आईबाबा कोकणातले त्यामुळे न्याहरी ला कोकणी पदार्थ हमखास बनवले जातात. तांदूळ हा मुख्य अन्न घटक त्यामुळे त्याच्या अवतीभोवतीचे सर्व पदार्थ केले जातात. पानगी, पातोळे, धीरडे, आंबोळी, सांदण, ई. आता थंडीची चाहूल लागली आहे म्हणून पटकन व कमी वेळात, थोड्याश्या साहित्यातला पदार्थ करूयात.
साहित्य

- ४ वाटी जरा आंबटसर ताक
- १ वाटी तांदूळाची पिठी
- ३ हिरव्या मिरच्या
- ७/८ कढीपत्ता ची पाने
- ८/९ लसूण पाकळी
- ४ काड्या कोथिंबीर
- चविनुसार मीठ, १ चमचा साखर, २ चमचे तेल , व फोडणीचे साहित्य
कृती
- कढईत तेल घालून चरचरीत फोडणी करायची (मोहरी, जिरे, हिंग, हळद). आता लसूण ठेचून फोडणीत चांगला गुलबट करायचा, मग मिरच्यांचे तुकडे घाला शेवटी कढीपत्ता घाला व चागंले परतून घ्या.
- फोडणीत ताक, मीठ व साखर घालून उकळी आणा. सारखे ढवळत रहा जरा ताक फुटते.
- उकळी आल्यावर पिठी घालून चांगले हलवा कारण गुठळी व्हायची शक्यता असते. जरा अजून सोपं म्हणजे पिठी थोड्या पाण्यात कालवून टाकली तरी चालते म्हणजे गुठळी अजिबात होत नाही.
- महत्त्वाचे म्हणजे उकडीला दणकून वाफ आणा. उकड तुकतुकीत दिसायला लागली की गॅस बंद करा.
- फोडणीतील खरपूस लसूण थोडा बाजूला काढून ठेवा. उकडीवर पेरून खायला छान लागतो.
- उकडीवर तेल किंवा तूप घालून तुम्ही खावू शकता. 👍

पुढचा ब्लाॅग
आवळी आवळी, सदा सावळी
राधा कृष्ण तुझ्या जवळी
नांव घेतां आवळीचं
पाप जाईल जन्माच
????????
Chavishta – ani pudhchya blog cha koda pan masta!
LikeLiked by 1 person
Mast…
LikeLike
मस्त, फोटो बघून तोंडाला पाणी सुटले😊😊👍
LikeLike
मस्त…
LikeLike
Mast
LikeLike
Aavdicha padartha
All time favourite
Masta pic. Lihilay pan chan
LikeLike
Takatali ukad khupach chan.
LikeLike
‘ताकातील उकड’ या नांवावरून तो पदार्थ डोळ्यापुढे येत नाही परंतु त्याच्या फोटोवरून मात्र ही उकड (अंड्याचे) चमचमीत ऑम्लेट असल्याप्रमाणे भासली. कालच चण्याच्या डाळीचे घट्ट ‘पिठले’ झाले होते, त्याची देखील आठवण झाली. श्री. बर्वे म्हणतात त्याप्रमाणे तोंडाला खरोखरच पाणी सुटले आणि ‘फर्माईश सोडली’ -आज हाच पदार्थ बनवायला हवा. …. आयत्या दह्यात (सावर क्रीम) आंबटपणासाठी थोडासा लिंबाचा रस घातला व इतर सर्व जिन्नस देखील तयार ठेवण्याची जबाबदारी मी उचलली आणि हा नाविन्यपूर्ण चविष्ठ पदार्थ त्याच्या घमघमाटाने स्वयंपाकघरात हजेरी लावून गेला -तळलेल्या लसणीच्या चवदार पाकळ्यांसह. …. क्या बात है शुभांगी वाहिनी: पुढील पदार्थ त्याच्या कोंकणी काव्यमय प्रस्तावनेसह उत्सुकतेची परिसीमा गांठत आहे. पंक्ती वाचून ‘हंसले मनी चांदणे’: “काय बरे असावी ही ‘सांवळी आवळी”?
हेमंत कुळकर्णी, अमेरिका
LikeLiked by 1 person
Apratim recepies….ukad karavishi vatali vachun,lasanichya pakalya mast
LikeLike