खरवस लाडू…..🌹

गुलाबी थंडीत गुलाबाचे लाडू …..…🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खरवस हे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे आगळेवेगळे वैशिष्टय. मऊ, लुसलुशीत खरवसाच्या वड्या आबाल वृध्दांना आवडतात. खरवसाचा डामडौल पण शाही. केशर, वेलची, गूळ घालून करायचा, मग डोळे मिटून हळूवारपणे एकएक वडीचा स्वाद घ्यायचा. अहाहा त्याचा मुलायमपणा जीभेवर रेंगाळत ठेवावासा वाटतो. लहानपणी मागून आरोळी यायची “तुझे डोळे मिटले असले तरी आमचे डोळे चांगले उघडले आहेत. जास्त खाऊ नकोस उष्ण आहे, लगेच त्यांवर पाणी प्यायला घेवू नकोस…..”
या सर्व सूचना जाचक वाटायच्या. एवढ्या सुंदर पदार्थाला कशाला हव्यात अटी? 😱
अजूनही मोह आवरत नाही खाताना. पण डायट नावाच्या शब्दाने सर्वांना ग्रासलय ना. 😢
म्हशीचा, गाईचा, चीक प्रकृतीस उष्णच. पण प्रत्येकावर जालीम उपाय आपल्या कडे आहेच.
माझी मैत्रीण मंजिरी दातीर हिने खरवसाची एक आगळीवेगळी पाककृती मला सांगितली.

साहित्य

  • १ वाटी शिजवलेला खरवसाचा किस
  • १ वाटी खोवलेला ओला नारळ
  • १ वाटी देशी गुलाबाच्या पाकळ्या (गुलाबी रंगांचा जो गुलकंदाला वापरतात)
  • १ वाटी साखर
  • २ चमचा गुलकंद

कृती

  1. जर चीक पहिल्या दिवसाला असेल तर चिकात दूध घाला. (१ वाटी चीक असेल तर १ वाटी दूध घाला) गूळ किंवा साखर न घालताच शिजवायचा. कुकर मधे भांडे ठेवून शिजवा. पण कुकरला शीट्टी लावायची नाही.
  2. तयार झालेला खरवस गार झाला की किसणीने किसून घ्या.
  3. आता खरवस, खोबरे, साखर, गुलकंद व गुलाबाच्या पाकळ्या सर्व एकत्र करून पॅन मधे शिजत ठेवा.
  4. ५/७ मिनीटांत मिश्रण आळायला लागेल. गॅस बंद करून पॅन खाली घ्या.
  5. आता जरा गरम आहेत तोवर लाडू वळा.

हे मिश्रण शिजताना गुलाबाचा स्वर्गीय परिमळ सर्वत्र दरवळतो.

7 Comments Add yours

  1. Aditi Marathe म्हणतो आहे:

    V v innovative recipe .Superb.

    Like

  2. Sanjivani म्हणतो आहे:

    Wow ! Photo baghatach rahavasa vatatoy ! Ladoo mastach lagat asanar !

    Like

  3. jayashri jagtap म्हणतो आहे:

    Mastch

    Like

  4. प्रमोद घांगुर्डे म्हणतो आहे:

    फार सुंदर.

    Like

  5. मीनाक्षी देशपांडे म्हणतो आहे:

    खरवस वडी या पद्धतीनं 15 दिवस टिकते म्हणून करत असू , पण लाडू जवाब नाही , सकळ सकाळी अशी डोळ्याला सुखावणारी तोंडाला पाणी आणायला लावणारी ….. आत्ता कुठं खरवस मिळतोय वाट पहात आहे
    शुभांगी मागच्या पाकक्रिया मी नाही ग पाहिलं बाजरी इ

    Like

  6. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

    Deshi gulabacha khupach chan swad yet asnar.receipe mastach.👌

    Like

  7. Hemant KulkarNi, USA म्हणतो आहे:

    खरवस ‘लाडू’ आणि ‘वडी’ -एका दगडात दोन पक्षी, मुळात गाई-म्हशीचा चीक मिळवणे शहरी मंडळींना जरा कठीणच असावे परंतु हल्लीच्या काळात मार्ग जरूर असावेत. कृतीमध्ये ‘साजूक तूप’ (भरपूर) व म्हणून टिकावू पदार्थ नसल्यामुळे पथ्यावर पडत असणार -ही एक जमेची बाजू आहे. कांही हौशी बायका गुलकंद घरीच बनवतात म्हणे -तो खास गुलाबांच्या पाकळ्यांचा असावा -हा तर्क. नुसत्या कल्पनेनेच लाळ जमण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्या कल्पक मैत्रीणीस अनेक धन्यवाद. ……. मात्र अमेरिकेत राहून कसे काय जमवून आणायचे, ह्या बुचकळ्यात . -‘पंढरीच्या विठ्ठला’, मार्ग सुचव.रे बाबा.

    हेमंत कुळकर्णी

    अमेरिका

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.