आंब्याचे सांदण
जसे फणसाचे सांदण करतात त्याच प्रकारे आंब्याचे सांदण करता येते.
फणसाचे सांदण करायचे म्हणजे खूप सारी पूर्व तयारी लागते. दोन दिवस आधी तांदूळाची कणी किंवा तांदूळ धुवून पसरवून ठेवायचे. हडकले की त्याचा रवा काढून ठेवायचा. मग चांगला बरका फणस तो सुध्दा भरपूर गर असलेला बघून ठेवायचा. मोदक पात्र काढून ठेवणे, त्यावर लागणारे ताटली अथवा छोट्या वाट्या धुवून स्वच्छ ठेवायच्या. स्वच्छ धोतराची फडकी काढून ठेवायची. येवढा जामानीमा आधी लागतो. हे सर्व वर्णन आईच्या घरातील व तिच्या आईच्या घरातले . 🤭😌
करायच्या वेळेसची तयारी अजून निराळीच. फणस निट कापता आला पाहिजे. बरका फणस कापावा लागतच नाही नुसत्या हातानेच फोडून गरे काढता येतात. गरे काढून झाले कि ते चाळणीवर गाळून रस काढायचा. आठळया बाजूला काढून ठेवायच्या. मग रसात तांदूळाचा रवा, किंचीत मीठ, दूध, घालून सांदण वाफवायला ठेवायची. तोपर्यंत पार घरभर व कवाडी पर्यंत त्याचा घमघमाट सुटतो, कोणालाही सांगावे लागत नाही कि आज घरात सांदणांचा बेत आहे. पार कपड्यांना पण वास येतो. तो दिवस व पुढचा दिवस आपण फणसाच्या वासात नाहून निघतो.
पण हे गोड कौतुक आता मला मिळत नाही कारण आमच्या कडे बरका फणसच मिळत नाही.
मग दुसरा पर्याय आहेच. आंब्याचे सांदण 👍
साहित्य
- एक वाटी तांदुळाचा रवा ( इडली चा पण रवा चालतो )
- दोन वाटी आंब्याचा रस ( रस मिक्सर मधून फिरवून घ्या, गुठळी नको )
- दूध पाव वाटी
- साखर ( हे तुम्ही आंब्याच्या गोडी प्रमाणे व तुम्हाला किती गोड लागते या प्रमाणात घ्या )
- तूप एक चमचा
- किंचीत मीठ
- एक चमच्याला थोडी कमी बेंकिग पावडर
कृती
- रवा थोडा कोरडाच भाजून घ्यायचा. जर तुम्ही इडलीचा रवा वापरणार असाल तर तो मिक्सर मधे जरा बारीक करा व मगच भाजा.
- रवा, आंब्याचा रस, दूध, साखर, मीठ, तूप सगळे एकत्र करून भिजवून ठेवायचे. इडलीच्या पीठा प्रमाणे सरसरीत भिजवून एक ते दोन तास ठेवायचे. पाणी घालून सरसरीत केले तरी चालेल.
- रवा चांगला भिजला कि त्यात बेकिंग पावडर मिसळून इडली पात्राला तेल लावून हे पीठ त्यात शिजण्यास ठेवायचे.
- पंधरा मिनीटांनी गॅस बंद करून ठेवा. जरा गार झाल्यावर साच्यातून सांदण काढा.
महत्वाचे
- सांदण खाताना दूध लागते जर नारळाचे असेल तर पळेलच.
- तूप ही आवश्यक आहे.
- मोहरी फेसून केलेल आंब्याचे लोणचे हवेच.
- चलातर करून बघा सांदण सोपी आहेत करायला. नविन स्वीट डीश.

दहित्री
माझ्या वाचनात हा खूप वर्षांपूर्वींचा पदार्थ आला. उत्सुक ते पोटी मी हा पदार्थ करायचा ठरवला.
खरा पदार्थ मी सांगते आधी
साहित्य

- दोन वाटी भरून मैदा
- १ चमचा तूप मोहना साठी
- १ वाटी भरून आंबट दही
- गरम पाणी १/२ ते १ वाटी
- दोन मोठे पिकलेले आंबे
- चिली फ्लेक्स, मिरपुड
- तळण्यासाठी तेल किंवा तूप
कृती
- मैद्यात मोहन, आंबट दही, किंचीत मीठ व गरम पाणी घालून पिठांत गोळी न राहिल अशा रीतीने, चिकटपणावर येईल असे जाडसर थलथलीत पीठ भिजवावें व झाकून ठेवावे. रात्रभर भिजल्यावर ते छान आंबते.
- हापूस आंब्याची साल काढून घ्यायची व त्याच्या उभ्या फोडी करून घ्या. मी फोटोत दाखवले आहे.
- भिजवलेल्या पिठात मी सुक्या मिरचीचा चुरा ( चिली फ्लेक्स ), मिरपूड,मीठ घातले.
- या पिठात एक एक आंब्याची फोड बुडवून गरम तुपात किंवा तेलात चांगली तांबूस होईपर्यंत तळून घ्यायची.
करून बघा तिखट, गोड, कुरकुरीत आंब्याची दहित्री.फक्त अट एकच ही गरमच खायला चांगली लागते.
आपल्याला हा स्टार्टर म्हणून पण करता येईल.
मला हा पदार्थ करताना भोंडल्याच्या गाण्याची आठवण झाली
“त्यातलं उरल थोड पीठ त्याच केल ,,,,,,
नेवून वाढल पानात ……“
तसच थोडेफार म्हणतां येईल
कारण वरील पीठात मिरची व मिरपूड न घालता जिलेबी पण करून बघितली.
पाक केला थोडा व त्यात जिलेबी करून सोडली; उत्तम झाली.
आंब्याचा खरवस
आपण जसा चिकाचा खरवस करतो तसाच करायचा. पण करताना त्यात आंब्याचा रस ( गाळून) घालायचा व थोड्या फोडी सुध्दा. वेगळी चव व रंग याचा आस्वाद घ्या.

शुभांगी
तुझे पदार्थांचे नववनवे प्रयोग विलक्षण आहेत. संशोधन आणि प्रसिद्ध अनूभव याचा तू वस्तूपाठ घालून देते आहेस.
LikeLike
शुभांगी
तुझे पदार्थांचे नववनवे प्रयोग विलक्षण आहेत. संशोधन आणि प्रयोगसिद्ध अनूभव याचा तू वस्तूपाठ घालून देते आहेस.
LikeLike
Shubhangi,
Saglya recepies khupp hatke aani tarihi sadhya agadi karnyajogya aahet.
Always eagerly waiting for next addition🤗
LikeLike
Khupach chan navin receipies ahet karun pahin 🙏
LikeLiked by 1 person
छानच
LikeLike
मस्त , 40, 50 पूर्वी चे पौष्टिक, घरगुती , सहज करता येतील असे छान वाटले केले की सांगेन
LikeLike