जागतिकीकरण हा आपल्या सर्वांच्या खिशाला भिडणारा विषय. हल्ली तो आपल्या पोटालाही भिडू लागला आहे. पूर्वी खेड्यापाड्यातून फारशी फळफळावळ उपलब्ध नसायची. संत्र, मोसंबे, चिक्कू व गेला बाजार सफरचंद. आता मात्र या फळांसोबत किवी, पीच, आलूबुखार, नाशपाती, आदि विदेशी फळेही सरसकट दिसू लागली आहेत.
बाकी फळांचे पदार्थ आपण करू शकतो पण किवी चे काय करायचे हा प्रश्न पडतो. बरं हे फळ चवीला आंबटगोड ………याची चव सूध्दा फारशी पटकन आवडेल अशी नाही. आरोग्य दृष्ट्या मात्र हे फळ vitamin c,k,e यांनी परीपूर्ण आहे. तसेच यांत तंतुमय पदार्थ ही आहेत.
आज कार्तिकी एकादशी असल्याने उपवासाचेही डोक्यात होते. विचार चक्र सूरू झाले त्यातून निर्माण झालेली पाककृती.
यांत राजगिरा, डींक, सुकामेवा यांचा वापर केला आहे. त्यामुळे हे एक आरोग्यदायी डेझर्ट होवू शकते.
साहित्य
- ३ किवी ची फळे
- ४ राजगिरा लाडू
- ३ चमचे साखर
- ४ काजू
- ३ बदाम
- ३ पिस्ता
- २ अंजिर ( सुके)
- ३ जर्दाळू
- १० दाणे डिंकाचे
- २ चमचे तूप
कृती
- प्रथम तिन्ही किवीची साले काढून घ्या. मग त्याचे बारीक तुकडे करून घ्या. किवीची चव बघा. जर चवीला फार आंबट असेल तर साखर जास्त लागेल. आता मिक्सर मधून किवी बारीक करून घ्या.
- पातेलीत (साधारण एका किवीला १ चमचा साखर) ३ चमचे साखर घाला व साखर बुडेल इतकेच पाणी घाला . आता चांगला कढ द्या ( म्हणजे पाण्याचा अंश कमी होवून उकळी येवू द्यायची). किवी चे बारीक मिश्रण त्या पाकात घालून दोन उकळ्या द्या. गॅस बंद करा.
- राजगिरा (४) लाडू फोडून घ्या. कढईत 1 चमचा तूप घाला व त्यावर लाडू घालून चांगले कुरकुरीत होईपर्यंत परता.
- १/२ चमचा तुपात डिंक तळून घ्या, त्यांच तूपात काजू व बाकी सूका मेवा तळून घ्या (हे तुमच्या इच्छेनुसार तळा).
- डिंक कॅरॅमलाईझ करा. (२ चमचे साखर कढईत घ्या ती गरम करा वितळले की लगेच डिंक घाला, जरा वेळ तसाच परता. छानच कुरकुरीत होत.)
- आता प्लेटींग करताना प्रथम किवी चा साॅस प्लेट मधे पसरवा. त्यावर राजगिरा घाला, त्यावर परत दोन चमचे साॅस मग कॅरमल केलेला डिंक घाला. मग सुकामेवा पसरवा.
- अश्या प्रकारे आंबटगोड व पौष्टिक पदार्थ तयार 👍.
करून बघा एक नविन उपासाचा डेझर्ट .
अर्थात उपवास नसताना खाल्ले तरी फारसे बिघडणार नाही .😀
👌👌 superbe and innovative !
LikeLike
😋
LikeLike
Invention and Decoration 🌹 too goood.
LikeLike
Superb!!!!!
Really innovative and healthy
LikeLike
In our household my wife had her fasting for the day with unsalted peanuts and boiled potatoes with salt and chili powder sprinkled to taste. Not even Sabudana Khichadi, sweet potato prep (Ratale Kaap) or any kind of fruit. We’ve plenty of ‘Quinoa’ (Rajgira like but actually known as Amarnath in India) in our pantry but (she) never though of its use for such a fine recipe’. A tempting desert that even men can prepare for his ‘home-minister’s’ delight. By the way, it’s true that Quinoa seeds, (राजगिरा) as a rich source of protein contains every amino acid, and is particularly rich in lysine, which promotes healthy tissue growth throughout the body. Quinoa is also a good source of iron, magnesium, vitamin E, potassium, and fiber. I’m impressed except for other counter productive ‘goodies’ that men eat on almost every other day!
Finally, in India Kiwis are grown in foothills of Himalayas as cultivated vanes (Velis like Dudhi BhopLa) & their blossoming flowers (and later) bunched up fruits are a treat to the eyes!
LikeLiked by 1 person
Delicious&healthy
LikeLike