मागच्या डाळिंब पुराणात आम्ही तुम्हाला एक छायाचित्र देऊन ते काय असावे अस विचारल होतं. माझी वहिनी सौ संपदा पटवर्धन, पुणे यांनी त्याचा अचूक वेध घेतला आहे…. “डाळिंब वडी”
दचकू नका ! ……….खरच सुरेख लागते.
साहित्य
- २ वाट्या डाळिंबांचा रस
- पेढे ( गणपतीच्या प्रसादाचे उरले होते,) १५० ग्रॅम( खवा १०० ग्रॅम घेवू शकता)
- २ चमचे साय
- १/२ वाटी साखर
- २ चमचे मिल्क पावडर
कृती
- प्रथम पेढे मिक्सर मधून बारीक करून घेतले .
- आता डाळिंबाचा रस, पेढे, साय व साखर एकत्र करून कढईत एकजीव करून ठेवले .
- गॅस वर कढई ठेवून मध्यम आचेवर मिश्रण हलवत रहावे ,साधारण १/२ तास लागतोच . जेव्हा हे मिश्रण कढई ची कडा सोडायला लागेल तेंव्हा गॅस बंद करा.
- आता मिश्रण खाली उतरवून हाटत रहावे.थोडे आळायला लागले की २ चमचे अमुल ची मिल्क पावडर घालून मिश्रण गोळा होईपर्यंत हलवा.
- एका ताटाला थोडे तूप लावून ठेवा . आता हे मिश्रण ताटात पसरवा. पसरताना वाटीच्या तळाला तूप लावा त्याच्या सहाय्याने मिश्रण पसरवा म्हणजे हाताला चटका बसत नाही व एकसारखे थापले जाते . जरा कोमट असतानाच वडी सुरीच्या सहाय्याने कापून ठेवा. मस्त वडी तयार.
चला करून बघा, व आपला अभिप्राय कळवा.
Sundarach…nakki try karen
LikeLike
Healthy and nutritious one.
LikeLike
सुरेख
LikeLike
खूपच छान…।👌👌👍
LikeLike
Khup sunder disate aahe ,taste pan tashich asanar
LikeLike