माहेरी आम्हा वैद्य मंडळींचा एकच गणपती असे व तो ही दीड दिवसांचा . आम्ही सर्व सख्खे-चुलत मिळून २५-३० जण बोरिवलीतील आमच्या मोठ्या घरी जमायचो . पहिल्या दिवशीच्या मोदकांच्या नैवेद्याचे नियोजन आमची मोठी काकू करायची . तिचा शब्द प्रमाण मानून आम्ही सर्व जण या प्रक्रियेत आनंदाने सहभागी होत असू . १५ ते २० मोठे गुहागरी नारळ काका व चुलत भावंडे आधी सोलून धुवून ठेवत . हे सर्व नारळ मधली काकू शिताफीने कोयता वापरात बरोबर मधोमध फोडी . नारळाचे पाणी वाया जाऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली जाईल . एखादी बहीण हे पाणी पातेल्यात धरण्याचे काम करी . मग सर्व जणी गोलाकार बसून नारळ खोवत . ” नारळ बारीक खोवा , तुकडे पाडू नका , केसर व काळी पाठ खोबऱ्यात नको ” – मोठी काकू !
इकडे खोबरे खोवताना तिकडे गप्पांचा कीस पडे . राजकारण , समाजकारण , मुलंबाळं आदी अनेक विषय यात यायचे . एकीकडे मोठ्या चुलत बहिणी गूळ बारीक चिरत व वेलचीची पावडर बनवत . सारण म्हणजे मोदकाचा आत्मा . अर्थात सारण भाजण्याचे काम आमची कॅप्टन मोठ्या काकू चे . मिश्रण मंदाग्नी गॅस वर केशरी होई पर्यंत ती भाजे . तो केशरी रंग पाहून मन हरखून जाई .
शेंडेफळ असलेने या सर्व कामात मी मात्र लिंबू टीम्बू … मागणी प्रमाणे चहा सरबत न सांडता कप बश्या व ग्लास न फोडता पुरवणे , नारळाच्या करवंट्या उचलून बंबा जवळ व्यवस्थीत रचणे अशी बाराव्या गड्याची सर्व कामे माझी .
मोदक करण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत माझा प्रवेश थोडा उशीराच झ्हाला . मोठ्या चार बहिणींचे लग्नें झाली आणी माझे शिक्षण सुरु झाले . ” वीणा ( माझे माहेरचे नाव ) मोदक वळायला आमच्या समोरच बस हो !” मोठ्या काकू च्या या फर्मानातील शेवटच्या हो ने अक्षरशः घाबरगुंडी उडायची . उकड कशी काढायची : कल्हई च्या पातेल्यात मापाच्या कुंड्या ने पिठी व तेव्हडेच पाणी घ्यायचे . पातेलं धरायला गावी न घेता जाड फडकी वापरायची म्हणजे उकड नीट हलवता येते . दणकून वाफ द्यायची . परातीत उकड घेऊन हाताला तेल व पाणी लावून ती कढत असताना मळायची म्हणजे पारीला चीरा जात नाहीत . इथपर्यंत सगळं ठीक आहे हो ! आता तर खरी परीक्षा सुरु . उंडा हातात घेऊन लंबगोल करायचा . अंगठयाच्या साहाय्याने तो गोल गोल फिरवत पारीचा द्रोण करायचा . चिमटीत पारी पकडून नाजूक पणे जवळ जवळ कळ्या करायच्या. त्यात सारण भरून ५ बोटांवर अलगत तोलत दुसऱ्या हाताच्या अंगठा व तर्जनी ने पारी पकडून मोदकाचे नाक सुंदर पणे वर आणून , पाण्यात बुडवून चाळणीत ठेवायचा. हुश्श … हे लिहाय सोपे पण करताना अक्षरशः त्रेधा तिरपट उडायची . मोदक नकटा झाला तर तोच मोदक सारण काढून तीच उकड घेऊन परत करायचा . नियम म्हणजे नियम . मी केलेला मोदक वेगळा ठेवून नैवेद्याच्या वेळी काकू त्याचे कौतुक करी . त्या नंतर साग्रसंगीत आरती व पंगत यात सुद्धा एक गम्मत असे . काही मोदकात मीठ , गुळाचा खडा , मिरची ठेचा असे वेगळे सारण असे . हे मोदक कोणाच्या वाट्याला येतात हा कुतूहलाचा विषय असे . यथेच्य आग्रह व भोजन झ्यालावर नंतर बराच वेळ तार सप्तकात घोरण्याचे आवाज येत . नंतर सर्व काकू मंडळी अन्न मध्ये घेऊन गोलाकार जेवायला बसत . ” वाहिनी दमलीस हो . वाढ ग अजून एक मोदक तीला . ” कोणाच्याही चेहऱ्यावर कामाचा शिणवटा नसायचा तर एक वेगळेच समाधान असायचे . मोदक करणे हा माझ्यावर माझी आई व सर्व काकवा यांनी केलेला एक संस्कारच आहे व आज गणेश चतुर्थी ला त्याची आठवण होणे हेही स्वाभाविकच नाही ना ?
साहित्य
- ४ वाट्या तांदूळ ( आंबेमोहोर , बासमती , इंद्रायणी या पैकी एक )
- २ नारळ
- ३ वाट्या बारीक चिरलेला गूळ
- १/४ वाटी भाजलेली खसखस
- १ मोठा चमचा वेलची पूड
- ४ चमचे साजूक तूप
- चवीनुसार मीठ
कृती
- प्रथम तांदूळ धुवून , निथळून फडक्यावर पसरवून ठेवा . थोडे दमट असतानाच दळून पिठी करावी म्हणजे पिठी बारीक होते .
- खोवलेला नारळ , बारीक चिरलेला गूळ , भाजलेली खसखस एकत्र करून चांगले कढईत शिजवावे . शिजत आल्यावर त्यात २ चमचे तांदुळाची पिठी घालावी . सारण गार झाले की वेलची पूड घालावी .
- उकड – जितके भांडे पीठ तितकेच भांडी पाणी पातेल्यात घेऊन उकळत ठेवावे . उकळी आल्यावर त्यात ४ चमचे तूप व मीठ घालावे . आता तांदुळाची पिठी आधण आलेल्या पाण्यात घालावी . शक्यतो गुठळी होऊ न देता उकड चांगली हटावी . मग त्यावर झाकण ठेवून दणकून वाफ आणावी . आता परातीत उकड काढून पाण्याचा व तेलाचा हात लावून उकड गरम असतानाच चांगली मळावी . जितकी मळाल तितके पारी छान होईल व चिरणार नाही . आता हे काम फूड प्रोसेसर वॉर ही होऊ शकते . आधणात तांदुळाची पिठी घालताना उलथण्याच्या मागच्या बाजूने एकाच दिशेने उकड हलवायची म्हणजे गुठळी होत नाही.
- लिम्बा एव्हडा उकडीचा गोळा हातात घेऊन आंगढ्याने मधोमध दाबून फिरवत फिरवत द्रोणासारखा आकार करावा . आता दोन बोटांच्या चिमटीत पारी पकडून जास्तीत जास्त काळ्या करा . मधोमध सारण भरा . अलगत गोल गोल फिरवत छान नाक वर आणा . आता मोदक पाण्यात बुडवून मोदक पात्रात वाफवायला ठेवा . चांगली १० मिनीटे वाफ आणा . अशा तर्हेने वरील साहित्यात ३५ तरी मोदक होतील .
मस्तच शुभांगी. लिहायला सुरुवात केलीस ते छान झालं. आता पुढच्या लेखांची वाट पाहातेय, खूप शुभेच्छा.
LikeLiked by 1 person
अप्रतिम वर्णन ,छान शब्दरचना,वाचून पोटभर चविष्ठ पदार्थ खालला असे वाटते !!!!👌खूप मस्त असेच लिहीत राहा.
LikeLiked by 1 person
Congratulations Veena /Shubhangi……Apratim jamale aahe tuzya hatachya chavisarkhe!
Aata saglya recepies miltil aamhala….keep it up
LikeLiked by 1 person
Apratim lekh. Khup avadale. Modakachya pakkruticha itka sukhshma vichar khup margadarshak ahe. Ashach khaas padarthanchi amhi vaat baghtoy.
LikeLiked by 1 person
Pl share all old authentic recepies
LikeLiked by 1 person
Apratim lekh. Khup avadale. Modakachya pakkruticha itka sukhshma vichar khup margadarshak ahe. Ashach khaas padarthanchi amhi vaat baghtoy.
LikeLike
खूप छान, मनापासून लिहिलं आहे. वाचणाऱ्याला अनुभव घेतल्यासारखं वाटते आहे.
LikeLiked by 1 person
खूप छान लिहिलं आहेस शुभांगी…. तुझ्या माहेरी फेरफटका मारून आल्यासारखं वाटलं. लकी आहेस
God bless you… Asach masta lihit raha
LikeLiked by 1 person
अप्रतिम ताई, इतके सुंदर वर्णन वाचतानाच saliva secretions वाढले.
LikeLike
मस्त लिहिलंयस शुभांगी वहिनी ,वाचता वाचता मी पण देवगड ला आमच्या वळकुवाडीत पोचले,माझ्याही मोदक शिक्षणाचा एक episode डोळ्यांसमोरुन गेला,असच लिहीत रहा आणि आम्ही वाचत राहतो
LikeLiked by 1 person
Khup masta Shubhangi kaku 👍🏻👍🏻👍🏻 Tu gharachya neet netkepanabaddalahi kahi tips dyawyas ase watte
LikeLike
Masta g 👍🏻 Tu gharachya sajawati baddal ani netkepanabaddal suddha lihawas ase watte
LikeLiked by 1 person
वा शुभांगी सुंदर मस्तच ब्लॉग सुरू केलास ते छान झाले याला Shubhangi the sugran हे नाव दे मस्त असेच लिहीत जा व आमच्या ज्ञाना त भर टाकीत राहा
LikeLiked by 1 person
खूपच छान शुभांगी काकू!! मस्तच लिहीलं आहेस..आमच्या लहानपणीच्या आठवणी पण जाग्या झाल्या.
LikeLiked by 1 person
खूपच छान शुभांगी , उकडीच्या मोदकावर संस्काराच साजूक तूप किती महत्वाचं ते पण समजतं यातून
LikeLike
खूप छान लेख!It made me nostalgic!
LikeLiked by 1 person
Khup sundar Shubhangi tai…..looking forward to many more from you.
LikeLike
Khup sundar Shubhangi tai…..looking forward to many more from you.
LikeLiked by 1 person
या बाबतीत शास्त्रीय शोध झाला आहे का नाही समजणं जरा कठीण,पण या मोदकांमध्ये आई-काकूंचा DNA अगदी फुलुन आला आहे….. मोदकांच्या चेहर्यावरचं केशरयुक्त स्मित बघ नुसतं…….
LikeLiked by 1 person
मस्तच ….क्या बात है….सगळं डोळ्यासमोर उभं केलंत👌👌👌👍👍👍
LikeLiked by 1 person
Mast tai… Keep writing
LikeLike
Wow….yummy
LikeLike
शुभांगी ताई तुझ्यासारखेच गोरे गोमटे गोड गोड मोदक! जसे मोदक करणे एक लयबद्ध procedure आहे तसच तुझे जगणे /राहणे / वागणे आहे! त्याबद्दल सुद्धा लिही…… राजस रहावे वागावे कसे त्याबद्दल! Thanks to मिहीर and Anil Dada for compelling you to write
LikeLiked by 1 person
खूपच सुंदर लिहिले आहेस शुभांगी ताई, उकडीचे मोदक दिसायला लागले समोर अक्षरशः, आता त्यांचा आस्वाद घ्यायला यायला पाहिजे.
तसेच तुझ्या या नवीन उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.
LikeLike
Very nice .keep writing
LikeLiked by 1 person
Khoopach chhan lihiley!
Pudhachya posts chi vaat baghatey.
Navin tips milalya modakasathi. Dhanyavaad!
LikeLiked by 1 person
काय सुरेख लिहिले आहेस. फारच आवडल. तेव्हाची ती माणस, एकत्र सण साजरा करण्यात येणारी मजा, मोदकाच वर्णन.. किती अमूल्य आठवणी. लिहायची पद्धत ही मस्त. आता हे फेबु वर पोस्ट करच.
LikeLiked by 1 person
खूप छान …
LikeLike
वा…..शुभांगी…लिखाणाची सुरुवात झक्कास झाली आहे…असेच लिहित राहा आणि आम्हा वाचकांना उत्तमोत्तम वाचण्याची संधी देत राहा…
पुढील लिखाणाच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा…
LikeLiked by 1 person
सुंदर लिहिले आहेस. तुझ्या लिखाणास “मोदका”पासून श्रीगणेशा केलास, खूप छान वाटले. पुढील लिखाणाची वाट पहात आहोत.👌🏻👌🏻👌🏻
खूप खूप शुभेच्छा.
LikeLiked by 1 person
Excellent Explanation
LikeLike