Dill rice ( शेपू भात )

शेपू ला English मधे Dill म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव Anethum graveolens आहे. याला बळंतसोप ही म्हणतात. शेपू च्या उग्र वासामुळे तिचे चाहते कमीच आहेत. त्यामुळे या भाजीला आपण वाळीत टाकल्यासारखेच आहे. या भाजीत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्नचा भरपूर साठा आहे. परदेशात शेपू चे सलाड व सूप करतात, आपल्याकडे आपण भाजी, पूरी, पराठे करतो. या भाजीत कॅलरिज कमी पण पोषणद्रव्य जास्त प्रमाणात आहेत.
आज मी तुम्हाला जरा शेपूचा वेगळा प्रकार करून दाखवणार आहे.

साहित्य

IMG_3364

  • १ पेंडी (जूडी) शेपू
  • २ वाट्या बासमती तांदूळ
  • २ गड्डे लसूण सोलून
  • ३/४ मिरची ठेचून
  • १/४ वाटी तुकडा काजू गर
  • २ चमचे तूप
  • २ चमचे तेल
  • चविनुसार मीठ
  • दोन लहान लिंबु

कृती

  1. तांदूळ धूवून निथळत ठेवा. पाणी निथळले की दोन चमचे तुपावर तांदूळ परतवून घ्या. दोन वाटी गरम पाणी व चविनुसार मीठ घालून भात कुकर मधे दोन शिट्ट्या देवून शिजवून घ्यायचा.
  2. शेपूची जूडी निवडून घ्या. कोवळी पानेच घ्या. ती बारीक चिरून धूवून, पसरवून ठेवा. पाण्याचा अंश रहायला नको. दोन लहान लिंबांचा रस काढून ठेवा.
  3. लसूण सोलून ठेचून घ्या. फार बारीक नको. मिरच्या पण ठेचून घ्या.
  4. आता कुकर मधला भात पराती मधे हलक्या हाताने मोकळा करून ठेवा. त्यावर लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  5. कढईत तेल गरम करून पहिल्यांदा काजू तळून वेगळे ठेवा. त्याच तेलात लसूण तळून घ्या. आता हिरवी मिरचीचा ठेचा व शेपू घाला व किंचीत मीठ पेरून गॅस बंद करा.
  6. पराती मधील भात कढई मधील भाजीवर घालून एकदाच अलगद हलवून मिक्स करा, काजू पण लगेच घाला, मग चांगली दणकून वाफ आणा.

तयार झाला मस्त Dill rice
ही पाककृती मला माझ्या बहिणीने सौ संध्या ताईने दिली.

10 Comments Add yours

  1. Yeshwant Marathe म्हणतो आहे:

    मला खरं म्हणजे शेपू अजिबात आवडत नाही. पण तुझी पाककृती वाचून कधीतरी खाऊन बघायला हरकत नाही असं वाटलं. 😁

    Like

  2. manasee1 म्हणतो आहे:

    शेपूला न्याय देणारी रेसिपी 🙂

    Like

  3. Janhavi Namjoshi म्हणतो आहे:

    Mast Kha ani Swastha Raha….

    Like

  4. Sumedha Sanjay Deshpande म्हणतो आहे:

    उद्याच करून पाहीन
    मस्तं रेसिपी👍

    Like

  5. विद्या हजारे म्हणतो आहे:

    आमच्याकडे शेपू सगळ्यांना आवडते त्यामुळे नक्की करून बघेन.

    Like

  6. Hemant Kulkarni And Friends -USA म्हणतो आहे:

    सदर पाककृती चांगलीच आहे -त्यात तळलेले काजूगर असल्यामुळे अधिक रुचकर परंतु ती राजेशाही थाटाची करण्यासाठी त्यात थोडेसे लिंबाच्या रसात घोटलेले केशर घालून ‘रंगतदार’पणा आणून जिभेचे चोचले पुरवल्यास पोटोबा अधिक सुखावतील -असे मनांत आले. शेपूचा वापर इराण मध्ये अनेक शतके करण्यात आलेला असून संबंधी पाककृत्या अश्या रुचकर भातासोबत तळलेले मासे. चिकन अथवा मटण सोबतीस ठेवून संपूर्ण जेवण बनते. मात्र ज्यांना स्वयंपाक घरात प्रवेश करण्याची भीती वाटते -असे माझ्यासारखे पुरुष आयते मिळणारे घट्ट दह्यातील ‘डिल डीप’ वापरून त्यात बटाट्याचे वेफर्स यथेच्य बुडवून ताव मारत असतात (सोबतीस इतर मित्रमंडळी आणि टेलिव्हिजनवर क्रिकेटची मॅच बघत).

    Liked by 1 person

  7. मला शेपु आवडतो नक्की ट्राय करेन.मस्तच

    Like

  8. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

    Dill green rice rang pan chan distoy great

    Like

  9. विकास रामकृष्ण म्हणतो आहे:

    सौ अर्चना जोशींकडून नेहमी शेपू भात मला पाठविला जातो.अत्यंत चवदार आणी लज्जत वाढविणारी अन्नभेट होते.आपल्या ह्या शेपू भात रेसिपीमुळे तो कसा बनवायचा ही कृती माहित झाली.धन्यवाद.

    Like

  10. विकास रामकृष्ण म्हणतो आहे:

    सौ अर्चना जोशींकडून नेहमी शेपू भात मला पाठविला जातो.अत्यंत चवदार आणी लज्जत वाढविणारी अन्नभेट होते.आपल्या ह्या शेपू भात रेसिपीमुळे तो कसा बनवायचा ही कृती माहित झाली.धन्यवाद.

    Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.