हुजुर के लिये खजूर !

१८५२ घोंगडे गल्ली, हा पत्ता गेले २५ वर्ष सतत लिहीत, सांगत व रहात आले. या गल्लीतील आमचा तीन मजली वाडा. घराची ओळख म्हणजे कै. बाबुराव जोशी यांचे घर. गणेश वामन जोशी ( बाबा ) हे केवढे महान व्यक्तिमत्व होते हे लग्न होऊन आल्यावर कळले. आजमितीला घराला १०० ते १२५ वर्ष पूर्ण झाली. या वास्तूने ५६ चा महापूर व त्या नंतरचे पाच ते सहा पुर पचवले. पण कधीही पडझड व नुकसान झाले नाही. दगडी जीने, खांडदांड, दगडी भिंती, केवढी जाड असावी भिंत रूंदीला ? आमचा डबल डोअर चा फ्रिज भिंतीतल्या कोनाड्यात अलगद विसावला होता. शहाबादी फरश्या, घरभर लाकडी खुंट्या, जागोजागी भिंतीतील कोनाडे, कमानी या सगळ्या सौंदर्याने हे घर नटलेलं होते.
सोय व सुविधांसाठी आम्ही बंगले बांधले व काही दिवसांपूर्वीच हे घर पूर्ण पाडण्यात आले. घर पडले पण आठवणींना मात्र उजाळा आला. त्या आधी घरातील जुने सामान हलवताना सासुबाई व डाॅक्टर प्रत्येक वस्तूंच्या आठवणीत रमले होते.
कोठीच्या खोलीत अगदी आतल्या कोनाड्यात मला हे गॅस व इलेकट्रीक या दोन्हीवर वापरतां येणारे केकचे पात्र सापडले.🤭 मी कधीच याचा वापर केला का नाही हा प्रश्न पडला ?
१०० वर्षा पुर्वीच घर, त्याच्या पाव पटीतील हे केक पात्र, आणी माझ्या साथीदाराची २९ वर्षांची साथ. हा त्रिवेणी संगम जुळून आला. सगळंच कसं जुन ते सोनं नाही का ?
डाॅक्टर अनिल माझा खरा मार्गदर्शकच आहे. मितभाषी, अभ्यासू , चांगला वाचक, चांगला लेखक सगळ्यात मह्त्वाचे चांगला माणूस. डाॅक्टर माझा editor पण आहे. मी १० वाक्य बोलत रहाते पण तो एका शब्दात माझी बोलती बंद करतो😀.कु ठल्या विषयाचा अभ्यास व अधिकार असल्या शिवाय मतप्रदर्शन करणार नाही.
डाॅक्टरचा जसा स्वभाव आहे त्याला साजेसा मी केक करायचे ठरवले व तयारीला लागले.

खजूराचा केक

साहित्य

 • एक मोठा बाऊल भरून खजूर (बीया काढून ) ३०० ग्रॅम जवळजवळ दोन कप भरून खजूर होतो.
 • 225 ml दूध म्हणजे १ कप भरून दूध
 • olive oil पाऊण कप १९० ml
 • १/२ कप दही
 • दोन कप भरून कणिक ( गव्हाचे पीठ )
 • एक चमचा बेकिंग पावडर
 • १/२ चमचा बेकिंग सोडा
 • चिमूट भर मिठ
 • लिंबाचे साल किसून किंवा संत्र्याचे साल किसलेले .
 • थोडे अक्रोड व खजूराचे तुकडे ( तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता )

कृती

 1. एका बाऊल मधे खजूर घ्या. त्यात दूध घालून चांगल एक ते दोन तास भिजवून ठेवा. खजूर भिजल्यावर मिक्सर मधून चांगली पेस्ट होईल इतपत फिरवा.
 2. बाऊल मधील खजूराच्या मिश्रणात olive oil व दही घाला. परत ब्लेन्डर च्या साह्याने एकजीव करा. आता त्यात सपीटाच्या चाळणीने ( बारीक चाळण ) कणीक, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ सर्व चाळून मीक्स करायचे. मिश्रणात लिंबाचे किंवा संत्र्याच्या सालीचा किस चांगला दोन चमचे स्वादासाठी घालायचा.
 3. जर मिश्रण धट्ट वाटले तर दूध घालून ते सारखे करायचे .मिश्रणात ड्रायफ्रूट चे तुकडे घाला व मिक्स करा.
 4. केकच्या भांड्याला चांगले साजूक तूप लावून घ्यायचे . किंवा बटर पेपर पसरवा. आता गॅस वर तवा ठेवून त्यावर वाळू ठेवली व गॅस मोठा करून वाळू चांगली तापली की पात्रात मिश्रण ओतून ते गॅसवर ठेवले. आता गॅस मंद आचेवर करा.४५ मिनिटे साधारण केक तयार होण्यास लागतात. छान फुलुन येतो.
 5. चांगला गार झाल्यावर पालथा करून प्लेट मधे काढायचा.
 6. मग करणार ना केक.

Date cake eggless
Ingredients:
1 300 gm seedless date
2 225 ml milk
3 190 ml olive oil
4 1/2 bowl curd
5 1 tsp baking powder
6 two bowls wheat flour
7 salt to taste
8 baking soda one tsp
9 grated dried peel of lemon/ orange
10 Dry fruits preferably walnut. You can use anything that you like.

Procedure
Add date to milk and allow it to soak for two hours . Make a paste like mixture of it using a Mixer.Add olive oil and curd to this mixture and blend it well .Add wheat flour ,baking powder,baking soda,salt to it through a fine sieve.Mix it well . Add two tsp of dried grated powder of lemon/ orange peel to enhance the flavor.Add a little milk to adjust the consistency of the batter. Grease the cake tin with home made ghee or line it with butter paper. Pour the batter into the cake tin and bake it for about 45 minutes or till the cake is ready. Garnishing with rose petals enhances the beauty and flavor.

6 Comments Add yours

 1. Atul jadhav म्हणतो आहे:

  मॅडम आपली ही रेसिपी अप्रतिम आहे. मॅडम खूप छान रेसिपी आहे. आपण लिहिलेल्या शब्दांमधून रेसिपीचे खरे रुप समजुन येते .
  की ही रेसिपी अतिशय सुंदर आणि सोपी आहे.
  ही रेसिपी मी आई ला सांगणार आहे करायला…🙏🙏🙏

  Liked by 1 person

 2. Sujata yadgiri म्हणतो आहे:

  upukt ,poshak &testy!

  Liked by 1 person

 3. श्रीराम दांडेकर म्हणतो आहे:

  सौ. शुभांगी अनिल जोशी
  खजुराचा केक हा अभिनव पदार्थ तू आज सादर केलास. त्याच्या जोडीने घोंगडे गल्लीतील तुमचे जुने घर व आठवणीही. हे वर्णन करत असतानाच डाॅ अनिल ह्याच्या व्यक्तिमत्वाचे समर्पक वर्णन केलेस.
  ” हुजूर के लिये खजूर” हे तुझ्या लेखाचे शिर्षक आहे.
  मितभाषी , संयमी , ज्ञानी असलेला तुझा अनिल ह्याला उद्देशून हे नसावं आणि असलंच तर तो तुला ‘ ‘जी हुजूर ‘ म्हणत असेल तर ठीक आहे.
  ” अनिल ” म्हणजे वारा. वारा हा चंचल असतो असे म्हणतात परंतू तुझा अनिल मात्र तसा नाही.
  वारा हा तसा खट्याळ असतो त्यामुळे फुलांचा सुगंध प्रेयसी पर्यंत पोहचवणं वगैरे फुटकळ कामं जाता जाता करत असतो. तुझा अनिल हे करत असेल अस वाटत तरी नाही कारण त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहिताना रोमॅन्टिक स्वभाव डोकावलेला नाही. कदाचित राहून गेले असेल किंवा नसेल तर मग पुढच्या वेळी अनिलवर स्वतंत्र लेख लिहिताना त्याचे शिर्षक ” आहे अनिल तरी ‘ असे ठेवायला हरकत नाही. असो दिवस पावसाचे आहेत म्हणजेच रोमॅन्टिक आहेत म्हणून कवी अनिल ह्यांची पावसावरची कविता….

  पावसा पावसा किती येशील? 
  आधीच ओलेत्या रातराणीला 
  किती भिजवशील?

  पावसा पावसा थांब ना थोडा 
  पिळून काढुन न्हालेले केस 
  बांधु दे एकदा सैल अंबाडा

  पावसा पावसा लप ढगात 
  सागफ़ुलांची कशिदा खडीची 
  घालु दे तंगशी चोळी अंगात

  पावसा पावसा ऊन पडु दे 
  वाळाया घातला हिरवा शालू 
  चापूनचोपून तिला नेसू दे

  पावसा पावसा पाहा ना जरा 
  जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने 
  वेणीत घालाया केला गजरा

  पावसा पावसा आडोश्यातुन 
  साजरा शृंगार रानराणीचा 
  दुरून न्याहाळ डोळे भरून …

  कवी – अनिल

  तुझ्या पाककृती प्रवासाला शुभेच्छा.

  श्रीराम शरद दांडेकर
  दि. 17 / 08 / 2019

  Liked by 1 person

 4. Atul म्हणतो आहे:

  लेखन उत्तम , डॉक्टरांच्या अर्धांगिनी ने करावं जस करावं तस . खजुराचे केक पौष्टीक 👍👍

  Liked by 1 person

  1. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

   Khupach chan healthy cake

   Like

 5. manjusha deshmukh म्हणतो आहे:

  kkhup chhan.

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.