चला थंडी घालवा।
थंडीचे दिवस मग काय खाण्याची चंगळ. यांत सुध्दा आपण आरोग्याला जे पुरक आहार आहेत ते करण्याचा प्रयत्न करत असतो. या हंगामात संत्री, भाज्या, दूधदूभते मुबलक प्रमाणात असत. आल्याच्या वड्या याचं दिवसात आपण करतो कारण सर्दीला, पीत्ताला, खोकल्याला त्या उपयुक्त असतात.
मी आज जरा वेगळी आल्याची पाककृती देणार आहे.
आल्याचा हलवा
साहित्य
- १ वाटी भरून आल्याचा कीस
- २ वाट्या कणिक
- १ वाटी तूप
- १ वाटी बारीक केलेला गूळ
- ३/४ वाटी बारीक केलेला खजूर (किसायचा नाही फक्त बारीक तुकडे करायचे)
- २ चमचे भरून सूंठ
- १ चमचा वेलची पूड
- १ वाटीत मावेल येवढा सूका मेवा ( तुमच्या इच्छे नुसार बदाम, काजू, बेदाणे, पिस्ता)
कृती
- पॅन मधे २ चमचे तूप घ्या व आल्याचा किस त्यावर गुलबट परतून घ्यायचा. मग परत ३ ते ४ चमचे तूप घाला व कणीक व आलं बरोबरीनेच खमंग भाजायचे. कणकेचा रंग बदलला पाहिजे व घरभर खमंग वास दरवळला पाहिजे.
- २ एका पातेलीत गूळ व पाणी घालून पातेलं गॅसवर ठेवा. साधारण ४ ते ५ वाट्या पाणी गुळात घाला. गूळ विरघळून एक कढ आणा.
- भाजलेल्या कणकेत खजूर घालून उरलेले तूप सोडा व परत सगळे मिश्रण परता.
- आता गुळाचे पाणी मिश्रणावर घालायचे व एकसारखे चमच्याने फिरवत राहायचे. म्हणजे गुठळी होणारं नाही.
- पाचच मिनीटांत हलवा आळून येईल मग लगेचच सूंठ पावडर व वेलची पूड घालायची.
- एकच वाफ आणायची हलव्याला.
चला गरमागरम हलवा डीश मधे खायला घ्या.
मला हलवा करताना खूप धाकधूक वाटत होती कुठे हलवा तीखट तर लागणार नाहीना.
पण अस काही झाल नाही उलट मजा आली एक वेगळी चव खायला मिळाली .
जरूर करून बघा.

संत्रा बर्फी
सध्या बाजारात रसरशीत संत्री सर्वत्र आहेत. त्याचा रंग, वास, स्वाद आपल्याला मोहित करतो. मग बर्फी करून बघूयात.
साहित्य

- ४ संत्री (बाहेरील साल व बिया काढून गर घ्यायचा)
- १ १/२ वाटी साखर (दीड वाटी)
- १ वाटी खवा
कृती
- १ वाटी संत्रा गर व १ १/२ ( दीड वाटी ) साखर मिक्सर मधून फिरवून घ्या. एका संत्रा चे साल म्हणजे पूर्ण संत्र्याचे साल नाही, तर फक्त एक पाकळी (त्याचा आतला पांढरा भाग खरडून घ्या). हे साल थोडी साखर घालून मिक्सरमंधून फिरवून घ्या. आता सर्व एकत्र करा. यामुळे वडीला सुंदर स्वाद येतो.
- नंतर पॅन गॅसवर ठेवून त्यात वरील मिश्रण व १ वाटी खवा सर्व एकत्र करून आटवण ठेवा.
- मिश्रण सारखे हलवत रहा. जोपर्यंत कडा सुटत नाही तोपर्यंत मिश्रण हलवत रहा. हलवताना मिश्रण हाताला घट्ट वाटायला लागले की गॅस बंद करा.
- आता मिश्रणात १ ते २ चमचे मिल्क पावडर घाला व सतत घोटत रहा. जर मिल्क पावडर नसेल तर पिठी साखर वापरली तरी चालेल.
- तोपर्यंत ताटाला तूप लावून ठेवा. आता मिश्रण आळल्यावर ताटात पसरवा.
- मिश्रण थोडे ओलसर असतानाच वडी कापून घ्या.
- या वड्या जरा मऊसरच खायला चांगल्या लागतात.फार आटवून खडखडीत करायच्या नाहीत.
सूचना
संत्र गोड असेल तर हे प्रमाण ( साखरेचे) योग्य आहे
जर आंबट असेल तर साखर त्या प्रमाणात वाढवा.

आल्याचा हलवा 😍
LikeLike
khupach sundar….barfi recipe wachunach khavishi wattey ……photot tar danger yummy distayt
LikeLike
mast
LikeLike
photography Kharach chaan. dishes jara hatke. Avdle. 👌👌
LikeLike
photography Kharach chaan. dishes jara hatke. Avdle. 👌👌👌
LikeLike
Santra barfi chanach👌👌
LikeLike
एखादी पाककृती ‘औषधी’ म्हणून संबोधली जाते, तेव्हां ती प्रत्यक्षात बर्फी असूनदेखील तीवर यथेच्य ताव मारणे पुरुषांना सोपे पडते. धन्यवाद!
हेमंत कुळकर्णी, अमेरिका
LikeLiked by 1 person
Sundar
LikeLike
Mast
LikeLike
Mast vadi karte
LikeLike