बहुगूणी नाचणी

नर्तकस्तुवरस्तिक्तो मधुरः तर्पणो लघुः ।
बल्यः शीतः पित्तहरस्त्रिदोषशमनो मतः ।।
रक्तदोषहरश्चैव मुनिभिः पूर्वमीरितः ।।

… निघण्टु रत्नाकर

नाचणी अथवा नागली चवीला मधुर व तुरट, कडवट असते. पचायला हलकी असते, तर्पण म्हणजे सर्व शरीरधातुंचे समाधान करणारी असते, ताकद वाढवते. तीन्ही दोषांचे शमन करणारी असली तरी विशेषत्वाने पित्ताचे शमन करते, रक्तातील दोष दुर करणारी असते. .

नाचणीची पाटवडी

नाचणीची लापशी, उपमा, खीर, आंबील, पापड, लाडू,घावन, इडली, किती तरी प्रकार आपण पाहिलेत व खाल्ले सुध्दा असतील. पण पाटवडी आधीच करून ठेवून आयत्या वेळेस पानात डावीकडील मेनु किंवा ताटलीत गोडा समवेत खमंग खायला चविष्ट व पौष्टिक मेनु.

साहित्य

 • एक वाटी नाचणी पीठ
 • एक वाटी (आंबट) ताक
 • चार ते पाच पाकळ्या लसूण, तीन हिरव्या मिरच्या
 • एक चमचा भरून तांदूळाची पीठी, कोथिंबीर , नारळ, चविनुसार मीठ, हिंग, मोहरी, तेल एक चमचा हळद.

कृती

 1. प्रथम ताकात नाचणीचे पीठ कालवून त्यात मीठ, तांदूळाची पीठी घालून भिजवायच. भजीच्या पीठा सारखे भिजवायचे.
 2. आता कढईत एक चमचा तेल घालून चरचरीत फोडणी करा. त्यातच लसूण व मिरचीचा ठेचा घाला. तेही खमंग परतून घ्या. आपण नाचणीचे तयार केलेले मिश्रण त्यात घालायचे व दणकून वाफ आणायची.
 3. ताटलीला पुसटसे तेल लावून ठेवा. गरम मिश्रण त्यावर घालून पसरवून ठेवा. त्यावर कोथिंबीर व खोबरे भूरभूरा व वडी कापून ठेवा. तयार झालीआपली नाचणीची पाटवडी.

नाचणीची खांडवी

साहित्य

 • एक वाटी भरून नाचणी पीठ
 • एक वाटी भरून बारीक अथवा किसलेला गूळ
 • एक वाटी भरून खोवलेला ओला नारळ
 • दोन चमचे सूंठ पूड, एक चमचा वेलची पूड
 • दोन चमचे तूप
 • दीड वाटी पाणी, चीमूट भर मीठ

कृती

 1. प्रथम कढईत तूप घ्या व त्यावर नाचणीचे पीठ ३ ते ४ मिनींट परतून घ्या. परतून झाले की पीठ काढूनठेवा.
 2. कढईत पाणी घालून चांगली उकळी आणा, उकळी आल्यावर त्यात गूळ, नारळ घाला. गूळ विरघळला की सूंठ व मीठ घाला. आता नाचणीचे पीठ घालायचे व चांगले ढवळून घ्यायचे. गुठळी होवू द्यायची नाही.
 3. कढईवर झाकण ठेवा व दणकून दोन वाफा आणायच्या. तोपर्यंत ताटाला तूपाचा हात लावून ठेवा.
 4. आता मिश्रण घट्ट झाले असेल त्याचा गोळा बनू शकतो. हे मिश्रण गरम असतानाच ताटात थापून घ्यायचे. वडी कापून ठेवा. वरून ओला नारळ व सुकामेवा भूरभूरा.
 5. वडी गार, झाली की खायला तयार.

मूल फसू शकतात कारण वडी अगदी चाॅकलेट सारखी दिसते. पण पौष्टिक भरपूर आहे चाॅकलेट पेक्षा.

हेल्थटीप्स

या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. नाचणी पौष्टिक आणि शक्तिदायक समजली जाते. यात ६ ते ११% प्रथिने, कॅल्शिअम, लोह, स्फुरद पुरेशा प्रमाणात असतात. मधुमेह, अशक्त व आजारी माणसांना नाचणीचा आहार उपयुक्त व गुणकारी मानला जातो. यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते तसेच मधूमेहाचे प्रमाण कमी होते.
जाता जाता अजून एक कृती सांगते.

नाचणी इडली

साहित्य

 • 3 वाटी नाचणी पीठ
 • 1 वाटी उडदाची डाळ
 • 1/2 वाटी तांदूळ रवा

कृती

 1. प्रथम नाचणी पीठ व तांदूळ रवा एकत्र भिजत घाला .दुसर्या भांड्यात उडदाची डाळ भिजत घाला. साधारण ६ ते ७तास भिजत घालायचे.
 2. भिजलेली डाळ मिक्सर मधे फिरवून घ्या व नाचणी, तांदूळ रवा यांत मिक्स करा. ३ ते ४ तासांनी पीठ आंबेल. नेहमी प्रमाणे पीठात मीठ घालून इडली करा. छान हलक्या होतात. चटणी बरोबर (चटणी पूड, नारळाची चटणी) खायला द्या.

5 Comments Add yours

 1. Janhavi Namjoshi म्हणतो आहे:

  Very much Healthy and Innovative..

  Thanks for the tips Chef.

  Like

 2. प्राजक्ता म्हणतो आहे:

  Amazing indeed,how beautifully you made this ! Thanks Master shed for sharing this

  Liked by 1 person

 3. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

  Nachaniche ladu kele jajat patvadi idli receipe mastach

  Like

 4. Hemant Kulkarni -USA म्हणतो आहे:

  Known as Finger Millet in English and India being largest producer of Nachni in the world, any novel good tastings recepe’s are always welcome in urban cities like Mumbai, Pune etc. In general, since not so pretty looking kitchen preps are frowned at by adults, here are some tips to try on babies for they are highly nutritious by nature and babies don’t complain.

  https://wholesomebabyfood.momtastic.com/milletbabyfoodrecipes.htm

  Liked by 1 person

 5. Sumedha Sanjay Deshpande म्हणतो आहे:

  व्वा!! आरोग्यदायी रेसिपी
  मस्तंच । इडली तर सुपर्ब

  Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.