल्याला. चांगले उकळू द्यायचे. आता त्यात चमचा भरून लोणी घाला. लोणी नसेल तर तूप चालेल.

गरम अाहे तोपर्यंत पाने मांडा,पोळी कुचकरा, त्यावर पेंडपाला घाला, तुपाची धार सोडा व जेवायला बसा.
पंडाकाका त्यांच्या खास शैलीत म्हणायचे लेको ओरपा आता .😊👍
ही आमटी ( पेंडपाल्याला आमटी म्हणणे हा पंढरपूरातील गंभीर गुन्हा समजला जातो बरं का 🤭😱पेंडपाल्याची पार्टी देवूनच प्रायश्चीत्त्त घ्यावे लागते …..)

आमचे पंडाकाका

26 Comments Add yours

 1. Yeshwant Marathe म्हणतो आहे:

  Wow Shubhangi!! 15000 visitors & 28000 views in one year is phenomenal achievement. I must say you have a knack of making the blog posts very interesting. Keep it up!
  I wish that the figures at the end of 2nd year would read as under. 45000 Visitors & 75000 views. All the best.

  Liked by 2 people

 2. Anil Joshi म्हणतो आहे:

  “खमंग “चा एक वर्षाचा प्रवास माझ्यासाठी अनेक अर्थानी लाभदायक आहे . शुभांगीचे पाक कौशल्य वादातीत आहे . पण ते सादर करताना तिच्यातील सुप्त लेखिका लोकांसमोर आली याचे फार समाधान वाटते . ब्लॉगवर सादर प्रत्येक पदार्थ सगळ्यात आधी चाखायला मिळणे …” तोची पुरुष दैवाचा ” लागतो त्याला ! तिला हार्दिक शुभेच्छा !!
  आता थोडेसे आजच्या ब्लॉगबद्दल. पंडा हा पंडित शब्दाचा गाभा आहे . ज्या बुद्धीला परमज्ञान झाले आहे ती बुद्धी म्हणजे “पंडा ” बुद्धी . आमचा पंडाकाका हा असाच एक कर्मयोगी आहे . पाककला हे एक श्रेष्ठ कर्म आहे . पंडाकाकाचे हे कर्म नुसते कोरडे कर्म नाही . त्याला ज्ञान व भक्ती याची उत्तम जोड आहे . पेंडपाल्याच्या काल्यावर तुपाची धार ओतताना पंडाकाकाच्या चेहऱ्यावर जे सात्विक समाधान असते तोच सत्चिदानंद !!

  Like

 3. Aditi Marathe म्हणतो आहे:

  अभिनंदन !!!एका वर्षात एवढे वाचक !!खरच तुझ्या सर्व पाककृती नाविन्यपूर्ण आणि रुचकर असतात .तुझ्या पाककलेला सलाम !!!!!👌👍👍👍👍

  Like

 4. श्रीराम दांडेकर म्हणतो आहे:

  अप्रतिम, खमंग , मधुर,

  Like

 5. Janhavi Namjoshi म्हणतो आहे:

  खऱ्या अर्थाने सर्वोतोपरी सुगरण, चैतन्याला जणू हिच्यामुळेच चैतन्य म्हणावं, पाककौशल्यात निपुण, उत्कृष्ट कन्यका, पत्नी , आई, सून, मैत्रीण अशी आमची सौं शुभांगी ताई आणि अगदी उत्कृष्ट साथ Dr Anil काका ह्यांची, संपूर्ण जीवन आनंदाचे डोही आनंद तरंग……. अनंत शुभेच्छा आणि अभिनंदन ह्या प्रवासासाठी.

  Like

 6. Atul jadhav म्हणतो आहे:

  नमस्कार मॅडम आपली पाककृती चा आस्वाद मी प्रत्येक टायमाला घेत असतो. आत्तापर्यंत तुम्ही सर्व पाठवलेले रेसिपी मी माझ्या आईकडून करून घेण्याचा प्रयत्न केला. काही रेसिपी आईला जमल्या . पण काही रेसिपी ना बनवायला अडचणी आल्या तरीसुद्धा आईने बनवलेली रेसिपी खूप सुंदर होती. सर्वात पहिल्यांदा तुमचे आभार मानतो मी. अशा छानशा रेसिपी आपण आम्हास पाठवतात आणि त्याचा एक आस्वाद घेताना इतकं मनाला आनंद होतो तो आनंद माझ्या एकट्या वर नसून कुटुंबातील प्रत्येकांच्या चेहऱ्यावर दिसून येतो आणि मनाला समाधान वाटतं..
  अशाच रेसिपी आम्हाला पाठवत जावे..
  त्याचा आस्वाद येत जाऊ…
  मॅडम माझ्या मते तुम्ही खाद्य पदार्थ मधील अन्नपूर्णा आहात.
  🙏🙏🙏🙏🙏🙏🙂

  Like

 7. Shantanu Abhyankar म्हणतो आहे:

  गव्हले भात करायला सोपा आहेच अर्थात आधी गव्हले करायला जमले तर😁. आता गव्हले कोणी विशेष करत नाही.

  Liked by 1 person

 8. डाॅ.सौ.सुरेखा बोरावके म्हणतो आहे:

  व्वा शुभांगी,
  सर्वप्रथम तूझे खूप खूप अभिनंदन.
  तुझ्या blog ला नियमित visit देणारे केवढे visitors आहेत. अगदी पहिल्याच प्रयत्नात sixer मारलास की.
  असेच लिखाण करत रहा.
  तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  Liked by 1 person

 9. डाॅ.सौ.सुरेखा बोरावके म्हणतो आहे:

  व्वा शुभांगी,
  सर्वप्रथम तूझे खूप खूप अभिनंदन.
  तुझ्या blog ला नियमित visit देणारे केवढे visitors आहेत. अगदी पहिल्याच प्रयत्नात sixer मारलास की.
  असेच लिखाण करत रहा.
  तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  Like

 10. डाॅ.सौ.सुरेखा बोरावके म्हणतो आहे:

  व्वा शुभांगी,
  सर्वप्रथम तूझे खूप खूप अभिनंदन.
  तुझ्या blog ला नियमित visit देणारे केवढे visitors आहेत. अगदी पहिल्याच प्रयत्नात sixer मारलास की.
  असेच लिखाण करत रहा.
  तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  Like

 11. Prashant Takawale म्हणतो आहे:

  खरोखरच छान उपक्रम आहे. त्या निमित्ताने आपल्या खाद्य संस्कृती ची ओळख होते…
  पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .

  Liked by 1 person

 12. Aditi S Namjoshi म्हणतो आहे:

  अभिनंदन
  सर्वच ब्लॉग अप्रतिम. अश्याच अनेक उत्तम पारंपरिक रेसिपी ज आम्हाला तुमच्यामुळे शिकायला मिळोत ,🙏अनेक शुभेच्छा👍

  Liked by 1 person

 13. Uttara Joshi म्हणतो आहे:

  खूप छान लिहिले आहे यजमानान कडून कौतुक होणे तु परम भाग्यवान आहेस अशीच नेहमी प्रभू कृपा राहू दे 🙏🙏🙏😘🌹

  Liked by 1 person

 14. Sumangala Hegde म्हणतो आहे:

  Congratulations Aunty! Every recipe of yours comes with a special touch of love and experience behind it! Looking forward for more new and interesting recipes to share with my family!

  Liked by 1 person

 15. Bhakti Ratnaparkhi म्हणतो आहे:

  Kharay shubhangi tai…tuzya blog writing madhun tuze jabardast wachan ahe he shabdaganik kalun yete…..I usaully try to make some receipes from your blog which are easy for me😜 for example…patolya ..I like that type of receipe …so your blog is ideal for all of us because it contains tips as well as pictures and the basic information or origin about that particular food item …😘😘😘

  Liked by 1 person

 16. Sneha Divekar म्हणतो आहे:

  Shubhangi
  Khup khup abhinandan aani pudhil vatchalisathi shubheccha.
  Recepie barobarch tuze likhan hi mala khup aawadate,barobarchi mahiti pan khup interesting asate🤗

  Liked by 1 person

 17. Mukund Kane म्हणतो आहे:

  Vaah…. really excellent preparation…very delicious…so also recipe presentation is neat and perfect…so please keep it up… bravo

  Liked by 1 person

 18. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

  varshvadhdivasathi khup khup shubhechha tuzya sarvach pakkruti chavishta ruchakar navinyapurna .anushangane lihileli sarva mahiti punha punha vachanyajogi

  Liked by 1 person

 19. Maitreyee Keskar म्हणतो आहे:

  डॉक्टरसाहेबांची प्रतिक्रिया एकदम सही!😄👍हा विचार आमच्यासारख्यांच्या पण मनात येतो की–😄😄एवढे छान छान पदार्थ खाणारे किती lucky😄 मनःपूर्वक अभिनंदन 💐💐खमंग साठी खूप खूप शुभेच्छा👍

  Liked by 1 person

 20. Manjiri Joshi म्हणतो आहे:

  Really very good info.Always waiting for your new recipes.All the best.

  Like

 21. Hemant V Kulkarni म्हणतो आहे:

  सदर लेखातील पाककृतीकडे नंतर वळतो. तिथपर्यंत पोंचण्यापूर्वी जी प्रस्तावना आहे, ती वाचून बरंच कांही मनांत आले. बहुतेक पाकक्रुत्यांचे वर्णन ठराविक चौकटीत बंदिस्त असते व ती कितीही नाविन्यपूर्ण आणि चंदिष्ट असली तरी त्यांत मीठ जरा कमी पाडल्याप्रमाणे ती अळणी वाटते. तिला ताटात वाढण्यापूर्वी बाजूला साहित्यलेखनाची रांगोळी घातल्यास लज्जत येत नाही. पुढे-मागे या सर्व पाकक्रुत्यांचे एखादे पुस्तक निघाल्यास व त्यास पारितोषिक मिळाल्यास ते कोणत्या विभागासाठी द्यायचे, असा प्रश्न निर्माण होऊ शकेल. आता हेच पहा नां, येथे दिलेली कृती, “साहित्त्य” अश्या शीर्षकाने सुरु होते. मला प्रश्न पडला, हे ‘साहित्य’ म्हणजे प्रस्तावना संपवल्यानंतचा ‘लेखन’ प्रकार की नंतर सुरुवात केलेल्या पाककृत्यांची वजने,आकार, जिन्नसा इत्यादींची ‘मापे’? असं कुठे बघण्यात आल्याचे किमान माझ्या तरी निरीक्षणात नाही. मी पडलो एक पुरुष, परंतु खाण्याच्या बाबतीत खवैय्या असल्यामुळे चौकटीच्या बाहेर डोकावत असतो, असं म्हणा.

  गंमत म्हणजे, ‘बघता, बघता वर्ष सरले ……… ‘ ह्या शीर्षकाची एका मांसाहारी गृहिणीची कविता अलीकडेच एका भारतातील मित्राने विपत्राद्वारे मला पाठवलेली आठवली. नेमक्या ओळी आठवत नाहीत परंतु तिच्या घरी ठेवण्यात आलेला पार्टीचा दिवस वर्ष अखेरचा (३१ डिसेंबर) नेमका उपासाचा सोमवार निघाला. ‘खाणारे-पिणारे’ देखील सोमवार पाळतात, म्हणून सर्व खटपट फुकट. ‘साहित्य’ कुठे डोके वर काढेल ते सांगता येत नाही परंतु ते पंढरपूच्या जोश्यांकडे सरस्वतीचा हस्त म्हणून स्वयंपाकघरात उदबत्तीप्रमाणे दरवळत असावा -ह्याची प्रचिती प्रत्येक लेखात असते, हे मला अधोरेखित करायचे आहे. मला वाटतं की त्यांचा सुपुत्र मिहीर याचा सजावटीत कुठेतरी हात असावा -एक तर्क. त्याला तो शाळेत असताना पाहिलेला होता, इंजिनिअरचे डोके आणि पुढे अमेरिकेतून उच्य पदवी. तर्क खरा कि चुकीचा हा प्रश्न विसरून जाणे परंतु जोश्यांच्या या लेण्याचा उल्लेख करावासा वाटला.

  माझी आई सुगरण होती (कुणाची नसते?) व ती ऋषिपंचमीला ‘बडम’ (ऋषींची भाजी) करत असे -मोठ्या पातेलेभर. मला ती मुळीच आवडत नसे, अजूनही. पण तसे तिला सांगण्याची माझी छाती नाहती. मार मिळेल म्हणून नव्हे, तर तिला खूप वाईट वाटेल किंवा दिवसाचे मांगल्य जपण्यासाठी मी मुकाट्याने खात असे. शुभांगीबाईंनी कुणाला सूचना करायच्या आहेत कां अशी विचारणा केलेली आहे व त्या कल्पक देखील असल्यामुळे सांगतो, या भाजीला चविष्ट बनवण्यासाठी कांही उपाययोजना केल्यास मला माझी आई भेटल्याचा आनंद मिळू शकेल -नुसते काजूगर इत्यादी घालण्याचे सोपस्कार करून नव्हे.

  हेमंत वि कुळकर्णी, अमेरिका

  Liked by 1 person

 22. meghamilind म्हणतो आहे:

  अभिनंदन आणि खूप खूप कौतुक . काळाच्या पडद्याआड गेलेले पदार्थ लोकांना माहीत करून दिलेस म्हणून . तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐 विशेष दखल घ्यावीशी वाटते ती म्हणजे तुझ्या. पदार्थांची मांडणी ची आणि लिखाणाची , Keep it up Dear 👍🏻

  Liked by 1 person

 23. Rashmi Joshi म्हणतो आहे:

  सर्वात आधी, तुझ्या ब्लॉग ला 1 वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. वेगवेगळे पदार्थ आणि त्यांचे सुंदर विवेचन… एक पदार्थ ब्लॉग वर आला की पुढचा पदार्थ काय असेल ह्याची उत्सुकता असायची. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  Liked by 1 person

 24. snehaseeks म्हणतो आहे:

  Your recipes are like hidden treasures, long lost traditions or gems that a mother would gift her daughter. It has a flavor of art, craft and science (shastra). ‘KHAMANG’ is like a feast which I savour everytime I chance upon it. Thanks and best wishes to your journey ahead …

  Liked by 2 people

 25. अनूप बागाईतकर म्हणतो आहे:

  ब्लॉगच्या पहील्या “खमंग” वाढदिवसाबद्दल अभिनंदन!! आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा! 😊

  Liked by 1 person

 26. रागिणी राजन जोशी म्हणतो आहे:

  आपला पेंडपाला उत्कृष्ट आहे. आणि आपले सादरीकरण तर सुंंदरच .आता खारातल्या मिरच्या करणार आहे. खूप धन्यवाद.

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.