सारासार विचार करा उठाउठी । सार धरा कंठी शुभांगीचे ….. !
सार या शब्दाला मराठी भाषेत एक वेगळा अर्थ व महत्व आहे. सुद्शास्त्रात तेच महत्व सार या पदार्थाला आहे. तो एक नुसता पदार्थ नसून ती एक संकल्पना आहे. पदार्थाचे मूळ तत्व किंवा सत्व म्हणजे सार.
आज आपण थोडा “सारासार ” विचार करूयात …
शिवरात्र झाली की थंडी हळूहळू पळ काढायला सुरवात करते. मग आपल्या जेवणात जहाल पदार्थ जावून मवाळ पदार्थ स्थान घ्यायला सुरवात करतात. आपल्या जेवणात उजव्या बाजूस पानात पातळ पदार्थ वाटीत बहुदा असतोच. याच दिवसात ऊस , कवठ, अननस, द्राक्ष ही फळे मुबलक प्रमाणात मार्केट मधे बघायला मिळतात.
या सर्व फळांचे सार करत असतांना त्याला लागणारे बरेचसे घटक हे एकसारखे आहेत. म्हणून आज एकदम कवठ, अननस, ऊसाचा रस व द्राक्षे या चार गोष्टींचे सार करण्याची कृती एकत्र पणे तुमच्या समोर मांडते आहे.
अननसाचे सार
साहित्य

- मधला पावका व वरील साल काढून अननसाच्या फोडी करून घ्या. मध्यम आकाराचा अननस असेल तर मोठा बाउल भरून फोडी होतात.
- मध्यम आकाराच्या नारळाचा चव
- लाल मिरच्या १ किंवा २
- तूप १ चमचा भरून
- १/२ चमचा जीरे
- १/२ वाटी काजू तुकडा.( भिजत घालायचे )
- साखर व मीठ चवीनुसार
कृती
- पॅन मधे तुपाची फोडणी करा त्यात फक्त जीरे व लाल मिरची घाला (१/२ चमचाच तूपाची फोडणी करा. उरलेल्या तूपाची फोडणी सार झाल्यावर करायची). फोडणीत अननसाचे तुकडे घालून एक वाफ आणायची.
- नारळ खोवून तो गरम पाण्यात घालून ठेवा म्हणजे नारळाचे दूध छान निघेल. मिक्सर मधे दूध काढा. हल्ली नारळाचे दूध आयते पॅकेट मधे मिळते. तेही वापरू शकतो. साधारण दोन वाट्या दूध लागते.
- मिक्सर मधे अननस व मिरची हे एकदमच वाटून घ्यायचे. नंतर काजू ची पेस्ट करून घ्या.
- अननसाचा रस, नारळाचे दूध गाळून घ्या. मग काजूची पेस्ट मीक्स करा. मीठ चवीनुसार घाला. साखर हे तुमच्या आवडीनुसार घाला. जर अननस गोड असेल तर साखर लागत नाही.
- उरलेल्या तुपाची फोडणी करायची जीरे व लाल मिरची ( सूकी) घालून . हिंग, हळद, कडीपता, कोथींबीर काहीही घालायचे नाही.
- तुमच्या आवडीनुसार सार पातळ किंवा व घट्ट करा.

उपासाला तर चालेलच पण हे welcome drink म्हणून सुध्दा प्यायला छान लागेल.
टीप
पटकन सार करायचे असेल तर अननसाचे टीन मधील रिंग वापरू शकता. नारळाचे दूध तर मिळतेच. काजूची पेस्ट नसेल तर काॅर्न फ्लाॅवर चालेल. एकच चमचा काॅर्न फ्लाॅवर पाण्यात मीक्स करून घालता येईल.
हे सार गार प्यायला मस्तच लागते. जर गरम हवे असेल तर आयत्या वेळेस जेवायच्या आधी कोमट करा.
कवठाचे सार
साहित्य

- पीकलेलं कवठ १
- नारळाचे दूध दोन वाट्या
- जीरे, मिरची
- तूप १ छोटा चमचा
- चवीनुसार मीठ व गूळ
कृती
- पीकलेल्या अर्ध्या कवठाचा गर काढून घ्यायचा व त्यात मिरची घालून बारीक वाटून मिक्सर मधून घ्यायची. चार वाट्या पाणी घालून गरात ते गाळून घ्यायचे .
- वरील मिश्रणात नारळाचे दूध, मीठ, गूळ घालून एकत्र करायचे.
- वरून तूप जीरे ची फोडणी द्या.

आंबट, गोड कवठाचे सार सुरेख लागते.
द्राक्षाचे सार
साहित्य

- पाव किलो द्राक्ष (साधारण मोठा बाउल भरून)
- नारळाचे दूध
- मिरची, जीरे, मीठ, तूप
कृती
- द्राक्ष मीठ घातलेल्या पाण्यात १५ ते २० मिनीट बुडवून ठेवा म्हणजे त्यातील फवारलेले औषधे पाण्यावर तरंगतील. मग ती स्वच्छ होतील.
- चार वाट्या पाण्यात द्राक्ष घालून चांगली उकळी आणा.
- मिक्सर मधे द्राक्ष व मिरची घालून बारीक करा .वाटताना दोन वाट्या पाणी घालून वाटा.
- नारळाचे दूध, द्राक्षाचा गर हे सगळे मीक्स करा. त्यात मीठ घाला.
- वरून तूप, जीरे, आवडत असल्यास कढीपत्ता ची फोडणी करा.
- साखर किंवा गूळ हे तुमच्या आवडीनुसार घालायची.

उसाच्या रसाचे सार
जरा हटके सार.
या सारात मी नारळाचे दूध घातले आहे. नाही घातले तरी चालते. पण नारळाच्या दूधामुळे दाट पणा येतो.
साहित्य

- दोन ग्लास भरून ऊसाचा रस
- दोन वाट्या नारळाचे दूध
- पाव वाटी चिंचेचा कोळ (चिंच पाण्यात भिजत ठेवून त्याचा कोळ काढतात. कोळ म्हणजे रस, किंवा गर)
- चार ते पाच शेवग्याचे तुकडे.
- तूप, जीर, मीठ
कृती
- पातेल्यात तूपाची जीरे घालून फोडणी करून घ्यायची. त्यात ऊसाचा रस घालायचा. उकळी आणायची. त्यात चिंचेचा कोळ घालायचा परत उकळी आणायची.
- शेवग्याच्या शेंगाचे तुकडे जरा शिजवून घ्यायचे.
- आता सारात शेंगा, मीठ घालायचे.
- पातेल उतरवून नारळाचे दूध घालायचे व एकजीव करून प्यायला घ्या.

तुम्हाला शेवगा आवडत नसेल तर घातले नाही तरी चालेल.
मग उपवासाच्या दिवशी ही हे आपण करू शकतो.
बघा लोकहो हे साराचे प्रकार करून बघा तुम्हास नक्की आवडतील.
यांत काही आपणांस सुचवायचे असेल तर जरूर सुचवा.
सारे सार रूचकर आणि चविष्ठ !!!!
Sent from Yahoo Mail on Android
LikeLiked by 1 person
खूपच छान लेख आहे.
उत्तम
LikeLike
तोंडाला पाणी सुटले!👌👌
LikeLike
खूपच सुंदर. मी करून बघेल सर्व
LikeLiked by 1 person
🙏Tuzyatil pakpratibhela maza namaskar .kiti vegveglya prakarache sar uttam ritya kele ahes. 👌
LikeLiked by 1 person