दिवाळी फराळाचे प्रकार करून दमलात ?
मग झटपट हे पक्वान्न करून बघा 👍
जरा वेगळ्या प्रकारची खीर करून बघूयात. हि खीर मी पहिल्यांदा माझ्या मैत्रीणकडे खाल्ली. स्वाती कडे वरदलक्ष्मी च्या हळदीकुंकूवाला तिने आम्हाला प्रसाद म्हणून गार, खमंग, चविष्ट अशी खीर दिली. तेव्हांपासून ती आमच्या घरातील पक्वान्नांचा एक महत्वाचा घटक बनली.
साहित्य
- १/२ वाटी बारीक रवा
- १/२ वाटी मैदा
- १ वाटी तूप
- १/२ लिटर दूध
- १/४ वाटी साखर
- वेलची पूड, सुका मेवा, केशर
कृती
- रवा, मैदा दोन चमचे तुपाच कडकडीत मोहन घालून भिजवा. भिजवायला दूध वापरा. फार घट्ट भिजवायचा नाही. भिजवून १/२ तास ठेवून द्या.
- दूध गरम करा. साय काढू नका. १/४ वाटी साखर घालून एक कढ आणा.
- आता पुरीचे पीठ छान भिजले असेल. त्याची पातळ पूरी लाटायची व त्यावर टोचे मारायचे. कारण ही पूरी आपल्याला फूगू द्यायची नाही. सगळ्या पूय्रा लाटून घ्या.
- आता कढईत तूप गरम करा. एक एक पूरी गुलाबीसर तळून घ्या.
- सगळ्या पूरी कोमट असतानांच चूरून घ्या.
- पूरीचा चूरा दूधात घालायचा. त्यात केशर, सुका मेवा पण घाला. वरून वेलचीपूड घाला.
- आता ही खीर दाट व्हावला लागते कारण पूरी दूध शोषून घेते. ही खीर फ्रिज मधे ठेवा. मस्त गार झाली की खायला तयार.😋
टीप
हि खीर आदल्या दिवशी करून ठेवता येते. पार्टी ला करायला पण सोपी व नविन प्रकार.
आत्ता ही रेसिपी शेअर करायचे कारण दिवाळी जवळ आली आहे आपण करंज्या, चिरोटे, करतोच त्यातील पीठ उरतच. त्या पीठाची पूरी करून ठेवा, व आयत्या वेळेस खीर करायला सोपी. बरोबर ना …
करून बघा व अभिप्राय कळवा 🙏
आप्पे पायस म्हणजेच पुरीची खीर का?
Interesting पक्वान्न!
LikeLike
मी ही ही खीर पहिल्यांदा माझी मौत्रीण गिरीजाकडे खाल्ली होती.पौष्टीक आणि चविष्ट
LikeLike
वाह! तुझ्यामुळे आम्हांला नवनवीन पदार्थांची ओळख होते आहे. पुढे या सर्व रेसिपींचे एक छान पुस्तक तयार होऊ शकेल.
LikeLike
Recipes given by you are different (unique) when compared with recipes shown on TV channels / you tube, etc.
Now waiting for your recipe book. All the best.
LikeLike
छानच g नक्की प्रयोग करून बघते
LikeLike
कर्नाटक मध्ये ही खीर खास पक्वान्न म्हणून करतात. खूप छान लागते.
LikeLike
खूप छान
LikeLike
आमच्या घरी सदर कृती करण्यापूर्वी जे मनांत आले, ते कळवत आहे -एक ‘आळशी पुरुष’ ह्या दृष्टिकोनातून. याचा आपल्या कृतीशी चवीच्या बाबतीत मुळीच संबंध नाही. ती नक्कीच जिभेचे चोचले पुरवणारी असणार -याबद्दल खात्री आहे. …. हापूस आंब्याच्या दोन-तीन महिन्यात, क्रिकेटच्या मॅचेस टेलिव्हिजनवर बघत असतांना आंतील मालकीणबाई आम्हां मित्रांपुढे आंब्याचा रस आणि गरमागरम पुऱ्या पुढ्यात आणून ठेवतात -‘घरोघरी मातीच्या चुली’ म्हणीप्रमाणे (जिचा खरे पाहातां केवळ स्त्रियांशीस संबंध असतो). त्यामुळे आमची पंचाईत अशी की हे खाण्यासाठी हाताचा वापर करणे अनिवार्य बनते. मग ते खरकटे हात धुण्यासाठी मॅच पाहणे सोडून उठावे लागते. त्याऐवजी आपल्या कृतीत सांगितल्याप्रमाणे खुसखुशीत तळलेल्या पुऱ्यांचा चुरा करून तो आंबरसात एकजीव करून सोबत एखादा चमचा दिल्यास हात धुणाचे श्रम घेणे उरणार नाहीत. विशेषतः तुमच्या कृतीतील पुऱ्या वापरल्यास ‘जीभाई’ अधिक प्रसन्न होईल.
वरील विनोद न ‘रुचल्यास’ मनापासून क्षमस्व परंतु माझे विचार नक्कीच एका नव्या कल्पनेचा जन्म घेत असालच कोणताही पुरुष मान्य करेल!
हेमंत कुळकर्णी, अमेरिका
LikeLike