खेडेगावात राहण्याचे काही फायदे असतात,दूधदूभतं, फळफळावळ, पालेभाज्या यांची रेलचेल असते व बय्राच वेळा त्यांचे भावही रास्त असतात. त्यातच अनिल ( आमचे हे ) डाॅक्टर आहेत, खेड्यापाड्यातील रूग्ण अजूनही डाॅक्टर बद्दल मनांत श्रध्दा बाळगून आहेत त्यामुळे आपल्या शेतातील पालेभाज्या, फळे, डाॅक्टर कडे येताना आवर्जून आणली व दिली जातात.
अशीच परवा एका पेशंटने बरीच डाळिंबे आणुन दिली. निगूतीने ती सर्व सोलून त्यातील दाणे वेगळे केले. दहीबूत्ती, कोशिंबीर, सरबत, फ्रूटसलॅड, सर्व पदार्थात वापर केला तरीही बरेच दाणे उरले. 😱
टपोरे लालचूटूक दाणे मला काही स्वस्थ बसू देईनात. मनात वेगवेगळ्या कल्पना येवू लागल्या .काहीतरी नविन करण्याचा ध्यास पक्का होता.
मग उठून पहिल्यांदा डाळिंबाचा रस काढला. तो छान गाळला. इतका सुरेख रंग दिसत होता रसाचा. 😊
जर कोकंब(आमसूल) ह्या फळाची सोलकढी बनवू शकतो तर डाळिंबाची पण करायला काय हरकत?
लगेच हाताबरोबर नारळ खोवून दूध काढले , मग सर्व कृती सोलकढी प्रमाणे केली.
आणि माझ्या या नविन पाककृतीचा जन्म झाला . पण नाव काय ठेवायचे, मला काही सुचत नव्हते. अश्यावेळी नेहमी प्रमाणे मृणमयी रानडेने चुटकीसरशी नामकरण करून टाकले व म्हणाली,
१ = अनाररस
२ = अनारकढी
ही दोन्ही नावे Perfect 👍.
अनारकढी
साहित्य
- ४ डाळिंब
- १/२ नारळाचा चव
- बारीक तुकडा मिरचीचा
- चिमूट भर जिरे
- मीठ
कृती
- प्रथम डाळिंबाचे दाणे काढून घेतले. मग सर्व दाणे मिक्सर मधून फिरवून रस गाळून घेतला , साधारण दोन वाट्या रस निघाला.
- आता नारळ खोवून घेतला व थोडावेळ कोमट पाण्यात ठेवला. मग छोटा तुकडा मिरचीचा, मिठ, जिर घालून सगळं मिक्सर मधे फिरवून घेतले . नेहमी पेक्षा जास्त वेळ फिरवा नारळ , म्हणजे दूध छान निघते. आता दूध बारीक गाळणीतून गाळून घेतलं.
- डाळिंबाचा रस व नारळाचे दूध एकत्र करून घेतले , मस्त अनारकढी तयार .👍
- जर कढी गरम हवी असेल तर ती पातेलीत गरम करताना सतत ढवळत रहावी लागते. म्हणजे ती फुटत नाही.वरून तुपाची फोडणी द्या व गरम कढीचा स्वाद घ्या.👍
बीज डाळिंबे अनार, आत सुरक्शित बसणार,
कस आम्ही ही पामरं, आस्वाद घेउ शकणारं …अनारी हवी निगराणी, सोलुन मायेची पाखर,
येई शुभांगी मिक्सरी, लाल रसाचा पाझर,
जिरे मीठ नारळदूध, कौतुके आत पड्णार
वाटीत हो आम्ही पामर,आस्वाद घेउ शकणारं …सुरंगा दाते
डाळिंब पुराणात पुढे काय ???
ओळखा पाहू …
आगामी आकर्षण
खूप छान प्रयोग! करून पाहते.
LikeLike
“अनारकढी” अप्रतिम. एक वेगळाच “U” turn छान जमलाय. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो. ही शुभेच्छा
LikeLike
अफलातुन! मस्तच ग! पौष्टिक सुद्धा! बहुदा पित्तशामक सुद्धा!
LikeLike
Creativity at its best……khup Chan receipe.
LikeLike
अजि मी रंग पाहिले
अगणित सुगरण सोलती ज्यासी
दाणे मोत्यासम उभे मिक्सरी , फिरू लागले
तिच्या अनारकढीसाठी , धावत आले जिरे-मिर्च-मिठी
दूध नारळी, ती अगदीच हुरळी , फिरून गाळले
विद्युत जादू , बीज फिरविता , दमत नाही कोणी तत्वतः
जनी संगे कढी बनविता , हे गाणी गाईले
LikeLike
मउ मेणाहुनी आम्ही विष्णू दास तशीच शुभांगी वरुन कडक आतुन मऊ ,रसाळ अनारसारखी लाल रसाळ . अनारकढीच्या जन्म दात्रीला खुप शुभेच्छा .
अश्याच नविन नविन रेसिपीचा शोध लागु देत आणी आम्हाला खायला मिळु देत खुप खुप शुभेच्छा .
LikeLike
Wa mast navine padarth khup mast aasiesh Pathavate ja all the best
LikeLike
खूप सुंदर आणि नाविन्यपूर्ण पाक कृती
LikeLike
Sunder.. Will definitely try
LikeLike
Very nice and innovative recipe
Must so it
LikeLike
Very nice and innovative recipe
Must do it
LikeLike
सही आयडीया !! कलर पण छान आलाय
तुला टेस्ट कशी वाटली?
मी पण करून बघेन नक्की
अनारकढी नाव पण छान आहे👌
LikeLike
😍Dalimbachya hatake recipes dilya ahes. Tuzyasarakhe utsahi lokach he karu jane ! 👍 Lekhan ani photo chhanach.
LikeLike
😍 Dalimbachya hatake pakkrutee dilya ahes; tya tuzyasarakhe utsahi lokach karu Jane. 👍 Lekhan ani photo chhanach!
LikeLike
Khupach chan navinyapurna padarth samjale.nakkki karun pahin
LikeLike
व्वा! भारीच idea..
नक्कीच करून पहाते
LikeLike