कोकणी स्वयंपाकातील कल्पतरू कुळीथ

गुढघ हे गाव उंच डोंगरावर, हिरवे गार! झूळझूळ वाहणारे पाण्याचे झरे, पोफळीच्या बागा, आंबे, नारळ, जांभ, पेरू एक ना अनेक झाडे. त्यातून पायवाटेने चालत जाताना मजा यायची. मध्येच एखादे वानर टूण्णकन उडी मारून समोर येई. पाटाच्या गार पाण्यात पाय बुडवून बसायचा आनंद औरच. गावठी गुलाबांचे ताटवे च्या ताटवे ….त्यांचा सुगंध अजून मनातून जात नाही.
मधेच कोकीळेची साद, त्याला उत्तर म्हणून भारद्वाज चे कूककूक,
सगळा आसमंत निसर्गाच्या किमयेने भारलेला.
हा काळ म्हणजे सत्तर च्या दशकाचा, मी साधारण चौथीत होते.
हे माझ्या मामी चे गाव. तिच्या बाळंतपणासाठी मी तिच्या बरोबर हट्टाने गेले होते. तेव्हां वीज ही तिथे नव्हती. दिवस उनाडकीत जायचा पण रात्र झाली की पाचावर धारण! कंदिलाच्या उजेडात सर्व कामे चालत. मला मुद्दाम गडी व कामकरी बायका घाबरवत. वाघ येतो, रानडुक्कर येतात. मग मी आबांच्या बरोबर त्यांच्या मागोमाग फिरत असे, गोठ्यात धारा काढताना कंदिल धरून उभी राही,मनांत (रामराम) चालूअसे. पडवीत, माजघरात, ओटीवर, सगळीकडे.
मग मामीच्या आजीची हाक येई “बयो जेवावयास ये” भूक लागेलेलीच असे. मग केळीच्या पानावर गरम भात, त्यांवर तूप, आंबोशीचे लोणचे, पोह्याचा पापड आणि गरमागरम कुळीथाचे पिठले. अहाहा …..आजी च्या हातच्या पिठल्याची चव अजून जीभेवर तशीच रेंगाळते आहे. जेवण उरकली की अंगणात सुपारी सोलायला कामकरी बायका आलेल्या असत, त्यांच्या बरोबर माझी लुडबुड चालू असे. त्यातल्या काहीजणी सांगत सर्दी ला आम्ही कुळथाचे कढण देतो. मला प्रश्ण पडे चहा द्यायचा सोडून हे काय प्यायचे.
जे गुणधर्म कुळीथात आहेत ते त्या चहात कुठले असणार.
असो ते वयं हे गुणधर्म समजण्याचे नव्हतेच.
दोन दिवसांनंतर सकाळच्या जेवणात कुळथाची उसळ, त्याचेच कढण, पोळी. रात्री पोळी नसे, आठवड्यातून ३ वेळा तरी कुळथाची उसळ, कढण व रात्री पीठल हा मेनु ठरलेला असे. मला कंटाळा येई, हे लोक भाज्या का नाही करत?
आजी मग उलगडा करून सांगे, बयो आपण रहातो डोगंरावर, भाज्या मिळतात दाभोळला, रोज कोण आणुन देणार आणि उन्हाळयात भाज्या मिळत नाहीत. बर आपण शेतात कुळीथ लावले की बारा महिने कडधान्य घरात. परत आल्या गेलेल्यास पुरवठीस येत.पटकन करायला सोपे.
सर्दी, ताप, लघवी चा त्रास यांवर रामबाण उपाय म्हणजे कुळीथाचे पीठल. कुळथाच्या वेलींचे सर्व भाग उपयोगात येतात. कुळीथ भाजून गार झाले की भरडतात मग त्याची डाळ निघते, टरफलं जनावरांना घालायची. बर शेंगा काढून झाल्या की उरलेल्या काड्यांचा उपयोग म्हशीच्या आंबोणात होतो.
अजून एक आठवण दापोलीला मामा कडे कीर्तनाला गोविंद बुवा आफळे आले होते ( चारूदत्त आफळे यांचे वडील ) कीर्तन संपल्यावर घरी आले व मामी ला म्हणाले वहिनी पक्वान्न राहूदेत बाजूला मला आपले चूलीवरचे कुळीथाचे पीठले कर. भल्याभल्याना वेड लावते हे पीठले. लग्नाच्या जेवणावळी झाल्या कि श्रमपरिहाराला कुळथाचे पीठल, भात, पोह्याचे पापड, खाराची मिरची ठरलेला बेत. कोकणात मुलगी झाली की कुळथाच्या घुगर्या वाटायची पध्दत.
मामा कोळथर ला वर्ग घ्यायला जात असे. खूप श्रमदान व तालीम झाली की मुलांना तांब्या भरून पीठल प्यायला दिले जाई. ही अतिशक्योकती नाही, मी पाहिलं आहे. मुल काटक व चपळ सगळी.
किती गोडवे पीठल्याचे गायले तरी कमीच.
आपल्या नविन पिढीला याची महती कळण्यासाठी आपण जाणीव पुर्वक प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी एक मॅजीक कृती. कुळीथ फळे!!
आता थोडे कुळीथफळां विषयी…….कुळीथ फळांसाठी प्रथम कुळीथ पिठले करून घ्यावे लागेल त्याची कृती खालील प्रमाणे.

कुळथाचे पातळ पिठल

साहित्य

  • १ चमचा भरून कुळीथ पीठ
  • २ दोन चमचे तेल
  • ३ ते ४ मिरच्यांचे तुकडे
  • ५ लसूण पाकळ्या
  • २ कोकमाचे तुकडे
  • चविनुसार मीठ

कृती

  1. दोन वाटी पाण्यात कुळथाचे पीठ कालवून घ्या. लसूण ठेचून घ्या, मिरच्यांचे तुकडे करा.
  2. पातेलीत तेल घ्या, ते तापल्यावर मोहरी, हिंग, लसूण, मिरची, घालून चरचरीत फोडणी करायची. नंतर कालवलेले पीठ त्यात घाला. मीठ व आमसूल घाला.
  3. चांगली उकळी येऊ द्या पिठल्या. झकास पिठल तयार.

आता या पिठल्यात टाकायची फळे बघुयात (पास्ता)

फळे (पास्ता) मॅजीक हेच ते

साहित्य

  • १ वाटी तांदूळ पीठी
  • १ वाटी पाणी
  • १ चमचा तेल
  • चवीनुसार मीठ

कृती

  1. पातेलीत १ वाटी पाणी घ्या व त्याला उकळी येवू द्या. पाण्यात तेल व मीठ घालून चमच्याने ढवळून घ्या. आता तांदूळाची पीठी घालून चांगले हलवा. आता झाकण ठेवून दणकून वाफ आणायची.
  2. उकड काढून पराती मधे घ्या. चांगली मळून त्याचे गोळे करा .
  3. चकलीच्या सोर्याला जाड व चपटी शेवेची ताटली लावा, त्यात उंडा भरून छान शेव करून घ्या.
  4. ही शेव ताटलीला तेल लावून कुकर मधे वाफवून घ्या. कुकरची शीटी काढून ठेवायची. चला तर आपला पास्ता तयार.
  5. खोल डीशमधे कुळीथाचे पिठले घ्या, त्यात तांदुळाच्या पट्या सोडा. वरून लसूण तळून घाला. कोथिंबीर, सिमलामिरची , काॅर्न, दाणे, टाॅमेटो, वरून डेकोरेट करा. गरमागरम मॅजीक फळे मुलांना द्या.
  6. उकडीचा उंडा (गोळी) करून पीठावर (तांदूळाच्या) लाटून घ्या मग त्याच्या पट्या कापून वाफवल्या तरी चालतील.

असं म्हणतात की शिवाजीमहाराज जेव्हा आपल्या मावळ्यांसह कुठ्ल्याही मोहिमेवर जात, तेव्हा निघताना मोठा वाडगा भरून कुळथाचे कढ्ण/सूप पियूनच बाहेर पड्त असत. त्यांच्या बरोबर त्यांचे मावळे पण पीत. उच्चप्र्तीचं प्रोटीन, उत्क्रुष्ट स्टॅमिना देणारा हा पदार्थ आहे.
आपण आपल्या छोट्या मावळ्यांची अशीच काळजी घेऊयात.👍

कुळीथाच्या पाटवड्या

ही रेसिपी आजीची. हरभरा डाळ पचायला जड म्हणून ती कुळथाची करायची. बाळंतीणीला व आजारी माणसाला पण चालते.

साहित्य

  • १ वाटी कुळथाचे पीठ
  • १ चमचा तांदूळ पीठी
  • ७/८ लसूण ठेचून
  • मीठ, तीखट, कडीपत्ता, तेल

कृती

  1. पहिल्यांदा पीठातपाणी घालून सरसरीत भिजवा, त्यात मीठ, मिरची, (कुटून) घाला.
  2. कढईत तेल घाला, चरचरीत फोडणी करा, लसूण व कडीपत्ता चांगला खमंग परता.
  3. आता बनवलेले मिश्रण त्यात सोडा व चांगली दणकून वाफ आणा.
  4. ताटलीला तेल लावून ठेवा. मिश्रण त्यावर ओतून थापा. जरा गार झाले कि वडी पाडून घ्या. वरून खोबरे व कोथींबीर भूरभूरा.

कुळीथाला इंग्रजीत Horsegram असे म्हणतात. म्हणजे कुळीथाला “अश्वखाद्य “ म्हणावे का ?
प्रथीनांनी परीपूर्ण असे हे अन्न खाऊन गती व मती अश्वगती होत असेल तर ते योग्यच नाही का ?


14 Comments Add yours

    1. bhakti म्हणतो आहे:

      wonderful…..koknat jaun alyasarkhe watle….recipe wachtana tondala pani sutle ..

      Like

  1. Bhakti Natu म्हणतो आहे:

    खुप सुंदर व फोटो व इतर वर्णन वाचुन आत्ताच खावे असे वाटू लागले मस्त

    Like

  2. Sumedha Barve म्हणतो आहे:

    खूप सुंदर वर्णन, डोळ्यासमोर चित्र उभे राहिले
    आणि कोकणातला पास्ता कुळथाच्या पिठल्याबरोबर एकदम innovative आणि मस्त

    Like

  3. Sumedha Deshpande म्हणतो आहे:

    Khup masta, khamanga aani Chavishta recipies👌👌👌

    Like

  4. Mugdha Inamdar म्हणतो आहे:

    khup chan lihala ahes mami..

    Like

  5. Sunanda म्हणतो आहे:

    Looks yummy..Nice picture & presentation .

    Like

  6. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

    Kalpataru kulith patvadi uttamach.nakki karen.

    Like

  7. अनुराधा उकिडवे म्हणतो आहे:

    खूप छान receipe ,आमच्या कडे पण देवगड ला लहान पणापासून कुळीथाच पिठलं खाल्लय,
    माझं खूप खूप आवडतं,आंबे मोहोर भाताबरोबर अजूनच चविष्ट लागत.

    Like

  8. मानसी कानिटकर म्हणतो आहे:

    छान वर्णन कोकणी मेजवानी चे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

    Like

  9. सविता धारुरकर म्हणतो आहे:

    खूप सुंदर ,चविष्ट रेसिपी.कोकणात फिरुन आल्यासारखे वाटले.

    Like

  10. अमृता मोडक (स्मिता केळकर) म्हणतो आहे:

    खूपच सुंदर, खाद्यपदार्थांबरोबर तुझी लिहिण्याची शैली ही अतिशय छान आहे कोकणातलं आमचं गाव पण कोळथरे च आहे जुन्या रेसिपी ला नवीन टच द्यायची आयडिया मस्तच आणि स्पेशली तुझं क्रोकरी कलेक्शन खूपच युनिक आहे नवीन पास्ता नक्की ट्राय करीन

    Like

  11. Shruti Joshi म्हणतो आहे:

    Very informative. Wasn’t aware of so many benefits of kulith pith. Ur blog is very informative. Recipes are very healthy and easy to prepare. Health benefits which u give are also useful. Please continue to share such information and recipes. It’s very useful for our generation.

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.